२०२५ महिला क्रिकेट विश्वचषक
| २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक | |||
|---|---|---|---|
| चित्र:2025 Women's Cricket World Cup logo.svg | |||
| दिनांक | ३० सप्टेंबर – २ नोव्हेंबर २०२५ | ||
| व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
| क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय | ||
| स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि बाद फेरी | ||
| यजमान |
भारत श्रीलंका[a] | ||
| विजेते |
| ||
| सहभाग | ८ | ||
| सामने | ३१ | ||
| मालिकावीर |
| ||
| सर्वाधिक धावा |
| ||
| सर्वाधिक बळी |
| ||
| |||
| खालील स्पर्धेचा भाग |
| २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक |
|---|
| स्पर्धा |
|
पात्रता आढावा |
| पात्र संघ |
|
२०२९ महिला क्रिकेट विश्वचषक → |
२०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक ही १३वी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होती. १९७८, १९९७ आणि २०१३ नंतर चवथ्यांदा सदर स्पर्धा भारतात आयोजित केली गेली,[१]तर श्रीलंकेची यजमान म्हणून ही पहिलीच स्पर्धा होती. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश होण्याची ही शेवटची वेळ होती.[२] ऑस्ट्रेलियाचा संघ गतविजेता होता, त्यांनी २०२२ मध्ये सातव्यांदा विजेतेपद मिळविले होते. जून २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) ही स्पर्धा ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणार असल्याचे जाहीर केले.[३] भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून त्यांचे पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवले[४]
पार्श्वभूमी
[संपादन]तटस्थ ठिकाणाची व्यवस्था
[संपादन]१९ डिसेंबर २०२४ रोजी, बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील करारानंतर, आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानने आयोजित केलेल्या सामन्यांबद्दल नमूद केल्याप्रमाणे, २०२४-२०२७ दरम्यान दोन्ही देशांनी आयोजित केलेल्या आयसीसी स्पर्धांमधील भारत आणि पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील याची आयसीसीने पुष्टी केली.[५]
मार्केटिंग
[संपादन]स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, आयसीसीने चषक दौरा आयोजित केला होता, ज्यामध्ये विश्वचषक चार भारतीय यजमान शहरांमधील विविध ठिकाणी आणि नंतर कोलंबोला नेण्यात आला.[६][७] हा दौरा ११ ऑगस्ट रोजी मुंबईत सुरू झाला. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, माजी क्रिकेटपटू मिताली राज आणि युवराज सिंग आणि भारतीय क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यासह, मुंबईत आयोजित ५० दिवसांच्या काउंटडाउन कार्यक्रमात चषक दौऱ्याचा शुभारंभ केला.[८]
उद्घाटन समारंभ
[संपादन]३० सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी गुवाहाटी येथील आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.[९]
भारतीय गायिका श्रेया घोषाल यांनी अधिकृत विश्वचषक गीत "ब्रिंग इट होम" सादर केले.[१०]
पात्रता
[संपादन]| पात्रतेचे साधन | दिनांक | ठिकाण | जागा | पात्र संघ |
|---|---|---|---|---|
| यजमान देश | २६ जुलै २०२२ | — | १ |
|
| २०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप (५ अव्वल संघ, यजमान देशाव्यतिरिक्त) |
१ जून २०२२ – २४ जानेवारी २०२५ | मायदेशी किंवा परदेशी | ५
|
|
| २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता | ९ – १९ एप्रिल २०२५ | पाकिस्तान | २
|
|
| एकूण | ८ | |||
ठिकाणे
[संपादन]| देश | भारत | श्रीलंका | |||
|---|---|---|---|---|---|
| शहर | नवी मुंबई | गुवाहाटी | विशाखापट्टणम | इंदूर | कोलंबो |
| मैदान | डी.वाय. पाटील स्टेडियम | आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम | एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम | होळकर स्टेडियम | आर. प्रेमदासा स्टेडियम |
| प्रेक्षकक्षमता | ४५,३०० | ४६,००० | २७,५०० | ३०,००० | ३५,००० |
| सामने | ५ | ५ | ५ | ५ | ११ |
सुरुवातीला ही स्पर्धा भारतातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी होईल अशी घोषणा करण्यात आली होती; इंदूर, तिरुवनंतपुरम, नवे रायपूर, मुल्लनपूर आणि विशाखापट्टणम,[११] आणि मुल्लनपूर येथे अंतिम सामना होणार होता.[१२] महिला विश्वचषक, पुरुषांच्या स्थानिक सामन्यांसोबतच असल्याने, बीसीसीआयने अनुकूल हवामान परिस्थिती आणि कार्यक्षम दळणवळण व्यवस्थांना प्राधान्य देऊन स्पर्धेसाठी पाच ठिकाणे निवडली होती.[१३]
शिवाय, पाकिस्तान विश्वचषकासाठी पात्र झाल्यानंतर, त्यांचे सामने भारताबाहेर तटस्थ ठिकाणी खेळवले जातील असे ठरले.[१४]
जून २०२५ मध्ये, आयसीसीने विश्वचषकासाठी भारत आणि श्रीलंकेतील अंतिम ठिकाणांची घोषणा केली.[३] ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जाईल. भारतातील बंगळूर, गुवाहाटी, इंदूर आणि विशाखापट्टणम आणि श्रीलंकेतील कोलंबो ही सुरुवातीला जाहीर झाली होती,[१५] परंतु नंतरच्या महिन्यात आयसीसीने बंगळूरऐवजी नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियम निवडले.[१६]
एक उपांत्य सामना नवी मुंबईत, तर दुसरा उपांत्य सामना आणि अंतिम सामन्याचे ठिकाण पाकिस्तान स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचतो की नाही यावर अवलंबून होते. त्यानुसार पहिला उपांत्य सामना गुवाहाटी येथे तर दुसरा उपांत्य सामना आणि अंतिम सामना नवी मुंबई येथे खेळविण्यात आला.
