Jump to content

२०२५ महिला प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ महिला प्रीमियर लीग
दिनांक १४ फेब्रुवारी – १५ मार्च २०२५
व्यवस्थापक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० क्रिकेट
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि प्ले-ऑफ
विजेते मुंबई इंडियन्स (२ वेळा)
सहभाग
सामने २२
मालिकावीर नॅटली सायव्हर (मुंबई इंडियन्स)
सर्वाधिक धावा नॅटली सायव्हर (मुंबई इंडियन्स) (५२३)
सर्वाधिक बळी आमेलिया केर (मुंबई इंडियन्स) (१८)
हेली मॅथ्यूस (मुंबई इंडियन्स) (१८)
अधिकृत संकेतस्थळ wplt20.com
२०२४ (आधी) (नंतर) २०२६

२०२५ महिला प्रीमियर लीग (जी डब्ल्यूपीएल २०२५ आणि टाटा डब्ल्यूपीएल २०२५ म्हणूनही ओळखली जाते) ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित केलेल्या महिलांच्या फ्रँचायझी ट्वेंटी२० क्रिकेट लीग, महिला प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम होता. पाच संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा १४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ गतविजेता होता.[]

स्वरूप

[संपादन]

२०२५ मधील स्पर्धेत पाच संघ सहभागी झाले. या स्पर्धेत प्रत्येक संघ इतर प्रत्येक संघासोबत घरच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर, अशा दुहेरी साखळी पद्धतीने दोनदा खेळले. दुहेरी साखळी सामन्यांच्या लीग टप्प्यानंतर, एकूण गुणांच्या आधारावर अव्वल तीन संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरले. सर्वाधिक गुण मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांनी (एलिमिनेटर नावाच्या सामन्यात) एकमेकांशी सामना केला. एलिमिनेटर सामन्याच्या विजेत्याला अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला.

ठिकाणे

[संपादन]

ही स्पर्धा चार ठिकाणी खेळवली गेली: बंगळूर, लखनौ, मुंबई आणि वडोदरा.[]

बंगळूर लखनौ मुंबई वडोदरा
एम. चिन्नास्वामी स्टेडियम इकाना क्रिकेट स्टेडियम ब्रेबॉर्न स्टेडियम कोटांबी स्टेडियम
प्रेक्षकक्षमता: ४०,००० प्रेक्षकक्षमता: ५०,१०० प्रेक्षकक्षमता: ५०,००० प्रेक्षकक्षमता: ४०,०००

खेळाडू बदल

[संपादन]

लिलावादरम्यान एकूण १९ खेळाडूंची विक्री झाली, त्यापैकी पाच खेळाडू परदेशी होते.

खेळाडू देश संघ किंमत
श्री चरणी भारतचा ध्वज भारत दिल्ली कॅपिटल्स ५५ लाख (US$१,२२,१००)
सॅरा ब्राइस स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड दिल्ली कॅपिटल्स १० लाख (US$२२,२००)
नंदिनी कश्यप भारतचा ध्वज भारत दिल्ली कॅपिटल्स १० लाख (US$२२,२००)
निकी प्रसाद भारतचा ध्वज भारत दिल्ली कॅपिटल्स १० लाख (US$२२,२००)
सिमरन शेख भारतचा ध्वज भारत गुजरात जायंट्स १.९ कोटी (US$४,२१,८००)
डिआंड्रा डॉटिन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गुजरात जायंट्स १.७ कोटी (US$३,७७,४००)
डॅनियल गिब्सन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गुजरात जायंट्स ३० लाख (US$६६,६००)
प्रकाशिका नाईक भारतचा ध्वज भारत गुजरात जायंट्स १० लाख (US$२२,२००)
गुनालन कमलिनी भारतचा ध्वज भारत मुंबई इंडियन्स १.६ कोटी (US$३,५५,२००)
नेडीन डी क्लर्क दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका मुंबई इंडियन्स ३० लाख (US$६६,६००)
अक्षिता माहेश्वरी भारतचा ध्वज भारत मुंबई इंडियन्स २० लाख (US$४४,४००)
संस्कृती गुप्ता भारतचा ध्वज भारत मुंबई इंडियन्स १० लाख (US$२२,२००)
प्रेमा रावत भारतचा ध्वज भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १.२ कोटी (US$२,६६,४००)
राघवी बिस्त भारतचा ध्वज भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १० लाख (US$२२,२००)
जाग्रवी पवार भारतचा ध्वज भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १० लाख (US$२२,२००)
जोशीता व्ही.जे. भारतचा ध्वज भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १० लाख (US$२२,२००)
अलाना किंग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया युपी वॉरियर्झ ३० लाख (US$६६,६००)
आरुषी गोयल भारतचा ध्वज भारत युपी वॉरियर्झ १० लाख (US$२२,२००)
क्रांती गौड भारतचा ध्वज भारत युपी वॉरियर्झ १० लाख (US$२२,२००)
दिल्ली कॅपिटल्स[] गुजरात जायंट्स[] मुंबई इंडियन्स [] रॉयल चॅलेंजर्स बंगळूर[] युपी वॉरियर्झ[]

