Jump to content

२०२५ आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ आशिया चषक
दिनांक ९ – २८ सप्टेंबर २०२५
व्यवस्थापक आशिया क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती
विजेते भारतचा ध्वज भारत (९ वेळा)
सहभाग
सामने १९
मालिकावीर {{{alias}}} अभिषेक शर्मा
सर्वाधिक धावा {{{alias}}} अभिषेक शर्मा (३१४)
सर्वाधिक बळी {{{alias}}} कुलदीप यादव (१७)
अधिकृत संकेतस्थळ asiancricket.org
२०२३ (आधी) (नंतर) २०२७ →

२०२५ पुरुषांचा आशिया कप (ज्याला प्रायोजकत्वाच्या कारणास्तव डीपी वर्ल्ड आशिया चषक म्हणूनही ओळखले जाते) ही १७वी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होती. सदर स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली गेली.[] स्पर्धेतील सामने आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपात खेळवले गेले. भारत २०२३ चा गतविजेता होता.[]

या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. आशियाई क्रिकेट परिषदेचे पाच पूर्ण सदस्य, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, भारत आणि श्रीलंका हे संघ आपोआप या स्पर्धेसाठी पात्र ठरले आणि त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिराती, ओमान आणि हाँगकाँग हे संघ सामील झाले, ह्या तीन संघांनी २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर चषक स्पर्धेमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले होते. अंतिम सामन्यात, भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि त्यांचे नववे विजेतेपद जिंकून जेतेपद कायम ठेवले.[][]

पार्श्वभूमी

[संपादन]

जुलै २०२४ मध्ये या स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या, सुरुवातीला स्पर्धेचे आयोजन भारत करणार होता.[] तथापि, २०२५ च्या सुरुवातीला पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी संघर्ष वाढल्यानंतर, दोन्ही देशांचे सामने भारतात आयोजित करण्याच्या व्यवहार्यतेबद्दल चिंता निर्माण झाली. जुलै २०२५ मध्ये, ढाका येथे झालेल्या आशिया क्रिकेट समितीच्या वार्षिक बैठकीत, एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी घोषणा केली की ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली जाईल, ज्यामध्ये दुबई आणि अबू धाबी येथे सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत हाय-प्रोफाइल बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा पूर्वीचा अनुभव असल्यामुळेच युएईला तटस्थ ठिकाण म्हणून निवडण्यात आले.[]

स्वरूप

[संपादन]

ही स्पर्धा आठ संघांना प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागून खेळवण्यात आली. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ एकाच गटातील सुपर फोर टप्प्यात पोहोचले आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले.[]

संघ आणि पात्रता

[संपादन]
  पूर्ण सदस्य म्हणून आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र
  २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर चषक स्पर्धेद्वारे पात्रता
  पात्रता मिळवण्यात अपयशी

आशियाई क्रिकेट परिषदेचे पाच पूर्ण सदस्य या स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरले. २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर चषक स्पर्धेमध्ये अव्वल तीन स्थानांवर राहिल्यानंतर संयुक्त अरब अमिराती, ओमान आणि हाँगकाँग पात्र ठरले.[]

पात्रता परिमाण दिनांक आयोजक जागा पात्र संघ
आयसीसी पूर्ण सदस्य अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
भारतचा ध्वज भारत
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०२४ एसीसी प्रीमियर चषक १२–२१ एप्रिल २०२४ ओमान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
ओमानचा ध्वज ओमान
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
एकूण
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान[] बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[] हाँग काँगचा ध्वज हाँग काँग[१०] भारतचा ध्वज भारत[११] ओमानचा ध्वज ओमान[१२] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[१३] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[१४] संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[१५]

९ सप्टेंबर रोजी, जनिथ लियानागेला श्रीलंकेच्या संघात समाविष्ट करण्यात आले.[१६]

१५ सप्टेंबर रोजी, नवीन उल हक खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी अब्दुल्लाह अहमदझाईने संघात स्थान मिळवले.[१७][१८]

ठिकाणे

[संपादन]

एसीसीने २ ऑगस्ट २०२५ रोजी स्पर्धेच्या ठिकाणांची घोषणा केली.[१९]

दुबई अबु धाबी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शेख झायेद क्रिकेट स्टेडियम
Coordinates: 25°2′48″N 55°13′8″E / 25.04667°N 55.21889°E / 25.04667; 55.21889 Coordinates: 24°23′47″N 54°32′26″E / 24.39639°N 54.54056°E / 24.39639; 54.54056
क्षमता: २५,००० क्षमता: २०,०००
सामने: ११ सामने: ८

सामना अधिकारी

[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) आणि आशिया क्रिकेट समिती (एसीसी) यांनी स्पर्धेसाठी खालील सामना अधिकाऱ्यांची संयुक्तपणे नियुक्ती केली.[२०]

सामनाधिकारी

[संपादन]

सराव सामने

[संपादन]

संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ह्या संघांदरम्यान शारजा येथे आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका खेळवली गेली. ह्या मालिकेत पाकिस्तानने अंतिम सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. आशिया चषक स्पर्धेपूर्वी हाँगकाँग आणि ओमान यांनी एकमेकांशी २ अनधिकृत २० षटकांचे सामने खेळले.

