२०२५ श्रीलंका महिला तिरंगी मालिका
| २०२५ श्रीलंका महिला तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | २७ एप्रिल – ११ मे २०२५ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान | श्रीलंका | ||||||||||||||||||||||||||||||||
| निकाल |
| ||||||||||||||||||||||||||||||||
| मालिकावीर |
| ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०२५ श्रीलंका महिला तिरंगी मालिका ही एप्रिल आणि मे २०२५ मध्ये श्रीलंकेत खेळवण्यात आलेली एक क्रिकेट मालिका होती.[१] सादर मालिका ही भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांचा समावेश असलेली तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय स्वरूपात खेळवले गेले. [२] ही श्रीलंकेने आयोजित केलेली महिलांची पहिलीच आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका होती.[३] ह्या मालिकेने २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक चषक स्पर्धेच्या पूर्वतयारीचे काम केले.[४] सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर दुहेरी साखळी स्वरूपात खेळवण्यात आले.[५]अंतिम सामन्यात, भारताने श्रीलंकेचा ९७ धावांनी पराभव करून मालिका जिंकली.[६][७]
संघ
[संपादन]१७ एप्रिल रोजी, आजारपणामुळे ॲनेके बॉश मालिकेतून बाहेर पडली आणि तिची जागा [[लारा गूडॉलने]] घेतली.[११] ६ मे रोजी, काशवी गौतम दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली, तिच्या जागी क्रांती गौडची निवड करण्यात आली.[१२]
गुणफलक
[संपादन]| क्र | संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | ०.४५७ | |
| २ | ४ | २ | २ | ० | ० | ४ | -०.५४२ | |
| ३ | ४ | १ | ३ | ० | ० | २ | ०.०८३ |
(य) यजमान
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१३]
सामने
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
१४९/१ (२९.४ षटके) | |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पाऊस आणि ओल्या मैदानामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा खेळविण्यात आला.
- मल्की मदारा, पिऊमी वत्सला (श्री), श्री चरनी आणि काशवी गौतम (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
२६१ (४९.२ षटके) | |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कराबो मेसोने (दआ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- स्नेह राणाने (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच गडी बाद केले.[१४][१५]
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
२३७/५ (४६.३ षटके) | |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- देवमी विहंगने (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- हर्षिता समरविक्रमा आणि कविशा दिलहारी यांची १२८ धावांची भागीदारी ही महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेकडून चौथ्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली, त्यांनी २००२ मधील चमनी सेनेविरत्ने आणि हिरोशी अबेसिंघे यांच्यातील ११८ धावांचा विक्रम मोडला.[१६]
४था आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
२७८/७ (४९.१ षटके) | |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- स्मृती मंधानाचा (भा) हा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१७]
- भारत आणि श्रीलंके दरम्यानच्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांपैकी, ह्या सामन्यात आजपर्यंतच्या सर्वाधिक एकूण (५५३) धावा केल्या गेल्या.[१८]
५वा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
३१४/७ (५० षटके) | |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शुची उपाध्याय (भा) आणि मिआने स्मित (द) ह्या दोघीनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- दीप्ती शर्मा आणि जेमायमाह रॉड्रिगेसची १२२ धावांची भागीदारी ही महिला एकदिवसीय सामन्यात भारताची ५ व्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली, त्यांनी २०१७ मधील मिताली राज आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी केलेला १०८ धावांचा विक्रम मोडला.[१९][२०]
- भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांपैकी, ह्या सामन्यात आजपर्यंतच्या सर्वाधिक एकूण (६५१) धावा केल्या गेल्या.[२१]
६वा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
२३९ (४२.५ षटके) | |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शेषनी नायडूने (दआ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- देवमी विहंगने (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच गडी बाद केले.[२२]
