फेब्रुवारी ७
Appearance
(७ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३८ वा किंवा लीप वर्षात ३८ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]पाचवे शतक
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७८९ - जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे सर्वप्रथ राष्ट्राध्यक्ष झाले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४२ - डेबर टॅबरची लढाई - इथियोपियाने सेमियेनच्या सैन्याला परतवले.
- १८६३ - एच.एम.एस. ऑर्फियुस हे जहाज न्यू झीलंडमध्ये ऑकलंडजवळ बुडाले. १८९ ठार.
विसावे शतक
[संपादन]- १९०४ - बाल्टिमोर मध्ये आग. ३० तासात १,५०० ईमारती भस्मसात.
- १९२२ - पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून १८ महिन्याची शिक्षा झाली.
- १९३५ - कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे उदघाटन
- १९४२ - क्रोएशियातील बान्या लुका गावात नाझींनी ५५१ मुलांसह २,३०० नागरिकांना मारले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - इटलीतील ऍन्झियो गावातून नाझींनी दोस्त राष्ट्रांवर प्रतिहल्ला सुरू केला.
- १९६२ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.
- १९६७ - अलाबामात मॉंटगोमरीतील हॉटेलला आग. २५ ठार.
- १९७१ - स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.
- १९७२ - कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे काम पूर्ण.
- १९७४ - ग्रेनेडाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७७ - सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- १९७९ - प्लुटो नेपच्यून पेक्षा सूर्याच्या जवळ.
- १९८६ - हैतीच्या हुकुमशहा ज्यॉं क्लॉड डुव्हालियरने देशातून पळ काढला.
- १९९१ - हैतीत पहिल्यांदाच निवडलेल्या अध्यक्षाची सद्दी. ज्यॉं-बर्ट्रांड अरिस्टिड राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९१ - आय.आर.ए.ने युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर (१०, डाउनिंग स्ट्रीट)वर हल्ला केला.
- १९९२ - युरोपीय संघाची रचना.
- १९९५ - इ.स. १९९३ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या सूत्रधार राम्झी युसुफला पाकिस्तानात इस्लामाबाद येथे अटक.
- १९९८ - जपानमध्ये नागानो शहरात १९९८ हिवाळी ऑलिंपिक सुरू.
- १९९९ - जॉर्डनचा राजा हुसेनच्या मृत्युनंतर युवराज अब्दुल्ला राजेपदी.
एकविसावे शतक
[संपादन]- २००३ - महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.
जन्म
[संपादन]- १६९३ - ऍना, रशियाची सम्राज्ञी.
- १८१२ - चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक.
- १८५७ - आल्फ्रेड लिटलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७७ - गॉडफ्रे हॅरोल्ड हार्डी, इंग्लिश गणितज्ञ.
- १८९३ - जानकीदेवी बजाज, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १८९८ - रमाबाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी
- १९०६ - ओलेग ॲंतोनोव्ह, रशियन विमानशास्त्रज्ञ.
- १९०६ - पुयी, चीनी सम्राट.
- १९१४ - रमोन मर्काडेर, लिओन ट्रॉट्स्कीचा मारेकरी.
- १९२० - सरोजिनी बाबर, मराठी लेखिका आणि खासदार,
- १९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी अभिनेते.
- १९२१ - एथॉल रोवन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२९ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक, पत्रकार.
- १९३८ - एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता.
- १९४० - टोनी तान केंग याम, सिंगापुरी राजकारणी व सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचा ७वा राष्ट्राध्यक्ष.
- १९७२ - रायन कॅम्पबेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १०४५ - गो-सुझाकु, जपानी सम्राट.
- १७९९ - क्वियान्लॉॅंग, चीनी सम्राट.
- १८३७ - गुस्ताफ चौथा ऍडोल्फ, स्वीडनचा राजा.
- १८७८ - पोप पायस नववा.
- १९९९ - हुसेन, जॉर्डनचा राजा.
- २००० - विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे
- २००३ - जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - ग्रेनेडा.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - (फेब्रुवारी महिना)