५ सप्टेंबर २०२५
१८:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
२११/६ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१६७/७ (२० षटके)
हम्माद मिर्झा ६९ (३६)
यासिम मुर्तझा २/३० (४ षटके)
अंशुमन रथ ४२ (२३)
हसनैन शाह २/९ (२ षटके)
ओमान ४४ धावांनी विजयी

६ सप्टेंबर २०२५
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१५४/७ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१५७/५ (१८.२ षटके)
झीशान अली ४५ (३१)
समय श्रीवास्तव २/१९ (४ षटके)
हम्माद मिर्झा ६० (३७)
एहसान खान २/२४ (४ षटके)
ओमान ५ गडी राखून विजयी

गट फेरी

[संपादन]

एसीसीने २६ जुलै २०२५ रोजी स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.[२१][२२]

गट अ

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
भारतचा ध्वज भारत +३.५४७ सुपर फोर
फेरीसाठी पात्र
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान +१.७९०
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती (य) −१.९८४
ओमानचा ध्वज ओमान −२.६००

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२३]

१० सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
६०/१ (४.३ षटके)
आलिशान शराफु २२ (१७)
कुलदीप यादव ४/७ (२.१ षटके)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१२ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६०/७ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
६७ (१६.४ षटके)
मोहम्मद हॅरीस ६६ (४३)
आमिर कलीम ३/३१ (४ षटके)
हम्माद मिर्झा २७ (२३)
फहीम अशरफ २/६ (२ षटके)
पाकिस्तान ९३ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: शाहीन आफ्रिदी (पा)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ओमान आणि पाकिस्तान दरम्यान हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.
  • शाह फैसल आणि झिक्रीया इस्लाम ह्या दोघांनी ओमानकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

१४ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१२७/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३१/३ (१५.५ षटके)
सूर्यकुमार यादव ४७* (३७)
सैम अयुब ३/३५ (४ षटके)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१५ सप्टेंबर २०२५
१६:०० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१७२/५ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१३० (१८.४ षटके)
मुहम्मद वसीम ६९ (५४)
जितेन रामानंदी २/२४ (४ षटके)
आर्यन बिश्त २४ (३२)
जुनैद सिद्दीकी ४/२३ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ४२ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: वीरेंद्र शर्मा (भा) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: आलिशान शराफु (युएई)
  • ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • आर्यन बिश्तने (ओ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
  • ओमानचा हा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[२४]
  • मुहम्मद वसीमने (युएई) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील ३००० धावा पूर्ण केल्या.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत सुपर फोर फेरीसाठी पात्र तर ओमान स्पर्धेतून बाद.

१७ सप्टेंबर २०२५
१९:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४६/९ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१०५ (१७.४ षटके)
फखर झमान ५० (३६)
जुनैद सिद्दीकी ४/१८ (४ षटके)
राहुल चोप्रा ३५ (३५)
अबरार अहमद २/१३ (४ षटके)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याशी संबंधित भारत-पाकिस्तान हस्तांदोलन वादावर पीसीबीने निषेध व्यक्त केल्यामुळे सामना एक तास उशिरा सुरू झाला.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान सुपर फोर फेरीसाठी पात्र तर संयुक्त अरब अमिराती स्पर्धेतून बाद.

१९ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८८/८ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१६७/४ (२० षटके)
संजू सॅमसन ५६ (४५)
शाह फैसल २/२३ (४ षटके)
आमिर कलीम ६४ (४६)
कुलदीप यादव १/२३ (३ षटके)
भारत २१ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: फैसल अफ्रिदी (पा) आणि रवींद्र विमलसिरी (श्री)
सामनावीर: संजू सॅमसन (भा)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • भारत आणि ओमान दरम्यान हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.
  • भारताचा हा २५०वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[२५]
  • अर्शदीप सिंग टी२० मध्ये १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.[२६]

गट ब

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +१.२७८ सुपर फोर
फेरीसाठी पात्र
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश −०.२७०
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान +१.२४१
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग −२.१५१