साखळी सामने

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
स्थान संघ सा वि गुण धावगती पात्रता
दिल्ली कॅपिटल्स १० ०.३९६ अंतिम सामन्यासाठी पात्र
मुंबई इंडियन्स १० ०.१९२ एलिमिनेटरसाठी पात्र
गुजरात जायंट्स ०.२२८
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर −०.१९६
युपी वॉरियर्झ −०.६२४

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]

सामन्यांचा सारांश

[संपादन]
संघ साखळी सामने प्ले ऑफ
अं
गुजरात जायंट्स
दिल्ली कॅपिटल्स १० १०
मुंबई इंडियन्स १० १० वि वि
युपी वॉरियर्झ
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
माहिती: सामन्याच्या शेवटी एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.
पाहुणा संघ → गुजरात दिल्ली मुंबई उ.प्रदेश बंगळूर
यजमान संघ ↓
गुजरात जायंट्स गुजरात
५ गडी
मुंबई
५ गडी
गुजरात
६ गडी
बंगळूर
६ गडी
दिल्ली कॅपिटल्स दिल्ली
६ गडी
दिल्ली
९ गडी
उ.प्रदेश
३३ धावा
बंगळूर
८ गडी
मुंबई इंडियन्स मुंबई
९ धावा
दिल्ली
२ गडी
मुंबई
८ गडी
बंगळूर
११ धावा
युपी वॉरियर्झ गुजरात
८१ धावा
दिल्ली
७ गडी
मुंबई
६ गडी
उ.प्रदेश
१२ धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर गुजरात
६ गडी
दिल्ली
९ धावा
मुंबई
४ गडी
उ.प्रदेश
सुपर ओव्हर
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

सामने

[संपादन]

सामन्यांचे वेळापत्रक १६ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आले.[]