सामना अधिकारी
[संपादन]११ सप्टेंबर २०२५ रोजी, आयसीसीने या स्पर्धेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.[१७][१८] संपूर्ण पॅनेलचे नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनी करण्याची ही पहिलीच वेळ होती.[१९]
सामना अधिकारी
[संपादन]पंच
[संपादन]संघ
[संपादन]प्रत्येक संघाला १५ खेळाडूंचा संघ निवडायचा होता.[२०] १९ ऑगस्ट रोजी, भारत त्यांचा संघ जाहीर करणारा पहिला संघ ठरला.[२१] २१ ऑगस्ट २०२५ रोजी इंग्लंडने त्यांचा संघ जाहीर केला.[२२] बांगलादेशने २३ ऑगस्ट रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[२३] पाकिस्तानने २५ ऑगस्ट रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[२४] दक्षिण आफ्रिकेने ३ सप्टेंबर रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[२५] ऑस्ट्रेलियाने ५ सप्टेंबर रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[२६] न्यू झीलंडने १० सप्टेंबर रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[२७] श्रीलंका हा त्यांचा संघ जाहीर करणारा अंतिम संघ होता, त्यांनी १० सप्टेंबर रोजी संघ जाहीर केला.[२८]
पुरस्कार रक्कम
[संपादन]| टप्पा | संघ | पुरस्कार रक्कम(USD) | एकूण(USD) |
|---|---|---|---|
| विजेते | १ | ६,५८०,००० | ६,५८०,००० |
| उपविजेते | १ | ३,२४०,००० | ३,२४०,००० |
| उपांत्य फेरीसाठी पात्र संघ | २ | १,१२०,००० | २,२४०,००० |
| ५वे व ६वे स्थान | २ | ७००,००० | १,४००,००० |
| ७वे व ८वे स्थान | २ | २८०,००० | ५६०,००० |
| गट फेरीतील विजय | २४ (अंदाजे) | ३४,३१४ | ८२३,५३६ |
| सहभाग शुल्क | ८ | २५०,००० | २,०००,००० |
| एकूण | १३,८८०,००० |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने एकूण $१३.८८ दशलक्ष बक्षीस शुल्क जाहीर केले.[३०] २०२२ च्या न्यू झीलंडमधील आवृत्तीसाठी जाहीर केलेल्या ३.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत एकूण बक्षीस रकमेत ही २९७% वाढ आहे आणि २०२३ पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या एकूण बक्षीस रकमेपेक्षाही जास्त आहे. विजेत्या संघाची ६.५८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स बक्षीस रक्कम २०२३ च्या पुरुषांच्या आवृत्तीत देण्यात आलेल्या ४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स पेक्षाही जास्त आहे, जी क्रिकेटमध्ये लैंगिक समानतेसाठी एक ऐतिहासिक वचनबद्धता अधोरेखित करते.[३१]
सराव सामने
[संपादन]विश्वचषकापूर्वी, सहभागी देश २५ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान नऊ सराव सामन्यांमध्ये भाग घेतील. या सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय किंवा लिस्ट अ दर्जा मिळणार नाही. जुलै २०२५ मध्ये, आयसीसीने सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.[३२]
साखळी सामने
[संपादन]गुणफलक
[संपादन]| स्थान | संघ |
सा | वि | प | अ | गुण | धावगती | पात्रता |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ७ | ६ | ० | १ | १३ | २.१०२ | बाद फेरीसाठी पात्र | |
| २ | ७ | ५ | १ | १ | ११ | १.२३३ | ||
| ३ | ७ | ५ | २ | ० | १० | −०.३७९ | ||
| ४ | ७ | ३ | ३ | १ | ७ | ०.६२८ | ||
| ५ | ७ | १ | ३ | ३ | ५ | −१.०३५ | ||
| ६ | ७ | १ | ४ | २ | ४ | −०.८७६ | ||
| ७ | ७ | १ | ५ | १ | ३ | −०.५७८ | ||
| ८ | ७ | ० | ४ | ३ | ३ | −२.६५१ |
स्रोत:आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती, ईएसपीएन क्रिकइन्फो
(य) यजमान; (वि) विजेते; (उवि) उपविजेते;
| संघ | साखळी सामने | बाद फेरी | |||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | उपांत्य | अंतिम | |||||||||||
| २ | ४ | ६ | ७ | ९ | ९ | ११ | प | ||||||||||||
| २ | ३ | ५ | ७ | ९ | ११ | १३ | प | ||||||||||||
| ० | २ | ४ | ६ | ८ | १० | १० | वि | प | |||||||||||
| ० | ० | २ | ३ | ४ | ४ | ४ | |||||||||||||
| ० | ० | ० | १ | २ | २ | ३ | |||||||||||||
| २ | २ | २ | २ | २ | २ | ३ | |||||||||||||
| २ | ४ | ४ | ४ | ४ | ६ | ७ | वि | वि | |||||||||||
| ० | १ | १ | २ | २ | ४ | ५ | |||||||||||||
|
विजय | पराभव | सामना अणिर्नित | ||||||||||||||||
|
साखळी फेरीत संघ बाद. | ||||||||||||||||||
सामने
[संपादन]आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) १६ जून २०२५ रोजी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.[३३] २२ ऑगस्ट २०२५ रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले.[१६]
वि
|
२११ (४५.४ षटके) | |
वि
|
२३७ (४३.२ षटके) | |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- या ठिकाणी खेळवला गेलेला हा पहिला महिला एकदिवसीय सामना होता.[३६][३७]
- फीबी लिचफिल्डने (ऑ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील १,००० धावा पूर्ण केल्या.[३८]
- आमेलिया केरने (न्यू) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील १००वा बळी घेतला.[३९]
- सोफी डिव्हाइन (न्यू) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ४,००० धावा पूर्ण केल्या.[४०]
वि
|
१३१/३ (३१.१ षटके) | |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रुबिया हैदरने (बां) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
वि
|
७३/० (१४.१ षटके) | |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हीथर नाइटचा (इं) हा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[४१]
वि
|
१५९ (४३ षटके) | |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- फातिमा सना (पा) हिने तिचा १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[४३]
