Jump to content

२०२६ इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२६ आयपीएल या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२६ इंडियन प्रीमियर लीग
दिनांक २६ मार्च – ३१ मे, २०२६
व्यवस्थापक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)
क्रिकेट प्रकार टी२० क्रिकेट
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत
सहभाग १०
सामने ८४
अधिकृत संकेतस्थळ iplt20.com
२०२५ (आधी) (नंतर) २०२७

 

२०२६ इंडियन प्रीमियर लीग तथा आयपीएल १९ किंवा टाटा आयपीएल २०२६ ही स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगची १९ वी आवृत्ती असेल. या स्पर्धेत २६ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत दहा संघ ८४ सामने खेळले. या स्पर्धेत मागच्या आवृत्तीपेक्षा १० सामने अधिक आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु हा गतविजेता संघ आहे

पुरस्कर्ते

[संपादन]

टाटा ग्रुप २०२४-२८ पर्यंत या स्पर्धेचा प्रमुख पुरस्कर्ता असेल. यासाठी त्यांनी बीसीसीआयला २५ अब्ज रुपये दिले आहेत.[]

स्पर्धास्वरूप

[संपादन]

२०२६पासून या स्पर्धेमध्ये एकूण ८४ सामने खेळले जातील.[] २०२८ च्या स्पर्धेपर्यंत सामन्यांची संख्या ९४ होईल. या वेळी दुहेरी साखळी सामन्यांची पद्धत परतेल.[]

२०२५मधील संघ पुन्हा एकदा या वर्षी आयपीएलमध्ये भाग घेतील.

संघ २०२५]] मधील स्थान[] मुख्य मार्गदर्शक[] संघनायक[]
चेन्नई सुपर किंग्स
१०वा
स्टीफन फ्लेमिंग ऋतुराज गायकवाड
दिल्ली कॅपिटल्स
५वा
हेमांग बदाणी अक्षर पटेल
गुजरात टायटन्स
४वा
आशिष नेहरा शुभमान गिल
कोलकाता नाइट रायडर्स
८वा
अभिषेक नायर अजिंक्य रहाणे
लखनौ सुपर जायंट्स
७वा
जस्टिन लँगर ऋषभ पंत
मुंबई इंडियन्स
३रा
माहेला जयवर्दने हार्दिक पंड्या
पंजाब किंग्स
उपविजेता
रिकी पाँटिंग श्रेयस अय्यर
राजस्थान रॉयल्स
९वा
कुमार संघकारा रियान पराग
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु
विजेता
अँडी फ्लॉवर रजत पाटीदार
सनरायझर्स हैदराबाद
६वा
डॅनियेल व्हेट्टोरी पॅट कमिन्स

मैदाने

[संपादन]

गुणफलक

[संपादन]

प्रसारण

[संपादन]

जियोस्टारची स्टार स्पोर्ट्स आणि जियोहॉटस्टार कडे या स्पर्धेचे २०२७ पर्यंतचे प्रसारणहक्क आहेत.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "TATA Group secures title sponsorship rights for IPL 2024-28". IPLT20.com. 20 January 2024. 21 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 March 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "IPL 2025: No increase in the number of matches as BCCI wary of India's workload" (इंग्रजी भाषेत). ईएसपीएन क्रिकइन्फो. 2024-10-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Arun Dhumal hints at expanded 94-match IPL in 2028 but without new teams" (इंग्रजी भाषेत). ईएसपीएन क्रिकइन्फो. 2025-04-29 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-12-23 रोजी पाहिले.
  4. ^ साचा:ESPNcricinfo 2
  5. ^ a b [ संदर्भ हवा ]
  6. ^ McCaskill, Steve (2025-12-08). "JioStar seeks exit from US$3bn ICC cricket deal". SportsPro (इंग्रजी भाषेत). 2025-12-23 रोजी पाहिले. JioStar also owns the domestic broadcast and streaming rights to the IPL [...]