सामना १
१४ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
२०१/५ (२० षटके)
वि
ॲशली गार्डनर ७९* (३७)
रेणुका सिंग २/२५ (४ षटके)
रिचा घोष ६४* (२७)
ॲशली गार्डनर २/३३ (३ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ६ गडी राखून विजयी
कोटांबी स्टेडियम, वडोदरा
पंच: भावेश पटेल आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: रिचा घोष (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना २
१५ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६४ (१९.१ षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१६५/८ (२० षटके)
नॅटली सायव्हर ८०* (५९)
ॲनाबेल सदरलँड ३/३४ (३.१ षटके)
शफाली वर्मा ४३ (१८)
आमेलिया केर २/२१ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स २ गडी राखून विजयी
कोटांबी स्टेडियम, वडोदरा
पंच: नारायणन जननी आणि अनिश शाहस्रबुद्धे
सामनावीर: निकी प्रसाद (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ३
१६ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१४३/९ (२० षटके)
वि
गुजरात जायंट्स
१४४/४ (१८ षटके)
गुजरात जायंट्स ६ गडी राखून विजयी
कोटांबी स्टेडियम, वडोदरा
पंच: अजितेश अर्गल आणि भावेश पटेल
सामनावीर: ॲशली गार्डनर (गुजरात जायंट्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ४
१७ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१४१ (१९.३ षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ८ गडी राखून विजयी
कोटांबी स्टेडियम, वडोदरा
पंच: अजितेश अर्गल आणि अनिश शाहस्रबुद्धे
सामनावीर: रेणुका सिंग (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ५
१८ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१२० (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१२२/५ (१६.१ षटके)
हरलीन देओल ३२ (३१)
हेली मॅथ्यूस ३/१६ (४ षटके)
नॅटली सायव्हर ५७ (३९)
काशवी गौतम २/१५ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी
कोटांबी स्टेडियम, वडोदरा
पंच: नारायणन जननी आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: हेली मॅथ्यूस (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ६
१९ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१६६/७ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१६७/३ (१९.५ षटके)
किरण नवगिरे ५१ (२७)
ॲनाबेल सदरलँड २/२६ (४ षटके)
मेग लॅनिंग ६९ (४९)
ग्रेस हॅरिस १/११ (२ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ७ गडी राखून विजयी
कोटांबी स्टेडियम, वडोदरा
पंच: अजितेश अर्गल आणि भावेश पटेल
सामनावीर: ॲनाबेल सदरलँड (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ७
२१ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१७०/६ (१९.५ षटके)
एलिस पेरी ८१ (४३)
अमनजोत कौर ३/२२ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ४ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अंकिता गुहा आणि वृंदा राठी
सामनावीर: अमनजोत कौर (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ८
२२ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१७७/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१४४ (१९.३ षटके)
शिनेल हेन्री ६२ (२३)
जेस जोनासन ४/२१ (४ षटके)
युपी वॉरियर्झ ३३ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: कौशिक गांधी आणि केयूर केळकर
सामनावीर: शिनेल हेन्री (युपी वॉरियर्झ)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ९
२४ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
वि
युपी वॉरियर्झ
१८० (२० षटके)
एलिस पेरी ९०* (५६)
ताहलिया मॅकग्रा १/३० (३ षटके)
सोफी एसलस्टोन ३३ (१९)
स्नेह राणा ३/२७ (३ षटके)
सामना बरोबरीत (युपी वॉरियर्झ सुपर ओव्हरमध्ये विजयी)
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: केयूर केळकर आणि सय्यद खालिद
सामनावीर: सोफी एसलस्टोन (युपी वॉरियर्झ)
  • युपी वॉरियर्झने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सुपर ओव्हर: युपी वॉरियर्झ ८/१, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ४/०