- दीप्ती शर्माने (भा) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची ४,०००वी धाव घेतली.[४४]
वि
|
२३४/४ (४०.५ षटके) | |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सुझी बेट्स (न्यू) ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५० सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.[४५]
- सोफी डिव्हाइन (न्यू) हिने तिचा ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला..[४६]
- क्लोई ट्रायॉन (द) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचा १०० वा बळी घेतला.[४७]
- लॉरा वॉल्व्हार्ड (द) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचा ७,००० वा धावा पूर्ण केला.[४८]
वि
|
११४ (३६.३ षटके) | |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बेथ मूनी आणि अलाना किंग (ऑ) यांच्यातील १०६ धावांच्या भागीदारीने महिला एकदिवसीय सामन्यात ९व्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम मोडला. त्यांनी ॲशली गार्डनर आणि किम गार्थ यांच्या २०२४ मधील ७७ धावांच्या विक्रमाला मागे टाकले. [४९]
- ॲनाबेल सदरलँड (ऑ) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचा १०० वा बळी घेतला.[५०]
वि
|
२५२/७ (४८.५ षटके) | |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लॉरा वॉल्व्हार्ड (द) हिने तिचा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[५१]
- रिचा घोष (भा) हिने एकदिवसीय कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या.[५२][५३]
- रिचा घोष आणि स्नेह राणा यांच्यातील ८८ धावांची भागीदारी ही महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये ८व्या गड्यासाठी भारताची सर्वोच्च भागीदारी होती.[५४]
वि
|
१२७ (३९.५ षटके) | |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लिया ताहुहुचा (न्यू) हा १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[५५]
- ब्रुक हालीडेने (न्यू) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील १,००० धावा पूर्ण केल्या.[५६]
वि
|
१६४ (४५.५ षटके) | |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नॅटली सायव्हरने (इं) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८,००० धावा पूर्ण केल्या.[५७]
वि
|
३३१/७ (४९ षटके) | |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- स्मृती मंधानाच्या (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील ५,००० धावा पूर्ण.[५८]
- हर्लीन देओलच्या (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील १,००० धावा पूर्ण.[५९]
- ॲनाबेल सदरलँडने (ऑ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीमध्ये पहिल्यांदाच बळींचे पंचक घेतले.[६०]
- महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता. [६१]
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.[६२]
- निलाक्षी डि सिल्व्हाच्या (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील १,००० धावा पूर्ण.[६३]
वि
|
३४/० (६.४ षटके) | |
उमैमा सोहेल १९* (१८)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३१ षटकांचा करण्यात आला.
- पाकिस्तान समोर विजयासाठी ३१ षटकांमध्ये ११३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.[६४]
- सोफिया डंकलीच्या (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील १,००० धावा पूर्ण.[६५]
वि
|
२०२/० (२४.५ षटके) | |
अलिसा हीली 113* (77)
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अलिसा हीलीच्या (ऑ) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७,००० धावा पूर्ण.[६६]
- या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र.
वि
|
१२५/० (१४.५ षटके) | |
लॉरा वॉल्व्हार्ड ६०* (४७)
|
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा खेळविण्यात आला.
- दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २० षटकांमध्ये १२१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा खेळविण्यात आला.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.[६७]
- उमैमा सोहेल (पा) हिने तिचा १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[६८]
- आमेलिया केर (न्यू) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचा २००वा बळी घेतला.[६९]
- या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र.
वि
|
२८४/६ (५० षटके) | |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हीथर नाइटचा (इं) हा ३००वा आंतरराष्ट्रीय सामना होता.[७०]
- दीप्ती शर्मा एकदिवसीय सामन्यात १५० बळी घेणारी भारताची दुसरी गोलंदाज आणि पहिली फिरकी गोलंदाज ठरली.[७१][७२]
- या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड उपांत्य फेरीसाठी पात्र.
वि
|
१९५/९ (५० षटके) | |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ह्या मैदानावरील हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[७३][७४]
- हसिनी परेराच्या (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील १,००० धावा पूर्ण.[७५]
- चामरी अटापट्टू (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील ४,००० धावा पूर्ण.[७६]
- या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश स्पर्धेतून बाद.
वि
|
८३/७ (२० षटके) | |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.
- पावसामुळे पाकिस्तानसमोर २० षटकांमध्ये २३४ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाद.