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२३]

९ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१८८/६ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
९४/९ (२० षटके)
बाबर हयात ३९ (४३)
गुल्बदीन नाइब २/८ (३ षटके)
अफगाणिस्तान ९४ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: वीरेंद्र शर्मा (भा) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: अझमतुल्लाह ओमरझाई (अ)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अझमतुल्लाह ओमरझाईने (अ) अफगाणिस्तानची सर्वात जलद अर्धशतकाची (२० चेंडूंत) नोंद केली.[२७]

११ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१४३/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४४/३ (१७.४ षटके)
निजाकत खान ४२ (४०)
तंझीम हसन साकिब २/२१ (४ षटके)
लिटन दास ५९ (३९)
अतीक इक्बाल २/१४ (३.४ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: रोहन पंडित (भा) आणि रवींद्र विमलसिरी (श्री)
सामनावीर: लिटन दास (बां)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रिशाद हुसेन (बां) आणि आयुष शुक्ला (हाँग काँग) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्यांचा ५०वा बळी घेतला.[२८]
  • लिटन दासने महमुद्दुलाला मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये बांगलादेशसाठी सर्वाधिक ७८ षटकारांचा विक्रम मोडला .[२९]
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे हाँग काँग स्पर्धेतून बाद.

१३ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१३९/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४०/४ (१४.४ षटके)
शमीम होसेन ४२* (३४)
वनिंदु हसरंगा २/२४ (४ षटके)
पथुम निसंका ५० (३४)
महेदी हसन २/२९ (४ षटके)
श्रीलंका ६ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: फैसल अफ्रिदी (पा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: कामिल मिशारा (श्री)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पथुम निसंकाने (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील २,००० धावा पूर्ण केल्या.[३०]

१५ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१४९/४ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५३/६ (१८.५ षटके)
निजाकत खान ५२* (३८)
दुश्मंत चमीरा २/२९ (४ षटके)
पथुम निसंका ६८ (४४)
यासिम मुर्तझा २/३७ (४ षटके)
श्रीलंका ४ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: इझातुल्लाह सफी (अ) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: पथुम निसंका (श्री)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही स्वरूपात हाँगकाँग आणि श्रीलंका पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले..

१६ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५४/५ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४६ (२० षटके)
तांझिद हसन ५२ (३१)
नूर अहमद २/२३ (४ षटके)
बांगलादेश ८ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: फैसल अफ्रिदी (पा) आणि रवींद्र विमलसिरी (श्री)
सामनावीर: नसुम अहमद (बां)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • बांगलादेशचा हा २००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[३१]

१८ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१६९/८ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७१/४ (१८.४ षटके)
मोहम्मद नबी ६० (२२)
नुवान थुशारा ४/१८ (४ षटके)
श्रीलंका ६ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: वीरेंद्र शर्मा (भा) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: कुशल मेंडिस (श्री)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मोहम्मद नबीने अफगाणिस्तानसाठी (२० चेंडूंत) सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या अझमतुल्लाह ओमरझाईच्या विक्रमाची बरोबरी केली.[३२]
  • या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश आणि श्रीलंका सुपर फोर फेरीसाठी पात्र आणि अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर.

सुपर फोर

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
भारतचा ध्वज भारत +०.९१३ अंतिम सामन्यासाठी
पात्र
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान +०.३२९
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश −०.८३१
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका −०.४१८

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२३]

२० सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१६८/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६९/६ (१९.५ षटके)
सैफ हसन ६१ (४५)
दासुन शनाका २/२१ (२.५ षटके)
बांगलादेश ४ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: सैफ हसन (बां)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • तौहीद ह्रिदोय (बां) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील २००वा सामना खेळला आणि १,००० धावा पूर्ण केल्या.[३३]
  • लिटन दासने शकिब अल हसनच्या २५५१ धावांना मागे टाकले आणि बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.[३४]
  • कुशल मेंडिसने कुमार संगकाराच्या ४५ बळींना मागे टाकले आणि श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक बळी घेण्याची नोंद केली.[३५]

२१ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७१/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४/४ (१९.५ षटके)
साहिबजादा फरहान ५८ (४५)
शिवम दुबे २/३३ (४ षटके)
अभिषेक शर्मा ७४ (३९)
हॅरीस रौफ २/२६ (४ षटके)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२३ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३३/८ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३८/५ (१८ षटके)
मोहम्मद नवाझ ३८* (२४)
महीश थीकशाना २/२४ (४ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि इझातुल्लाह सफी (अ)
सामनावीर: हुसेन तलत (पा)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२४ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६८/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२७ (१९.४ षटके)
अभिषेक शर्मा ७५ (३७)
रिशाद हुसेन २/२७ (३ षटके)
सैफ हसन ६९ (५१)
कुलदीप यादव ३/१८ (४ षटके)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जाकर अलीने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिल्यांदाच बांगलादेशचे नेतृत्व केले.[३६]
  • मुस्तफिझुर रहमानने (बां) आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १५० वा बळी घेतला आणि शकिब अल हसनच्या १४९ बळींना मागे टाकत बांगलादेशकडून टी२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला.[३७]
  • या सामन्याच्या निकालामुळे भारताचा अंतिम फेरीत प्रवेश तर श्रीलंकेला स्पर्धेतून बाहेर.