सामना १०
२५ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१२७/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१३१/४ (१५.१ षटके)
भारती फुलमाली ४०* (२९)
मेरिझॅन कॅप २/१७ (४ षटके)
जेस जोनासन ६१* (३२)
काशवी गौतम २/२६ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ६ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: कौशिक गांधी आणि अंकिता गुहा
सामनावीर: जेस जोनासन (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ११
२६ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१४२/९ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१४३/२ (१७ षटके)
ग्रेस हॅरिस ४५ (२६)
नॅटली सायव्हर ३/१८ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ८ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: कौशिक गांधी आणि केयूर केळकर
सामनावीर: नॅटली सायव्हर (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १२
२७ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
वि
गुजरात जायंट्स
१२६/४ (१६.३ षटके)
कनिका आहुजा ३३ (२८)
तनुजा कंवर २/१६ (४ षटके)
ॲशली गार्डनर ५८ (३१)
रेणुका सिंग २/२४ (४ षटके)
गुजरात जायंट्स ६ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अंकिता गुहा आणि सय्यद खालिद
सामनावीर: ॲशली गार्डनर (गुजरात जायंट्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १३
२८ फेब्रुवारी २०२५
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१२३/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१२४/१ (१४.३ षटके)
हरमनप्रीत कौर २२ (१६)
मिन्नू मणी ३/१७ (३ षटके)
मेग लॅनिंग ६०* (४९)
अमनजोत कौर १/१२ (२ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ९ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: कौशिक गांधी आणि वृंदा राठी
सामनावीर: जेस जोनासन (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १४
१ मार्च २०२५
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५१/१ (१५.३ षटके)
एलिस पेरी ६०* (४७)
शिखा पांडे २/२४ (४ षटके)
शफाली वर्मा ८०* (४३)
रेणुका सिंग १/२८ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ९ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: केयूर केळकर आणि सय्यद खालिद
सामनावीर: शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १५
३ मार्च २०२५
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१८६/५ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१०५ (१७.१ षटके)
बेथ मूनी ९६* (५१)
सोफी एसलस्टोन २/३४ (४ षटके)
शिनेल हेन्री २८ (१४)
काशवी गौतम ३/११ (३ षटके)
गुजरात जायंट्स ८१ धावांनी विजयी
इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
पंच: नारायणन जननी आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: बेथ मूनी (गुजरात जायंट्स)
  • युपी वॉरियर्झने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १६
६ मार्च २०२५
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१५०/९ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५३/४ (१८.३ षटके)
हेली मॅथ्यूस ६८ (४६)
ग्रेस हॅरिस २/११ (२ षटके)
मुंबई इंडियन्स ६ गडी राखून विजयी
इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
पंच: अजितेश अर्गल आणि नारायणन जननी
सामनावीर: हेली मॅथ्यूस (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १७
७ मार्च २०२५
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१७७/५ (२० षटके)
वि
गुजरात जायंट्स
१७८/५ (१९.३ षटके)
मेग लॅनिंग ९२ (५७)
मेघना सिंग ३/३५ (४ षटके)
हरलीन देओल ७०* (४९)
शिखा पांडे २/३१ (४ षटके)
गुजरात जायंट्स ५ गडी राखून विजयी
इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
पंच: अजितेश अर्गल आणि अनिश शाहस्रबुद्धे
सामनावीर: हरलीन देओल (गुजरात जायंट्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १८
८ मार्च २०२५
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
२२५/५ (२० षटके)
वि
रिचा घोष ६९ (३३)
सोफी एसलस्टोन ३/२५ (४ षटके)
युपी वॉरियर्झ १२ धावांनी विजयी
इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
पंच: भावेश पटेल आणि अनिश शाहस्रबुद्धे
सामनावीर: जॉर्जिया व्हॉल (युपी वॉरियर्झ)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १९
१० मार्च २०२५
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७९/६ (२० षटके)
वि
गुजरात जायंट्स
१७० (२० षटके)
भारती फुलमाली ६१ (२५)
आमेलिया केर ३/३४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ९ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: केयूर केळकर आणि वृंदा राठी
सामनावीर: हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना २०
११ मार्च २०२५
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१८८/९ (२० षटके)
नॅटली सायव्हर ६९ (३५)
स्नेह राणा ३/२६ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ११ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अंकिता गुहा आणि सय्यद खालिद
सामनावीर: स्नेह राणा (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

बाद फेरी

[संपादन]
  एलिमिनेटर     अंतिम सामना
                 
      दिल्ली कॅपिटल्स १४१/९ (२० षटके)
      एवि मुंबई इंडियन्स १४९/७ (२० षटके)
  मुंबई इंडियन्स २१३/४ (२० षटके)    
  गुजरात जायंट्स १६६ (१९.२ षटके)  

एलिमिनेटर

[संपादन]
१३ मार्च २०२५
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
२१३/४ (२० षटके)
वि
गुजरात जायंट्स
१६६ (१९.२ षटके)
डॅनियेल गिब्सन ३४ (२४)
हेली मॅथ्यूस ३/३१ (३.२ षटके)
मुंबई इंडियन्स ४७ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: कौशिक गांधी आणि अंकिता गुहा
सामनावीर: हेली मॅथ्यूस (मुंबई इंडियन्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
१५ मार्च २०२५
२०:०० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१४९/७ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१४१/९ (२० षटके)
हरमनप्रीत कौर ६६ (४४)
मेरिझॅन कॅप २/११ (४ षटके)
मेरिझॅन कॅप ४० (२६)
नॅटली सायव्हर ३/३० (४ षटके)
मुंबई इंडियन्स ८ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अंकिता गुहा आणि अनिश शाहस्रबुद्धे
सामनावीर: हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