वि
|
२७१/८ (४४ षटके) | |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
- पावसामुळे न्यूझीलंडसमोर ४४ षटकांमध्ये ३२५ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- लिया ताहुहुचा (न्यू) हा २००वा आंतरराष्ट्रीय सामना होता.[७७]
- प्रतिका रावळ (भा) ही महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये डावांच्या बाबतीत १००० धावा करणारी संयुक्तपणे सर्वात जलद क्रिकेटपटू ठरली (२३ डाव).[७८][७९]
- भारताची ३४० ही विश्वचषक स्पर्धेत आणि महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडविरुद्धची त्यांची सर्वोच्च डावांची धावसंख्या होती.[८०]
- रेणुका सिंगने (भा) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००वा बळी घेतला.[८१]
- या सामन्याच्या निकालामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र तर न्यूझीलंड आणि श्रीलंका स्पर्धेतून बाहेर.[८२]
वि
|
||
उमैमा सोहेल ९* (९)
|
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.[८३]
- सिद्रा अमीनचा (पा) हा १५० वा आंतरराष्ट्रीय सामना होता.[८४]
वि
|
१७२/२ (२९.२ षटके) | |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मॅडी ग्रीन (न्यू) हा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता.[८५]
- सोफी डिव्हाइनचा (न्यू) हा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[८६]
वि
|
५७/० (८.४ षटके) | |
स्मृती मंधाना ३४* (२७)
|
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २७ षटकांचा करण्यात आला.
- पावसामुळे भारतासमोर २७ षटकांमध्ये १२६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.[८७]
- उमा चेत्रीने (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- शोभना मोस्तारीच्या (बां) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १,००० धावा पूर्ण.[८८]
बाद फेरी
[संपादन]| उपांत्य सामने | अंतिम सामना | |||||||
| ३ | |
३१९/७ (५० षटके) | ||||||
| २ | |
१९४ (४२.३ षटके) | ||||||
| उसा१ | |
२४६ (४५.३ षटके) | ||||||
| उसा२ | |
२९८/७ (५० षटके) | ||||||
| १ | |
३३८ (४९.५ षटके) | ||||||
| ४ | |
३४१/५ (४८.३ षटके) | ||||||
उपांत्य सामने
[संपादन]वि
|
१९४ (४२.३ षटके) | |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लॉरा वॉल्व्हार्डच्या (दआ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये ५,००० धावा पूर्ण.[८९]
- महिला एकदिवसीय विश्वचषक इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनण्यासाठी मेरिझॅन कॅप (द आ) झुलन गोस्वामीचा विक्रम मोडला.[९०]
- दक्षिण आफ्रिका प्रथमच महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र.[९१][९२]
वि
|
३४१/५ (४८.३ षटके) | |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रिचा घोषचा (भा) हा ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[९३]
- ॲनाबेल सदरलँडचा (ऑ) हा १००वा आंतरराष्ट्रीय सामना होता.[९४]
- महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता. [९५][९६]
अंतिम सामना
[संपादन]वि
|
२४६ (४५.३ षटके) | |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लॉरा वॉल्व्हार्ड (द) ही महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात शतक झळकावणारी पहिली कर्णधार बनली.[९७]
- भारताचे हे पहिले विश्वचषक जेतेपद होते.[९८]
आकडेवारी
[संपादन]सर्वाधिक धावा
[संपादन]| धावा | खेळाडू | सा | डा | ना | सरसरी | सर्वाधिक | स्ट्रा.रे. | १०० | ५० |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ५७१ | ९ | ९ | १ | ६७.१४ | १६९ | ९७.९१ | २ | ३ | |
| ४३४ | ९ | ९ | १ | ५४.२५ | १०९ | ९९.०८ | १ | २ | |
| ३२८ | ७ | ५ | १ | ८२.०० | १४२ | १३०.१५ | २ | १ | |
| ३०८ | ७ | ६ | ० | ५१.३३ | १२२ | ७७.७७ | १ | १ | |
| ३०४ | ७ | ७ | १ | ५०.६६ | ११९ | ११२.५९ | १ | १ | |
| स्रोत | |||||||||
सर्वाधिक बळी
[संपादन]| बळी | खेळाडू | सा | डा | सर्वोत्तम | सरासरी | इकॉ. | स्ट्रा.रे. | ४ब | ५ब |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| २२ | ९ | ९ | ५/३९ | २०.४० | ५.५२ | २२.१८ | १ | १ | |
| १७ | ७ | ७ | ५/४० | १५.८२ | ४.४५ | २१.२९ | ० | १ | |
| १६ | ७ | ७ | ४/१७ | १४.२५ | ४.०५ | २१.०६ | २ | ० | |
| १४ | ९ | ९ | ३/४१ | २७.६४ | ४.९६ | ३३.४२ | ० | ० | |
| १३ | ७ | ७ | ७/१८ | १७.३८ | ४.०३ | २५.८४ | ० | १ | |
| ९ | ९ | ४/४० | २२.६९ | ४.८३ | २८.१५ | १ | ० | ||
| स्रोत | |||||||||
सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा
[संपादन]| Score | खेळाडू | ४ | ६ | स्ट्रा.रे. | विरुद्ध | ठिकाण | दिनांक |
|---|---|---|---|---|---|---|---|
| १६९ (१४३) | २० | ४ | ११८.१८ | गुवाहाटी | २९ ऑक्टोबर २०२५ | ||
| १४२ (१०७) | २१ | ३ | १३२.७१ | विशाखापट्टणम | १२ ऑक्टोबर २०२५ | ||
| १२७* (१३४) | १४ | ० | ९४.७८ | नवी मुंबई | ३० ऑक्टोबर २०२५ | ||
| १२२ (१३४) | १३ | २ | ९१.०४ | २३ ऑक्टोबर २०२५ | |||
| ११९(९३) | १७ | ३ | १२७.९६ | ३० ऑक्टोबर २०२५ | |||
| स्त्रोत | |||||||
सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी पृथ्थकरण
[संपादन]| पृथ्थकरण | गोलंदाज | ष | नि | इ | विरुद्ध | ठिकाण | दिनांक |
|---|---|---|---|---|---|---|---|
| ७–१८ | ७.० | २ | २.५७ | इंदूर | २५ ऑक्टोबर २०२५ | ||
| ५–२० | ७.० | ३ | २.८५ | गुवाहाटी | २९ ऑक्टोबर २०२५ | ||
| ५–३९ | ९.३ | ० | ४.१० | नवी मुंबई | २ नोव्हेंबर २०२५ | ||
| ५–४० | ९.५ | ० | ४.०६ | विशाखापट्टणम | १२ ऑक्टोबर २०२५ | ||
| ४–१७ | १०.० | ३ | १.७० | कोलंबो | ११ ऑक्टोबर २०२५ | ||
| स्त्रोत | |||||||
सर्वाधिक सांघिक धावसंख्या
[संपादन]| धावसंख्या | संघ | विरुद्ध | ठिकाण | निकाल | दिनांक |
|---|---|---|---|---|---|
| ३४१/५ (४८.३ षटके) | नवी मुंबई | विजयी | ३० ऑक्टोबर २०२५ | ||
| ३४०/३ (४९ षटके) | विजयी | २३ ऑक्टोबर २०२५ | |||
| ३३८ (४९.५ षटके) | पराजय | ३० ऑक्टोबर २०२५ | |||
| ३३१/७ (४९ षटके) | विशाखापट्टणम | विजयी | १२ ऑक्टोबर २०२५ | ||
| ३३० (४८.५ षटके) | पराजय | ||||
| स्रोत | |||||
स्पर्धेचा संघ
[संपादन]४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयसीसीने स्पर्धेतील संघाची घोषणा केली, ज्यामध्ये दीप्ती शर्माला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू[९९] आणि लॉरा वॉल्व्हार्डला संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले.[१००]
| खेळाडू | भूमिका |
|---|---|
| सलामीवीर फलंदाज | |
| सलामीवीर फलंदाज/कर्णधार | |
| फलंदाज | |
| अष्टपैलू | |
| अष्टपैलू | |
| अष्टपैलू | |
| अष्टपैलू | |
| अष्टपैलू | |
| यष्टीरक्षक फलंदाज | |
| गोलंदाज | |
| गोलंदाज | |
| बारावी खेळाडू |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]नोंदी
