Jump to content

२०२५ इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ इंडियन प्रीमियर लीग
चित्र:2025 IPL logo.png
दिनांक २२ मार्च – २५ मे, २०२५
व्यवस्थापक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)
क्रिकेट प्रकार टी२० क्रिकेट
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत
सहभाग १०
सामने ७४
अधिकृत संकेतस्थळ iplt20.com
२०२४ (आधी) (नंतर) २०२६

 

२०२५ इंडियन प्रीमियर लीग तथा आयपीएल १८ किंवा टाटा आयपीएल २०२५ ही स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगची १८ वी आवृत्ती होती. या स्पर्धेत २२ मार्च ते २५ मे २०२५ या कालावधीत दहा संघ ७४ सामने खेळले. ही स्पर्धा भारतातील १३ शहरांमध्ये आयोजित केली गेली होती. याचा उद्घाटन समारंभ आणि अंतिम सामना कोलकाता येथे झाला. कोलकाता नाईट रायडर्स हा गतविजेता असल्याने हे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळले गेले.

कोलकाता नाईट रायडर्सने मागील हंगामाच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला हरवून आपले तिसरे विजेतेपद जिंकले होते.[][]

स्वरूप

[संपादन]

प्रत्येक संघ त्यांच्या गटातील संघांविरुद्ध आणि दुसऱ्या गटातील एका संघाविरुद्ध (खालील तक्त्यातील त्याच ओळीत असलेले संघ) दोनदा आणि दुसऱ्या गटातील उरलेल्या चार संघांविरुद्ध एकदा खेळेल. साखळी सामन्यांनंतर एकूण गुणांच्या आधारे सर्वोच्च चार संघ बाद फेरीत जातील.[] या फेरीत सर्वोच्च दोन संघ एकमेकांशी खेळतील. यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात जाईल. इतर दोन संघ एकमेकांशी खेळतील. पहिल्या सामन्यातील पराभूत संघ दुसऱ्या सामन्यातील विजेत्या संघाशी खेळेल. याचा विजेता अंतिम सामन्यात जाईल.[] या मोसमात जरी ७४ सामने असले तरी पुढील दोन मोसमांत ८४ सामने असतील.[]

गट अ गट ब
चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स
कोलकाता नाईट रायडर्स सनरायझर्स हैदराबाद
राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दिल्ली कॅपिटल्स
पंजाब किंग्ज लखनौ सुपर जायंट्स
गट संघ २०२४मधील कामगिरी मुख्य मार्गदर्शक कर्णधार[]
चेन्नई सुपर किंग्स
५वा
स्टीवन फ्लेमिंग ऋतुराज गायकवाड
कोलकाता नाइट रायडर्स
विजेता
चंद्रकांत पंडित अजिंक्य रहाणे[]
किंग्स XI पंजाब
९वा
रिकी पाँटिंग श्रेयस अय्यर[]
राजस्थान रॉयल्स
३रा
राहुल द्रविड संजू सॅमसन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु
४था
अँडी फ्लॉवर रजत पाटीदार[]
दिल्ली कॅपिटल्स
६वा
हेमांग बदाणी अक्षर पटेल[१०]
गुजरात टायटन्स
८वा
आशिष नेहरा शुभमन गिल
लखनौ सुपर जायंट्स
७वा
जस्टिन लँगर ऋषभ पंत[११]
मुंबई इंडियन्स
१०वा
माहेला जयवर्दने हार्दिक पंड्या
सनरायझर्स हैदराबाद
उपविजेता
डॅनियल व्हेट्टोरी पॅट कमिन्स

मैदाने

[संपादन]

साखळी सामने भारतातील १३ मैदानांमध्ये खेळले जातील. उद्घाटन सामना ईडन गार्डन्सवर होईल. एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये पंजाब किंग्जचे तीन घरचे सामने होतील, बरसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सचे दोन सामने होतील आणि दिल्ली कॅपिटल्स एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये दोन घरचे सामने खेळतील. [१२] [१३] बादफेरीचे पहिले दोन सामने हैदराबादमध्ये खेळवले जातील आणि इतर सामने कोलकातामध्ये खेळले जातील. [१४]

अहमदाबाद बेंगलुरु चेन्नई दिल्ली धरमशाला
गुजरात टायटन्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चेन्नई सुपर किंग्स दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स
नरेंद्र मोदी स्टेडियम एम. चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळूर) एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई) अरुण जेटली स्टेडियम हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
क्षमता: १,३२,००० क्षमता: ३५,००० क्षमता: ३९,००० क्षमता: ३५,२०० क्षमता: २१,२००
गुवाहाटी हैदराबाद
राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबाद
बरसपारा क्रिकेट मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
क्षमता: ४६,००० क्षमता: ५५,०००
जयपूर कोलकाता
राजस्थान रॉयल्स कोलकाता नाइट रायडर्स
सवाई मानसिंह मैदान इडन गार्डन्स
क्षमता: २५,००० क्षमता: ६८,०००
लखनौ मुल्लनपूर गरीबदास मुंबई विशाखापट्टणम
लखनौ सुपर जायंट्स पंजाब किंग्स मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स
इकाना क्रिकेट मैदान महाराजा यादविंद्र सिंग मैदान वानखेडे स्टेडियम एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम
क्षमता: ५०,००० क्षमता: ३८,००० क्षमता: ३३,१०८ क्षमता: २७,५००

संदर्भ

[संपादन]
  1. "KKR's bowlers rip through SRH to win third IPL title". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-05-26. 26 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-05-26 रोजी पाहिले.
  2. "Kolkata Knight Riders thrash Sunrisers Hyderabad to claim third IPL title". The Guardian (इंग्रजी भाषेत). 2024-05-26. ISSN 0261-3077. 2025-01-14 रोजी पाहिले.
  3. "IPL unveils new format for 2022, with two groups and seedings". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 4 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-05-03 रोजी पाहिले.
  4. "IPL 2024: What's the playoff format? Know all about IPL 17 qualifiers, eliminators and grand finale". Financial Express. 21 March 2014. 1 April 2024 रोजी पाहिले.
  5. "IPL 2025: No increase in the number of matches as BCCI wary of India's workload". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-10-01 रोजी पाहिले.
  6. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Cricinfo-squads नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  7. "KKR Captain Announcement LIVE Updates, IPL 2025: Ajinkya Rahane To Lead Defending Champions?". News18 (इंग्रजी भाषेत). 2025-03-03. 2025-03-03 रोजी पाहिले.
  8. "Shreyas Iyer appointed Punjab Kings captain for IPL 2025". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2025-01-12. 2025-01-13 रोजी पाहिले.
  9. "Rajat Patidar appointed new RCB captain for IPL 2025". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2025-02-13. 2025-02-13 रोजी पाहिले.
  10. "Axar Patel to captain Delhi Capitals in IPL 2025". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2025-03-14. 2025-03-14 रोजी पाहिले.
  11. "Rishabh Pant named captain of Lucknow Super Giants". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2025-01-20. 2025-01-20 रोजी पाहिले.
  12. "Vizag to host two Delhi Capitals games upfront in IPL 2025". Cricbuzz. 15 February 2025. 2 March 2025 रोजी पाहिले.
  13. "Rajasthan Royals begin preparation for IPL 2025, to play two home matches in Guwahati and rest in Jaipur". InsideSport. 24 January 2025. 2 March 2025 रोजी पाहिले.
  14. "IPL 2025 start date, playoffs, final venues and live streaming details". बिझनेस स्टँडर्ड. 3 March 2025 रोजी पाहिले.