२५ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३५/८ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२४/९ (२० षटके)
शमीम होसेन ३० (२५)
शाहीन आफ्रिदी ३/१७ (४ षटके)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • तास्किन अहमदने (बां) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील १०० वा बळी घेतला.[३८]
  • या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र तर बांगलादेश स्पर्धेतून बाहेर.

२६ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२०२/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०२/५ (२० षटके)
अभिषेक शर्मा ६१ (३१)
चरिथ असलंका १/१८ (२ षटके)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पथुम निसंकाने (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.[३९]
  • सुपर ओव्हर: श्रीलंका २/२, भारत ३/०

अंतिम सामना

[संपादन]
२८ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४६ (१९.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५०/५ (१९.४ षटके)
तिलक वर्मा ६९* (५३)
फहीम अशरफ ३/२९ (४ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि नसुम अहमद (बां)
सामनावीर: तिलक वर्मा (भा)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • फहीम अशरफने (पा) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील ५०वा बळी घेतला.

आकडेवारी

[संपादन]

सर्वाधिक धावा

[संपादन]
धावा फलंदाज डा स्ट्रा सर्वाधिक १०० ५० चौकार षट्कार
३१४ {{{alias}}} अभिषेक शर्मा ४४.८५ २००.०० ७५ ३२ १९
२६१ {{{alias}}} पथुम निसंका ४३.५० १६०.१२ १०७ २३ ११
२१७ {{{alias}}} साहिबजादा फरहान ३१.०० ११६.०४ ५८ १४ ११
२१३ {{{alias}}} तिलक वर्मा ७१.०० १३१.४८ ६९* १२ १०
१८१ {{{alias}}} फखर झमान ३०.१६ १२०.६६ ५० १६
Source: ईएसपीएन क्रिकइन्फो[४०]

सर्वाधिक बळी

[संपादन]
बळी गोलंदाज डा सर्वोत्तम ४ब ५ब
१७ {{{alias}}} कुलदीप यादव ४/७ ९.२९ ६.२७
१० {{{alias}}} शाहीन आफ्रिदी ३/१७ १६.४० ६.६०
9 {{{alias}}} जुनैद सिद्दीकी ४/१८ ६.३३ ६.३३
{{{alias}}} मुस्तफिजूर रहमान ३/२० १९.०० ७.४३
{{{alias}}} हॅरीस रौफ ३/३३ १८.३३ ९.००
Source: ईएसपीएन क्रिकइन्फो[४१]

वादविवाद

[संपादन]

२०२५ च्या भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सहभागी झालेल्या कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादांची मालिका या स्पर्धेत पाहायला मिळाली.[४२]

गट टप्प्यातील सामन्यापूर्वी, स्पर्धेच्या आयोजकांनी चुकून पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी काही सेकंदांसाठी "जलेबी बेबी" वाजवले, ज्यामुळे पाकिस्तानी प्रेक्षकांकडून टीका झाली.[४३][४४]

हस्तांदोलन

[संपादन]

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान, दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन करणे टाळले. समोर आलेल्या वृत्तानुसार असे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या सल्ल्यानुसार झाले. खेळ संपल्यानंतर, भारतीय खेळाडू पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन न करता निघून गेले.[४५] पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी ह्याबाबत निराशा व्यक्त केली, तर पीसीबीने पायक्रॉफ्टविरुद्ध औपचारिक निषेध नोंदवला आणि नंतर या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल त्यांचे ऑपरेशन्स डायरेक्टर उस्मान वाहला यांना निलंबित केले.[४६] स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची पीसीबीची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने फेटाळली.[४७] स्पर्धेत पाकिस्तानच्या पुढील सहभागाबाबत अनिश्चिततेमुळे पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्यानंतरच्या गट फेरीतील सामन्याला एक तास उशिरा झाला. पीसीबीने दावा केला की पायक्रॉफ्ट यांनी "चुकीच्या संवादाबद्दल" माफी मागितली आहे, तर आयसीसीने ते सामनाधिकारी म्हणून काम करत राहतील याची पुष्टी केल्यानंतर अखेर सामना सुरू झाला.[४८]