[संपादन]- ^ या स्पर्धेचे अधिकृत यजमानपद भारताकडे होते. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील करारानंतर, आयसीसीने श्रीलंकेला सर्व पाकिस्तानी सामने तसेच काही श्रीलंकेच्या सामन्यांचे यजमानपद दिले.[१५]
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Hosts for ICC Women's global events until 2027 announced" [२०२७ पर्यंत आयसीसी महिला जागतिक स्पर्धांचे यजमानपद जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC announces expansion of the women's game" [आयसीसीतर्फे महिला क्रिकेटच्या विस्ताराची घोषणा]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b "Dates, venues confirmed for 2025 Women's Cricket World Cup" [२०२५ महिला क्रिकेट विश्वचषकासाठी तारखा आणि ठिकाणे निश्चित]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Deepti, Shafali shine as India claim maiden World Cup title | ICC Women's Cricket World Cup, 2025" [दीप्ती आणि शेफाली चमकले, भारताने जिंकला पहिला विश्वचषक | आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक, २०२५]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०२५. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Update issued on India and Pakistan hosted matches at ICC events" [आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानने आयोजित केलेल्या सामन्यांबद्दल माहिती प्रसारित.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ डिसेंबर २०२४. २१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC Women's World Cup Trophy Tour Showcases Indore's Cricket Spirit & Ignites Excitement" [आयसीसी महिला विश्वचषक ट्रॉफी टूरने घडवले इंदूरच्या क्रिकेट जोमाचे दर्शन आणि उत्साहाचे वातावरण तयार]. न्यूज १८. २६ ऑगस्ट २०२५. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC Womens World Cup 2025 Trophy Tour Ignites Excitement In Indore" [आयसीसी महिला विश्वचषक २०२५ ट्रॉफी टूरमुळे इंदूरमध्ये उत्साहाचे वातावरण]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स. २६ ऑगस्ट २०२५. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India icons mark '50 days to go' for Women's World Cup 2025". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ ऑगस्ट २०२५. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Shreya Ghoshal To Perform At Women's World Cup Opening Ceremony" [महिला विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात श्रेया घोषाल सादरीकरण करणार]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Shreya Ghoshal to perform at Opening Ceremony of ICC Women's Cricket World Cup 2025" [आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या उद्घाटन समारंभात श्रेया घोषाल सादरीकरण करणार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India set to host Women's ODI World Cup in September: Check likely dates, venues and other details" [सप्टेंबरमध्ये भारत महिला एकदिवसीय विश्वचषक आयोजित करणार: संभाव्य तारखा, ठिकाणे आणि इतर तपशील तपासा]. द इकॉनॉमिक टाइम्स. २५ मार्च २०२५. २१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Mullanpur to host the final of Women's World Cup 2025" [महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना मुल्लनपूर येथे.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ मार्च २०२५. २१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Women's World Cup 2025 to begin from September; Indore, Thiruvananthapuram, Vizag among tentative venues" [महिला विश्वचषक २०२५ सप्टेंबरपासून सुरू होणार; इंदूर, तिरुवनंतपुरम, विझाग येथे संभाव्य ठिकाणे]. स्पोर्टस्टार. २२ मार्च २०२५. २१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sana's all-round heroics take Pakistan to ODI World Cup" [सनाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ एप्रिल २०२५. २१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b "Women's ODI World Cup at four Indian venues and Colombo" [महिला एकदिवसीय विश्वचषक चार भारतीय ठिकाणी आणि कोलंबो येथे]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b "Revised schedule confirmed for ICC Women's Cricket World Cup" [आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे सुधारित वेळापत्रक जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Historic all-female match official panel revealed for CWC25" [क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी ऐतिहासिक सर्व-महिला सामन्यांचे अधिकृत पॅनेल जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "२०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्व-महिला पॅनेल कार्य करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC names all-female officiating panel for the Women's ODI World Cup" [आयसीसीतर्फे महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी सर्व-महिला अधिकारी पॅनेलची निवड]. क्रिकबझ्झ. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "All the squads for ICC Women's Cricket World Cup 2025". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० सप्टेंबर २०२५. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Hosts India reveal squad for Women's World Cup 2025" [२०२५ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारताचा संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ ऑगस्ट २०२५. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England reveal star-studded squad for Women's World Cup 2025" [२०२५ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा स्टार खेळाडूंनी सजलेला संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 21 August 2025. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh unveil Women's Cricket World Cup 2025 squad" [२०२५ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ ऑगस्ट २०२५. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Talented uncapped batter in Pakistan's squad for CWC25" [क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी पाकिस्तानच्या संघात प्रतिभावान नवोदित फलंदाज]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ ऑगस्ट २०२५. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "South Africa unveil Women's Cricket World Cup squad" [२०२५ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ सप्टेंबर २०२५. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Defending champions Australia name strong CWC25 squad" [गतविजेत्या ऑस्ट्रेलियातर्फे क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी मजबूत संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ सप्टेंबर २०२५. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "New Zealand announce Women's Cricket World Cup squad" [२०२५ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडच संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० सप्टेंबर २०२५. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka reveal squad for Women's World Cup 2025" [२०२५ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० सप्टेंबर २०२५. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Record USD 13.88 million prize money for 2025 Women's ODI World Cup" [२०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी विक्रमी १३.८८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Record prize money revealed for Women's Cricket World Cup" [महिला क्रिकेट विश्वचषकासाठी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC announce massive prize money hike for Women's ODI World Cup 2025" [महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ साठी आयसीसीने बक्षीस रकमेत मोठी वाढ जाहीर केली आहे.]. क्रिकबझ्झ. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Warm-up schedule out for ICC Women's Cricket World Cup 2025" [आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Schedule unveiled for 2025 ICC Women's Cricket World Cup" [२०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Guwahati to host four league matches of ICC Women's World Cup 2025" [आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या चार साखळी सामन्यांचे आयोजन गुवाहाटी करणार.]. द आसाम ट्रिब्यून. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Guwahati set to host its first Test match, world cup match in 2025: BCCI secretary" [२०२५ मध्ये गुवाहाटी पहिला कसोटी सामना आणि विश्वचषक सामना आयोजित करणार: बीसीसीआय सचिव]. द इकॉनॉमिक टाइम्स. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Indore to host five matches of ICC Women's World Cup" [आयसीसी महिला विश्वचषकाचे पाच सामने इंदूरमध्ये होणार.]. द टाईम्स ऑफ इंडिया. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Indore To Host 5 Matches Of ICC Women's ODI World Cup 2025 At Holkar Stadium" [इंदूरमध्ये होळकर स्टेडियमवर आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेचे ५ सामने होणार.]. द फ्री प्रेस जर्नल. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Phoebe Litchfield Becomes 2nd Youngest Australian After Meg Lanning to 1000 ODI Runs" [फीबी लिचफिल्ड बनली मेग लॅनिंगनंतर १००० एकदिवसीय धावा करणारी दुसरी सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "New Zealand's Amelia Kerr Becomes Youngest to Complete 100th ODI Wicket, Achieves Historic Double" [न्यूझीलंडची अमेलिया केर १०० एकदिवसीय बळी घेणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली, ऐतिहासिक दुहेरी विकेटची नोंद केली.]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "सोफी डिव्हाइन Becomes Only the 4th New Zealander to Surpass 4,000 ODI Runs Landmark" [सोफी डिव्हाईन ४,००० एकदिवसीय धावांचा टप्पा पार करणारा केवळ चवथी न्यूझीलंड क्रिकेटपटू ठरली.]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Heather Knight Becomes Only the 2nd English Player, After Charlotte Edwards, to Reach 150 ODI Appearances" [हिथर नाइट ठरली शार्लोट एडवर्ड्स नंतर १५० एकदिवसीय सामने खेळणारी दुसरी इंग्लिश खेळाडू.]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Australia-Sri Lanka CWC25 match abandoned due to rain" [ऑस्ट्रेलिया-श्रीलंका क्रिकेट विश्वचषक २०२५ सामना पावसामुळे रद्द]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ @imfemalecricket (5 October 2025). "Fatima Sana takes the field for her 100th international!" [फातिमा सना तिच्या १००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानात उतरली!] (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Deepti Sharma Completes 4000 International Runs for India" [दीप्ती शर्माने भारतासाठी ४००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Suzie Bates Scripts History with 350th International Appearance for New Zealand" [न्यू झीलंडसाठी ३५०व्या आंतरराष्ट्रीय सामना खेळून सुझी बेट्सने रचला इतिहास]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Suzie Bates Opens Up on Milestone 350th Match, Devine's 300th, and Australia Loss" [सुझी बेट्सचा माइलस्टोन ३५०वा सामना, डिव्हाइनचा ३००वा सामना आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Chloe Tryon completes 100 International Wickets for South Africa" [क्लो ट्रायॉनचे दक्षिण आफ्रिकेसाठी १०० आंतरराष्ट्रीय बळी]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Laura Wolvaardt Becomes the First South African to Surpass 7000 International Runs" [लॉरा वोल्वार्ड ठरली ७००० आंतरराष्ट्रीय धावा ओलांडणारी पहिली दक्षिण आफ्रिकी खेळाडू]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Beth Mooney And Alana King Create History, Become 1st Batting Pair To..." [बेथ मुनी आणि अलाना किंग यांनी रचला इतिहास, पहिली फलंदाज जोडी बनली...]. न्यूज १८. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Australian All-Rounder Annabel Sutherland Joins the 100 International Wickets Club" [ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू अॅनाबेल सदरलँड १०० आंतरराष्ट्रीय विकेट्स क्लबमध्ये सामील]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Laura Wolvaardt Completes 200 International Appearances for South Africa" [लॉरा वोल्वार्डने दक्षिण आफ्रिकेसाठी २०० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "IND vs SA: Richa Ghosh becomes fastest Indian to 1000 runs in Women's ODIs by balls faced" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: रिचा घोष महिला एकदिवसीय सामन्यात चेंडूंचा सामना करून सर्वात जलद १००० धावा करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली.]. स्पोर्टस्टार. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Richa Ghosh Becomes Only the 2nd Indian Keeper-Batter to 1,000 ODI Runs Milestone" [रिचा घोष ठरली, १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज.]. फिमेल क्रिकेट. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "IND vs SA: List of records broken, milestones during India vs South Africa Women's ODI World Cup 2025 match" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ सामन्यात मोडलेल्या विक्रमांची यादी, टप्पे]. स्पोर्टस्टार. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Veteran Pacer Lea Tahuhu Makes 100th ODI Appearance for New Zealand" [अनुभवी वेगवान गोलंदाज ली ताहुहू न्यूझीलंडतर्फे १००व्या एकदिवसीय सामन्यात सहभागी]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Brooke Halliday Completes 1000 ODI Runs for New Zealand" [ब्रुक हॅलिडेच्या न्यूझीलंडसाठी १००० एकदिवसीय धावा पूर्ण]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Nat Sciver-Brunt Joins Elite 8,000-Run Club with Record-Breaking World Cup Century against Sri Lanka" [श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषकात विक्रमी शतक झळकावून नॅट सायव्हर-ब्रंट एलिट ८,००० धावांच्या क्लबमध्ये सामील.]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Smriti Mandhana Becomes Fastest and Only Second Indian Woman to Surpass 5000 ODI Runs" [स्मृती मानधना ५००० एकदिवसीय धावा ओलांडणारी सर्वात जलद आणि केवळ दुसरी भारतीय महिला ठरली]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Harleen Deol Surpasses 1000 ODI Runs Milestone for India" [हर्लीन देओलचा भारतासाठी १००० एकदिवसीय धावांचा टप्पा पार]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Australia's Annabel Sutherland becomes only 2nd ODI cricketer to achieve unique birthday feat" [ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँड ठरली वाढदिवसाच्या दिवशी अनोखा पराक्रम करणारी केवळ दुसरी एकदिवसीय क्रिकेटपटू]. अशियन न्यूज इंटरनॅशनल. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Australia smash records in highest-ever chase in Women's ODIs" [ऑस्ट्रेलियाने मोडला महिला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम]. क्रिकबझ्झ. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rain washes out Sri Lanka-New Zealand CWC25 clash" [श्रीलंका-न्यूझीलंड क्रिकेट विश्वचषक २०२५ सामना पावसामुळे रद्द]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Nilakshika Silva Completes 1000 ODI Runs for Sri Lanka with a Record Fifty Against New Zealand" [न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी अर्धशतक झळकावत श्रीलंकेसाठी निलक्षीका सिल्वाने पूर्ण केल्या १००० एकदिवसीय धावा.]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rain washes out England-Pakistan CWC25 clash" [इंग्लंड-पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक २०२५ सामना पावसामुळे रद्द]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England's Sophia Dunkley Completes 1000 ODI Runs" [इंग्लंडच्या सोफिया डंकलीने १००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Alyssa Healy Becomes Only the 3rd Australia Women to Surpass 7000 International Runs" [७००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडणारी एलिसा हिली ठरली ऑस्ट्रेलियाची केवळ तिसरी महिला खेळाडू.]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "New Zealand and Pakistan share CWC25 points in Colombo" [कोलंबोमध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट विश्वचषक २५ मध्ये गुण वाटून.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Pakistan's Omaima Sohail Makes Her 100th International Appearance" [पाकिस्तानच्या ओमैमा सोहेलचा १००वा आंतरराष्ट्रीय सामना.]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Star New Zealand All-Rounder आमेलिया केर Completes 200 International Wickets" [स्टार न्यूझीलंड अष्टपैलू आमेलिया केरचे २०० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Heather Knight becomes only the 3rd English player to 300 Internationals" [हीथर नाइट ठरली ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी केवळ तिसरी इंग्लिश खेळाडू.]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "150 Wickets And Counting: Deepti Sharma's Rise Continues in WODIs" [१५० विकेट्स आणि आणखी: महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये दीप्ती शर्माची वाढ सुरूच.]. Cricket.com. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Deepti Sharma Creates History as the First Indian Spinner to Claim 150 ODI Wickets" [दीप्ती शर्माने रचला १५० एकदिवसीय बळी घेणारी पहिली भारतीय फिरकी गोलंदाज म्हणून इतिहास.]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "DY Patil Stadium Replaces Bengaluru's Chinnaswamy as Women's World Cup 2025 Venue" [महिला विश्वचषक २०२५ चे ठिकाण म्हणून बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची जागा डी वाय पाटील स्टेडियम घेणार.]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Navi Mumbai replaces Bengaluru as venue for women's ODI World Cup" [महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बेंगळुरूऐवजी नवी मुंबई]. द ट्रिब्यून (इंडिया). ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Hasini Perera's Career-Best Innings Takes Her Past 1000 ODI Runs Mark" [कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करत हसिनी परेराने गाठला १००० एकदिवसीय धावांचा टप्पा]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Chamari Athapaththu Becomes the First Sri Lankan Woman to Surpass 4,000 ODI Runs" [चामरी अटापट्टू ठरली ४००० एकदिवसीय धावा ओलांडणारी पहिली श्रीलंकेची महिला खेळाडू.]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Lea Tahuhu Becomes Only the Fifth New Zealander to 200 Internationals" [लिया ताहुहु २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी न्यूझीलंडची फक्त पाचवी खेळाडू ठरली.]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Pratika Rawal equals world record, joint-fastest to 1000 runs in women's ODIs" [प्रतिका रावळने केली महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद १००० धावा पूर्ण करण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी.]