आकडेवारी

[संपादन]
सर्वाधिक धावा
धावा खेळाडू संघ
५२३ नॅटली सायव्हर मुंबई इंडियन्स
३७२ एलिस पेरी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
३०७ हेली मॅथ्यूस मुंबई इंडियन्स
३०४ शफाली वर्मा दिल्ली कॅपिटल्स
३०२ हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्स
सर्वाधिक बळी
बळी खेळाडू संघ
१८ आमेलिया केर मुंबई इंडियन्स
१८ हेली मॅथ्यूस मुंबई इंडियन्स
१३ जेस जोनासन दिल्ली कॅपिटल्स
१२ नॅटली सायव्हर मुंबई इंडियन्स
१२ जॉर्जिया वेरहॅम रॉयल चॅलेंजर्स बंगळूर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "RCB wins its first title across leagues as Smriti Mandhana's side beats DC in WPL 2024" [स्मृती मंधानाच्या संघाने डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवून, आरसीबीने सर्व लीगमध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावले.]. स्पोर्टस्टार. १७ मार्च २०२४. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  2. ^ "WPL 2025: BCCI to host tournament in Mumbai, Lucknow, Bengaluru and Vadodara" [डब्ल्यूपीएल २०२५: बीसीसीआय मुंबई, लखनौ, बंगळूर आणि वडोदरा येथे स्पर्धेचे आयोजन करणार]. स्पोर्टस्टार. १२ जानेवारी २०२५. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  3. ^ "'We are a far stronger squad than we were last year,' says Director of Cricket-Delhi Capitals (WPL) Sourav Ganguly after TATA WPL Auction" [‘गेल्या वर्षीच्या तुलनेत आमचा संघ खूपच अधिक मजबूत आहे,’ टाटा डब्ल्यूपीएल लिलावानंतर दिल्ली कॅपिटल्स (डब्ल्यूपीएल) चे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांचे प्रतिपादन.]. दिल्ली कॅपिटल्स. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  4. ^ "A Successful Auction for Gujarat Giants as they build a strong squad at the TATA WPL Auction!" [टाटा डब्ल्यूपीएल लिलावात गुजरात जायंट्ससाठी एक यशस्वी लिलाव ठरला, जिथे त्यांनी एक मजबूत संघ तयार केला!]. गुजरात जायंट्स. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  5. ^ "MI Women Women's Premier League 2024/25 Squad" [मुंबई इंडियन्स महिला प्रीमियर लीग २०२४/२५ संघ]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  6. ^ "RCB Women Women's Premier League 2024/25 Squad" [आरसीबी महिला प्रीमियर लीग २०२४/२५ संघ]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  7. ^ "UPW Women Women's Premier League 2024/25 Squad" [युपीडब्ल्यु महिला प्रीमियर लीग २०२४/२५ संघ]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  8. ^ "Women's Premier League 2024/225 - Points Table" [महिला प्रीमियर लीग २०२४/२५ - गुणफलक]. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  9. ^ "Baroda, Bengaluru, Lucknow, and Mumbai to host WPL 2025" [बडोदा, बंगळूर, लखनौ आणि मुंबई २०२५ च्या डब्ल्यूपीएलचे आयोजन करणार आहेत.]. महिला प्रीमियर लीग. १६ जानेवारी २०२५. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  10. ^ "Women's Premier League, 2023/24 batting most runs career Records" [महिला प्रीमियर लीग, २०२३/२४ मध्ये फलंदाजीमध्ये सर्वाधिक धावांचे विक्रम]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  11. ^ "Women's Premier League, 2024/25 bowling most wickets career Records" [महिला प्रीमियर लीग, २०२३/२४ मध्ये फलंदाजीमध्ये सर्वाधिक बळींचे विक्रम]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]