Jump to content

२०२६ नागपूर महानगरपालिका निवडणूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर महानगरपालिका निवडणूक, २०२६ ही भारतातील महाराष्ट्र राज्याची हिवाळी राजधानी असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या सदस्यांची निवडणूक आहे. ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होईल आणि मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होईल. [] []

पार्श्वभूमी

[संपादन]

ही निवडणूक ९ वर्षांच्या अंतरानंतर होत आहे. मागील निवडणूक २०१७ मध्ये, ३८ प्रभागांमध्ये निवडणुका लढवण्यात आली होती, आणि यावेळी निवडून आलेल्या नागसेवकांची संख्या १५१ होती. [] यानंतर इतर मागास वर्गांच्या आरक्षणाबाबतच्या गोंधळामुळे राज्यात महानगरपिलकांच्या निवडणुका घेण्यास विलंब झाला होता. तीन वर्षे शहराचा कारभार निवडून आलेल्या संस्थेशिवाय नोकरशहा चालवत होते. यामुळे शहरातील नागरी सेवांच्या पुरवठ्यात बरेच अडथळे आले आणि लोकांना याचा बराच त्रास झाला. [] सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला मुदतवाढ न देता चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने जुलै २०२२ पूर्वी अस्तित्वात असलेले ओबीसी आरक्षण पुनर्संचयित करण्याचे आणि ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वॉर्डांचे सीमांकन अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. []

सीमांकन

[संपादन]

चार सदस्यीय प्रभाग व्यवस्था

[संपादन]

शहर प्रत्येकी ४ नगरसेवक असलेल्या ३८ प्रभागांमध्ये विभागले गेले आहे. प्रभाग क्रमांक ३८ मध्ये ३ नगरसेवक असतील. []

आरक्षणे

[संपादन]

११ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या आरक्षण सोडतीद्वारे ५०% जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत [] या निवडणुकीत ७६ महिला उमेदवार आणि ७५ पुरुष उमेदवार निवडणूक लढवतील. भूतकाळात, असे दिसून आले आहे की अनेक विद्यमान नगरसेवकांनी प्रॉक्सीद्वारे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पत्नी, माता किंवा इतर महिला कुटुंब सदस्यांना नव्याने राखीव जागेवर उभे केले होते, अशी टीका झाली आहे. []

लोकसंख्या आणि प्रभाग

[संपादन]
  • लोकसंख्येचा आधारावर प्रभाग : प्रत्येक प्रभागाची रचना अंदाजे ७०,००० रहिवासी संख्या असेल अशी केली आहे. प्रभाग क्रमांक ३८ मध्ये फक्त ५०,००० रहिवासी असतील. []
  • नगरसेवकांवर परिणाम : सीमांकनामुळे प्रभाग चार भागात विभागले गेले. कमी लोकसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये फक्त ३ प्रतिनिधी असतील. []
  • मतदारांची संख्या : सुमारे २४,८३,११२ मतदार नागपालिकेच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत []

हे देखील पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ More, Priya (2025-12-15). "Municipal Elections: मुंबई -पुणे, नागपूर ते कोल्हापूर, कोणकोणत्या २९ महापालिकांच्या निवडणुका होणार? पहा संपूर्ण यादी". Marathi News | Saam TV. 2025-12-22 रोजी पाहिले.
  2. ^ "NMC Election Programme Announced, Nagpur Heads to Polls on January 15 - The Live Nagpur" (इंग्रजी भाषेत). 2025-12-15. 2025-12-22 रोजी पाहिले.
  3. ^ More, Priya (2025-12-15). "Municipal Elections: मुंबई -पुणे, नागपूर ते कोल्हापूर, कोणकोणत्या २९ महापालिकांच्या निवडणुका होणार? पहा संपूर्ण यादी". Marathi News | Saam TV. 2025-12-22 रोजी पाहिले.
  4. ^ "NMC Election Programme Announced, Nagpur Heads to Polls on January 15 - The Live Nagpur" (इंग्रजी भाषेत). 2025-12-15. 2025-12-22 रोजी पाहिले.
  5. ^ Rajagopal, Krishnadas (2025-11-28). "Local body elections in Maharashtra, stalled since 2022, get Supreme Court green light". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2025-12-22 रोजी पाहिले.
  6. ^ More, Priya (2025-12-15). "Municipal Elections: मुंबई -पुणे, नागपूर ते कोल्हापूर, कोणकोणत्या २९ महापालिकांच्या निवडणुका होणार? पहा संपूर्ण यादी". Marathi News | Saam TV. 2025-12-22 रोजी पाहिले.
  7. ^ More, Priya (2025-12-15). "Municipal Elections: मुंबई -पुणे, नागपूर ते कोल्हापूर, कोणकोणत्या २९ महापालिकांच्या निवडणुका होणार? पहा संपूर्ण यादी". Marathi News | Saam TV. 2025-12-22 रोजी पाहिले.
  8. ^ "NMC Election Programme Announced, Nagpur Heads to Polls on January 15 - The Live Nagpur" (इंग्रजी भाषेत). 2025-12-15. 2025-12-22 रोजी पाहिले.
  9. ^ a b c "Civic body elections in Nagpur after 9 yrs". www.thehitavada.com (इंग्रजी भाषेत). 2025-12-22 रोजी पाहिले.