. स्पोर्टस्टार. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Pratika Rawal Becomes Fastest Indian to Score 1000 ODI Runs in Just 23 Innings" [प्रतिका रावल फक्त २३ डावात १००० एकदिवसीय धावा करणारी सर्वात जलद भारतीय खेळाडू ठरली]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India register highest-ever ODI World Cup total against New Zealand in Navi Mumbai" [नवी मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध भारताने नोंदवली एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या.]. इंडिया टीव्ही. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Renuka Singh Thakur Becomes the Fastest Indian Pacer to Claim 100 International Wickets" [रेणुका सिंग ठाकूर ठरली सर्वात जलद १०० आंतरराष्ट्रीय बळी घेणारी भारतीय गोलंदाज]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Women's ODI World Cup 2025 Points Table: India knocks out New Zealand to make semifinals" [महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ गुणतालिका: भारताचा न्यूझीलंडला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश]. Sportstar. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka-Pakistan CWC25 clash called off due to rain" [श्रीलंका-पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक २०२५ सामना पावसामुळे रद्द]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sidra Amin Marks 150th International Appearance for Pakistan in Sri Lanka World Cup Match" [श्रीलंका विश्वचषक सामन्यात पाकिस्तानकडून सिद्रा अमीनचा १५० वा आंतरराष्ट्रीय सामना होता]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Maddy Green completes 200 International Games for New Zealand" [मॅडी ग्रीनने न्यूझीलंडसाठी २०० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sophie Devine fights back tears during national anthem before last ODI match for New Zealand: 'It's an emotional day'" [न्यूझीलंडसाठी शेवटच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी राष्ट्रगीताच्या वेळी सोफी डिव्हाईनने अश्रूंना तोंड दिले: 'हा एक भावनिक दिवस आहे']. हिंदुस्थान टाइम्स. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India, Bangladesh share points, England nab big CWC25 win" [भारत आणि बांगलादेशने गुण वाटून घेतले, इंग्लंडचा क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये मोठा विजय]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "शोभना मोस्तारी Completes 1000 Career Runs for Bangladesh Women" [शोभना मोस्तारीच्या बांगलादेश महिलांसाठी कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Laura Wolvaardt Becomes the First South African Woman to Surpass 5000 ODI Runs" [लॉरा वोल्वार्ड ५००० एकदिवसीय धावा ओलांडणारी पहिली दक्षिण आफ्रिकी महिला ठरली]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Marizanne Kapp breaks Jhulan Goswami's record, becomes highest wicket-taker in Women's ODI World Cup history" [मॅरिझाने झुलन महिला एकदिवसीय विश्वचषक इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनली, गोस्वामीचा विक्रम मोडला]. स्पोर्टस्टार. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Records shatter as South Africa enter maiden ODI World Cup final" [दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने विक्रम मोडले]. क्रिकबझ्झ. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Laura Wolvaardt and Marizanne Kapp Lead South Africa to their Maiden World Cup Final" [लॉरा वोल्वार्ड आणि मारिझान कॅपने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ @imfemalecricket (30 October 2025). "𝐌𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐦𝐨𝐦𝐞𝐧𝐭! Richa Ghosh takes field for her 50th ODI" [𝐌𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐦𝐨𝐦𝐞𝐧𝐭! रिचा घोष तिच्या ५० व्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरली] (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Australia's Annabel Sutherland Marks 100th International During Semifinal" [ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडने उपांत्य फेरीत १०० वे आंतरराष्ट्रीय सामने साजरे केले]. फिमेल क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India vs Australia, World Cup semifinal: India completes highest successful chase in World Cup knockout match" [भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विश्वचषक उपांत्य फेरी: भारताचा विश्वचषक नॉकआउट सामन्यात सर्वाधिक यशस्वी पाठलाग.]. स्पोर्टस्टार. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India Women pull off record win vs AUS to top highest successful chases in WODIs" [आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी पाठलाग करताना भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी विजय]. वन क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "IND vs SA: Laura Wolvaardt becomes the first captain to score a hundred in Women's World Cup final" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: महिला विश्वचषक अंतिम सामन्यात शतक झळकावणारी लॉरा वोल्वार्ड ठरली पहिली कर्णधार]. क्रिकटुडे. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India win maiden Women's World Cup after Shafali Verma, Deepti Sharma produce all-round masterclass" [शफाली वर्माच्या कामगिरीनंतर भारताने पहिला महिला विश्वचषक जिंकला, दीप्ती शर्माची अफलातून अष्टपैलू खेळी]. हिंदुस्थान टाइम्स. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Deepti Sharma crowned 'Player of the Tournament', achieves historic first-time double across men's, women's World Cups" [दीप्ती शर्माला मालिकावीराचा किताब, पुरुष आणि महिला विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच दुहेरी कामगिरी.]. द इकॉनॉमिक टाइम्स. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Mandhana and Sharma among Indian trio in Wolvaardt-led ICC Women's Cricket World Cup 2025 Team of the Tournament" [वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या संघात भारतीय त्रिकुटामध्ये मंधाना आणि शर्मा यांचा समावेश.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.