- ॲनेरी डेर्कसेन (द) हिने एकदिवसीय सामन्यात तिचे पहिले शतक झळकावले.[२३]
- ॲनेरी डेर्कसेन आणि क्लोई ट्रायॉन यांची ११२ धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेची महिला एकदिवसीय सामन्यात ७ व्या गड्यासाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली, त्यांनी २००० मधील सिंडी एक्स्टिन आणि अॅली कुयलार्स यांच्यातील ९४ धावांचा विक्रम मोडला.[२४]
- क्लोई ट्रायॉनने (द) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच गडी बाद केले आणि पहिली हॅटट्रिक घेतली[२५]
अंतिम सामना
[संपादन]वि
|
२४५ (४८.२ षटके) | |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- क्रांती गौडने (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
आकडेवारी
[संपादन]| नाव | संघ | धावा | डाव |
|---|---|---|---|
| ॲनेरी डेर्कसेन | २७६ | ४ | |
| स्मृती मंधाना | २६४ | ५ | |
| जेमायमाह रॉड्रिगेस | २४५ | ४ | |
| हर्षिता समरविक्रमा | २०३ | ५ | |
| क्लोई ट्रायॉन | १९४ | ४ | |
| प्रतिका रावळ | ५ |
| नाव | संघ | बळी | सामने |
|---|---|---|---|
| स्नेह राणा | १५ | ५ | |
| देवमी विहंग | ११ | ४ | |
| अमनजोत कौर | ६ | २ | |
| नॉनकुलुलेको म्लाबा | ३ | ||
| क्लोई ट्रायॉन | ४ | ||
| सुगंदिका कुमारी | ४ | ||
| श्री चरनी | ५ | ||
| मल्की मदारा | ५ |
प्रसारण
[संपादन]ही श्रीलंका आणि जगभरातील प्रसारण चॅनेलची यादी आहे.[२८]
| प्रदेश | हक्कधारक |
|---|---|
| श्रीलंका | डायलॉग टेलिव्हिजनवर द पापारे २ द पापारे.कॉम (वेबसाइट आणि फेसबुक), डायलॉग VIU ॲप श्रीलंका क्रिकेट (यूट्यूब) |
| भारत | फॅनकोड |
| जागतिक | श्रीलंका क्रिकेट (यूट्यूब) |
नोंदी
[संपादन]- ^ क्लोई ट्रायॉनने पाचव्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Sri Lanka to host India, South Africa for ODI tri-series in April-May" [एप्रिल-मे मध्ये श्रीलंका भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिरंगी एकदिवसीय मालिकेचे आयोजन करणार आहे.]. क्रिकबझ्झ. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India, Sri Lanka, South Africa to play women's ODI tri-series in April-May" [भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका एप्रिल-मे मध्ये महिला एकदिवसीय तिरंगी मालिका खेळणार आहेत.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka to host India and South Africa in a tri-nation series" [श्रीलंका भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिरंगी मालिकेचे आयोजन करणार.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India to play ODI tri-series in Sri Lanka ahead of Women's World Cup" [महिला विश्वचषकापूर्वी भारत श्रीलंकेत एकदिवसीय तिरंगी मालिका खेळणार.]. द इकॉनॉमिक टाइम्स. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Women's Cricket, Tri-Nation Series" [महिला क्रिकेट, तिरंगी मालिका]. श्रीलंका क्रिकेट. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Mandhana ton helps India seal tri-series with World Cup on horizon" [मंधानाच्या शतकामुळे भारताने विश्वचषक जवळ येताच तिरंगी मालिका जिंकली]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sneh Rana's 'simple plan' delivers big as India win Women's Tri-Nation Series" [स्नेह राणाच्या 'सोप्या योजने'मुळे भारताने महिला तिरंगी मालिका जिंकली]. Times of India. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka name strong squad for India, South Africa tri-nation series" [भारत-दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेचा मजबूत संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध महिला तिरंगी मालिकेसाठी भारतीय (वरिष्ठ महिला) संघ". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Meso, Naidu and Smit receive maiden call-ups for Proteas Women's ODI Tri-Series squad" [मेसो, नायडू आणि स्मित यांना दक्षिण आफ्रिकेतील महिला एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी संघात पहिल्यांदाच स्थान देण्यात आले आहे.]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. 2025-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Goodall replaces Bosch in Proteas Women tri-series squad due to illness" [आजारपणामुळे प्रोटीस महिला तिरंगी मालिकेच्या संघात बॉशची जागा गुडऑलने घेतली]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. 