यादव, रौफ आणि फरहान यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची सुनावणी

[संपादन]

भारत आणि पाकिस्तानमधील सुपर फोर सामन्यादरम्यान "प्रक्षोभक हावभाव" केल्याबद्दल बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडू हॅरीस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्याविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल केली.[४९] सीमेजवळ क्षेत्ररक्षण करताना, रौफने "जेट क्रॅशिंग" हावभाव आणि "६-०" बोटाचा इशारा केला, ज्याचा अर्थ भारतीय माध्यमांनी, ऑपरेशन सिंदूर दरम्यान सहा भारतीय विमाने पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याचा प्रतीकात्मक संदर्भ म्हणून लावला.[४९][५०][५१][५२] एनडीटीव्हीने प्रकाशित केलेल्या व्हिडिओमध्ये रौफने विकेट घेतल्यानंतरही तोच हावभाव पुन्हा केला होता, जो दर्शवितो की त्याची कृती एकाच घटनेपुरती मर्यादित नव्हती.[५३][४९] त्याच सामन्याच्या सुरुवातीला, फरहानने त्याच्या बॅटने रायफल गोळीबाराची नक्कल करून त्याचे अर्धशतक साजरे केले, ज्याचे वर्णन भारतीय माध्यमांनी उत्तेजक आणि असंवेदनशील म्हणून केले होते.[५४][४९] पीसीबीने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्धही तक्रार दाखल केली, ज्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसोबत एकता व्यक्त केली आणि आपल्या संघाचा विजय भारतीय सैन्याला समर्पित केला, ज्यावर पीसीबीने "राजकीय विधाने" असल्याचा आरोप केला.[५५]

तिन्ही खेळाडूंनी आयसीसी क्रिकेट आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी नसल्याचे जबाबात म्हटले. शिस्तभंगाच्या सुनावणीनंतर, आयसीसीने यादव आणि रौफ यांना त्यांच्या सामन्याच्या शुल्काच्या ३०% दंड ठोठावला,[५६][५१] तर फरहानला इशारा देऊन सोडून देण्यात आले.[५१]

बक्षीस वितरण समारंभ विवाद

[संपादन]

भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, बक्षीस वितरण समारंभ एका तासापेक्षा जास्त उशिरा झाला कारण पाकिस्तानी संघ उशिरा पोहोचला,[५७][५८] आणि भारताने आशियाई क्रिकेट समितीचे (एसीसी) अध्यक्ष मोहसिन नक्वी, जे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत, यांच्याकडून विजेता चषक आणि पदके स्वीकारण्यास नकार दिला.[५९] जेव्हा एसीसीचे अमिनुल इस्लाम यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याला उपविजेते पदाचे बक्षीस म्हणून ७५,००० अमेरिकन डॉलर्सचा चेक सादर केला, तेव्हा त्याने तो जवळजवळ लगेचच जमिनीवर फेकला, ज्यामुळे स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या गर्दीतून जोरदार जयजयकार आणि विरोधी आवाज (Boo) दोन्ही झाले.[६०][६१]

भारतीय संघाच्या आक्षेपाला न जुमानता, नक्वी यांनी स्वतः त्यांना चषक आणि पदके देण्याचा आग्रह धरला, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. समारंभात भारताला चषक आणि पदके देण्यात आली नाहीत आणि नक्वी ट्रॉफी घेऊन स्टेडियममधून निघून गेल्याचे वृत्त आहे.[६२][६३] यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या संघासह 'काल्पनिक ट्रॉफी' उंचावून भारतीय विजय साजरा केला. नंतर त्यांनी समारंभाच्या हाताळणीवर टीका केली आणि म्हटले की त्यांच्या संघाला ट्रॉफी उचलण्याची संधी "नाकारण्यात आली".[६४]

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी नक्वी यांच्या ट्रॉफी आणि पदके "घेऊन" जाण्याच्या कृतीला "अखिलाडू" म्हटले आणि घोषणा केली की बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी परिषदेत त्यांच्या कृतीचा निषेध करेल.[६५] १ ऑक्टोबर रोजी, अंतिम सामन्याच्या तीन दिवसांनी, नक्वी यांनी दुबईतील एसीसी मुख्यालयात संघाने त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या ट्रॉफी घेतल्याशिवाय भारताला ट्रॉफी देण्यास नकार दिला.[६६]