2025-05-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Kranti Goud Added To India's Tri-Series Squad, Kashvee Ruled Out Injured" [क्रांती गौडचा भारताच्या तिरंगी मालिका संघात समावेश, दुखापतग्रस्त काशवी बाहेर]. न्यूज१८. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka Women's ODI Tri-Series - Points Table" [श्रीलंका महिला एकदिवसीय तिरंगी मालिका - गुणफलक]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sneh Rana, Rawal star as India thump South Africa by 15 runs in Women's Tri series" [महिला तिरंगी मालिकेत स्नेह राणा आणि रावल यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १५ धावांनी विजय.]. इंडिया टुडे. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sneha Rana's maiden five-for, Rawal's excellent fifty power India to 15 run-win over South Africa" [स्नेहा राणाचे पहिले पाच बळी आणि रावलच्या उत्कृष्ट अर्धशतकामुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १५ धावांनी विजय.]. हिंदुस्थान टाइम्स. 2025-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Madara, Samarawickrama and Dilhari lead Sri Lanka's rout of South Africa" [मदारा, समरविक्रमा आणि दिलहारी यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Smriti Mandhana becomes 7th Indian to complete 100 Women's ODIs" [स्मृती मंधाना १०० महिला एकदिवसीय सामने पूर्ण करणारी ७वी भारतीय खेळाडू ठरली]. फिमेल क्रिकेट. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Highest match aggregates for India Women vs Sri Lanka Women in WODIs" [महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघांसाठी सर्वाधिक एकत्रित धावा]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Jemimah Rodrigues Deepti Sharma Create History; Becomes First Player In The World to Compete Unique feat" [जेमिमा रॉड्रिग्ज दीप्ती शर्माने इतिहास रचला; अनोखी कामगिरी करणाऱ्या जगातील पहिल्या खेळाडू ठरल्या.]. टाइम्स नाऊ. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ton-Up Jemimah Rodrigues, All-Round Deepti Sharma Shine As Ind-W Seal Spot In Final With 23-Run Win VS SA-W" [जेमिमा रॉड्रिग्ज आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका महिलांविरुद्ध २३ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.]. टाइम्स नाऊ. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Highest match aggregates for India Women vs South Africa Women in WODIs" [महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघांसाठी सर्वाधिक एकत्रित धावा]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Annerie Dercksen Dewmi Vihanga achieve records as SA eye consolation win in tri-series clash against SL" [ॲनेरी डेर्कसेन, देवमी विहंगने गाठला विक्रम दक्षिण आफ्रिकेचा तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचे सांत्वनपर विजयावर लक्ष]. India TV. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "All-round Tryon clinches victory for South Africa" [अष्टपैलू ट्रायॉनने दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला]. सुपरस्पोर्ट. 2025-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Dercksen 104, Tryon 74 and hat-trick hand South Africa consolation win" [डर्कसेन १०४, ट्रायॉन ७४ आणि हॅटट्रिकमुळे दक्षिण आफ्रिकेचा सांत्वनदायी विजय]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Women's ODI Tri-Series: South Africa's Chloe Tryon takes hat-trick, helps beat Sri Lanka by 76 runs" [महिला एकदिवसीय तिरंगी मालिका: दक्षिण आफ्रिकेच्या क्लोई ट्रायॉनने घेतली हॅटट्रिक, श्रीलंकेला ७६ धावांनी हरवले]. स्पोर्टस्टार. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Most runs in Sri Lanka Women's ODI Tri-Series, 2025" [श्रीलंका महिला एकदिवसीय तिरंगी मालिका, २०२५ मध्ये सर्वाधिक धावा]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Most wickets For Sri Lanka Women's ODI Tri-Series, 2025" [श्रीलंका महिला एकदिवसीय तिरंगी मालिका, २०२५ मध्ये सर्वाधिक बळी]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Women's Tri-Nation ODI series 2025 | Broadcast Platforms" [महिला तिरंगी आं.ए.दि. मालिका २०२५ | प्रसारण]. श्रीलंका क्रिकेट. ३१ जुलै २०२५ रोजी पाहिले.