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ a b "More India-Pakistan games on the horizon as Asia Cup gets September window" [आशिया चषक सप्टेंबरमध्ये सुरु होणार, भारत-पाकिस्तानचे आणखी सामने होण्याची शक्यता.]. क्रिकबझ्झ. २७ फेब्रुवारी २०२५.
  2. ^ "India to host Men's Asia Cup 2025" [२०२५ पुरुष आशिया कप भारत आयोजित करणार.]. cricketpakistan.com.pk (इंग्रजी भाषेत). २८ जुलै २०२४. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "India win 9th Asia Cup title after Tilak Varma, Shivam Dube ace nerve-wracking chase against Pakistan" [तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानविरुद्ध अटीतटीच्या पाठलागानंतर भारताने पटकावले नववे आशिया चषक विजेतेपद.]. हिंदुस्थान टाइम्स. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "India win record-extending 9th Asia Cup title, beat Pakistan by five wickets in thrilling final" [भारताचे विक्रमी नववे आशिया कप विजेतेपद, रोमांचक अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच विकेट्सने हरवले]. द इंडियन एक्सप्रेस. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "India to host 2025 Asia Cup, Bangladesh the 2027 edition" [२०२५ आशिया चषक स्पर्धा भारतामध्ये आणि २०२७ मध्ये बांगलादेशमध्ये होणार आयोजित]. फर्स्टपोस्ट (इंग्रजी भाषेत). 2024-07-30. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "Asia Cup 2025 to start on September 9 in UAE" [२०२५ आशिया चषक स्पर्धा ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे.]. ऑलिंपिक्स. 26 July 2025. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "Amid rising optimism, ACC aims to start Asia Cup in September" [वाढत्या आशावादाच्या पार्श्वभूमीवर, एसीसीचे सप्टेंबरमध्ये आशिया चषक सुरू करण्याचे उद्दिष्ट.]. क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). २८ जून २०२५. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  8. ^ "Afghanistan unveil squad for upcoming Asia Cup" [आशिया चषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  9. ^ "Bangladesh Squad for Asia Cup 2025 & T20I Series Against the Netherlands Announced" [आशिया चषक २०२५ आणि नेदरलँड्सविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा]. बांगलादेश क्रिकेट बोर्ड. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  10. ^ "Hong Kong, China Announces 20-Man ACC Asia Cup Squad for Preparation Camp in UAE" [युएईमध्ये होणाऱ्या तयारी शिबिरासाठी हाँगकाँग, चीनतर्फे २० जणांच्या एसीसी आशिया चषक संघाची घोषणा.]. क्रिकेट हाँगकाँग, चीन. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  11. ^ "India's squad for ACC Asia Cup 2025 announced" [एसीसी आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  12. ^ "Oman ready to make an impact in Asia Cup" [आशिया चषक स्पर्धेमध्ये प्रभाव पाडण्यासाठी ओमान सज्ज]. मस्कत डेली. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  13. ^ "Pakistan announce squads for UAE T20I tri-series and Asia Cup" [युएई टी२० तिरंगी मालिका आणि आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  14. ^ "Sri Lanka T20I Squad announced for the Asia Cup 2025" [२०२५ आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंकेचा टी२० संघ जाहीर]. श्रीलंका क्रिकेट. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  15. ^ "Muhammad Waseem to lead 17-member UAE squad in DP World Asia Cup 2025" [२०२५ डीपी वर्ल्ड आशिया चषक स्पर्धेमध्ये मोहम्मद वसीम १७ सदस्यीय यूएई संघाचे नेतृत्व करणार]. अमिराती क्रिकेट बोर्ड. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  16. ^ "Janith Liyanage added to Sri Lanka's Asia Cup squad" [श्रीलंकेच्या आशिया कप संघात जानिथ लियानागेचा समावेश]. ThePapare. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  17. ^ "Naveen Ul Haq ruled out of Asia Cup due to shoulder injury" [खांद्याच्या दुखापतीमुळे नवीन उल हक आशिया चषक स्पर्धेतून बाहेर]. क्रिकबझ्झ. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  18. ^ "Naveen Ul Haq ruled out of Asia Cup, Abdollah Ahmadzai named replacement" [नवीन आशिया चषक स्पर्धेतून बाहेर, अब्दुल्ला अहमदझाईची बदली खेळाडू म्हणून निवड]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  19. ^ "ACC announces official venues for Men's Asia Cup 2025" [पुरुषांच्या आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी एसीसीतर्फे अधिकृत ठिकाणांची घोषणा]. आशिया क्रिकेट समिती. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  20. ^ "Asia Cup 2025: Richie Richardson and Andy Pycroft head panel of match officials" [आशिया कप २०२५: रिची रिचर्डसन आणि अँडी पायक्रॉफ्ट सामना अधिकाऱ्यांच्या पॅनेलचे प्रमुख]. द हिंदू. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  21. ^ "ACC Men's T20 Asia Cup 2025 Set for an Expanded Showcase in the UAE" [एसीसी पुरुष टी२० आशिया कप २०२५ युएईमध्ये विस्तारित प्रदर्शनासाठी सज्ज]. आशिया क्रिकेट समिती. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  22. ^ "Asia Cup 2025 confirmed; to be held in UAE from Sept 9 to 28" [आशिया चषक २०२५ निश्चित; ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार]. क्रिकबझ्झ. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  23. ^ a b c "Asia Cup 2025 - Points Table" [आशिया चषक २०२५ - गुणतालिका]. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  24. ^ @thecricketgully (15 September 2025). "🎉 Century of T20Is! 🇴🇲 Oman Cricket celebrates its 100th T20I milestone 🏏🔥" [🎉आंतरराष्ट्रीय टी२० चे शतक! 🇴🇲 ओमान क्रिकेटने १०० वा टी२० चा टप्पा साजरा केला 🏏🔥] (Tweet) – ट्विटर द्वारे.
  25. ^ "India Become 2nd Team In The World After Pakistan To..." [पाकिस्ताननंतर भारत जगातील दुसरा संघ बनला...]. न्यूज१८. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  26. ^ "Arshdeep becomes first Indian to reach 100 T20I wickets" [अर्शदीप १०० टी२० विकेट्स पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  27. ^ "Omarzai scores fastest ever 50 as Afghanistan rout Hong Kong" [ओमरझाईने आतापर्यंतच्या सर्वात जलद ५० धावा, अफगाणिस्तानकडून हाँगकाँगचा पराभव]. डेली एफटी. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  28. ^ "Hong Kong vs Bangladesh: Rishad Hossain Completes 50 T20I Wickets in Asia Cup 2025 Win" [हाँगकाँग विरुद्ध बांगलादेश: आशिया कप २०२५ च्या विजयात रिशाद हुसेनचे ५० टी२० बळी पूर्ण]. MensXP. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  29. ^ "Litton Das Breaks Multiple Batting Records During His 59-Run Knock Against Hong Kong" [हाँगकाँगविरुद्धच्या ५९ धावांच्या खेळीदरम्यान लिटन दासने फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले]. न्यूज१८. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  30. ^ "Asia Cup: Pathum Nissanka becomes 3rd Sri Lankan batter to reach 2,000 T20I runs" [आशिया चषक: २००० टी२० धावा पूर्ण करणारा पथुम निस्सांका श्रीलंकेचा तिसरा फलंदाज ठरला]. द ट्रिब्यून. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  31. ^ "Bangladesh play 200th T20Is today" [बांगलादेश आज २०० वा टी२० सामना खेळणार.]. Bangladesh Sangbad Sangstha. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  32. ^ "Asia Cup 2025: Mohammad Nabi equals Azmatullah Omarzai's record in Sri Lanka clash" [आशिया चषक २०२५: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद नबीची अझमतुल्लाह उमरझाईच्या विक्रमाची बरोबरी]. जिओ सुपर. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  33. ^ "Hridoy and Hassan steer Bangladesh past Sri Lanka at Asia Cup Super Four" [आशिया कप सुपर फोरमध्ये हृदयॉय आणि हसनच्या गोलंदाजीमुळे बांगलादेशने श्रीलंकेला हरवले.]. द न्यू इंडियन एक्सप्रेस. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  34. ^ "Litton Das becomes Bangladesh's leading run-getter in T20Is, overtakes Shakib al Hasan" [लिटन दास बांगलादेशचा टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला, शकिब अल हसनला टाकले मागे.]. द संडे गार्डियन. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  35. ^ "Most dismissals for Sri Lanka in T20Is" [श्रीलंकेकडून टी२० मध्ये सर्वाधिक बळी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  36. ^ "Explained! Why Is Jaker Ali Captaining Bangladesh Instead Of Litton Das Against India In Asia Cup?" [स्पष्टीकरण! आशिया कपमध्ये भारताविरुद्ध लिटन दासऐवजी बांगलादेशचे नेतृत्व जाकर अली का करत आहे?]. टाइम्स नाऊ. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  37. ^ "Mustafizur Rahman Achieves Huge Record vs India, Becomes Bangladesh's Highest-Ever T20I Wicket-Taker" [मुस्तफिझुर रहमानचा भारताविरुद्ध खेळताना मोठा विक्रम प्रस्थापित, बांगलादेशचा सर्वाधिक टी२० विकेट घेणारा गोलंदाज बनला]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  38. ^ "Taskin Ahmed Becomes 3rd Bangladeshi To Take 100 Wickets In T20Is" [तास्किन अहमद आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १०० विकेट घेणारा तिसरा बांगलादेशी ठरला]. न्यूज१८. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  39. ^ "Pathum Nissanka emulates Virat Kohli, becomes 3rd batter to hit Asia Cup T20 hundred" [पथुम निसंकाने केले विराट कोहलीचे अनुकरण, आशिया चषक टी२० शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला]. इंडिया टुडे. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  40. ^ "Asia Cup 2025 — Most Runs — Records" [आशिया चषक २०२५ — सर्वाधिक धावा — नोंदी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  41. ^ "Asia Cup 2025 — Most Wickets — Records" [आशिया चषक २०२५ — सर्वाधिक बळी — नोंदी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  42. ^ "Operation sindoor on the games field" PM Modi's post after India beat Pakistan in thrilling Asia Cup final" ["खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर", आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे पोस्ट]. एनडीटीव्ही. २९ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  43. ^ "PCB to take final call over Asia Cup today" [आशिया कपबाबत पीसीबी आज अंतिम निर्णय घेणार.]. डॉन. १७ सप्टेंबर २०२५.
  44. ^ शर्मा, राधिका (१५ सप्टेंबर २०२५). "Jalebi Baby Singer Tesher Pokes Fun At Pakistan National Anthem Fiasco At Asia Cup: "Shout Out To The Sound Guy..."" [आशिया चषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या राष्ट्रगीता दरम्यानच्या गोंधळावर जलेबी बेबी गायक तेशेरने उडवली खिल्ली: "शाऊट आउट टू द साऊंड गाय..."]. एनडीटीव्ही. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  45. ^ आदिल, हाफसा; इफ्तीखार नेगी, Ahsan. "India, Pakistan embroiled in 'no handshake' drama after Asia Cup match" [आशिया चषक सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये 'हस्तांदोलन' नाट्यात गोंधळ]. अल जझीरा.
  46. ^ "PCB chief suspends Usman Wahla over Asia Cup handshake controversy" [आशिया कप हस्तांदोलन वादावरून पीसीबी प्रमुखांकडून उस्मान वाहला यांचे निलंबन]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १५ सप्टेंबर २०२५.
  47. ^ "PCB chief Naqvi demands 'immediate removal' of match referee Pycroft" [पीसीबी प्रमुख नक्वी यांची सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांना 'तात्काळ काढून टाकण्याची' मागणी.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  48. ^ "Pakistan-UAE match begins after delay as Andy Pycroft remains match referee" [अँडी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी असल्याने पाकिस्तान-यूएई सामना उशिरा सुरू झाला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  49. ^ a b c d "BCCI lodges ICC complaint against Farhan and Rauf" [बीसीसीआयची फरहान आणि रौफ यांच्याविरुद्ध आयसीसीकडे तक्रार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  50. ^ "BCCI Strikes As Haris Rauf, Sahibzada Farhan Could Pay Heavy Price For Shameless Provocative Antics" [हरिस रौफ, साहिबजादा फरहान यांना निर्लज्ज प्रक्षोभक कृत्यांसाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते, बीसीसीआयचा कडकडाट]. न्यूज१८. २५ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  51. ^ a b c "Haris Rauf fined for breaching ICC Code of Conduct" [आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल हरिस रौफला दंड]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २३ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  52. ^ "Haris Rauf sparks controversy with gesture suggesting Pakistan downed Indian fighter jets - WATCH" [पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमान पाडल्याचे हरिस रौफचे वादग्रस्त संकेत - पहा]. फर्स्टपोस्ट. २३ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  53. ^ "Haris Rauf Provoked India With 'Fighter Jet Gesture' Twice, Video Of 2nd Instance Surfaces" [हरिस रौफने दोनदा 'फायटर जेट जेश्चर' देऊन भारताला चिथावणी दिली, दुसऱ्या प्रसंगाचा व्हिडिओ आला समोर]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स. २३ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  54. ^ "Farhan's gun-firing celebration sparks debate" [फरहानच्या गोळीबाराच्या सेलिब्रेशनमुळे वादविवाद सुरू झाला]. फर्स्टपोस्ट. २२ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  55. ^ "PCB file complaint against Suryakumar Yadav: What is the charge and can he be found guilty?" [सूर्यकुमार यादवविरुद्ध पीसीबीने तक्रार दाखल केली: आरोप काय आहे आणि तो दोषी ठरू शकतो का?]. द टाईम्स ऑफ इंडिया. २५ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  56. ^ "Suryakumar found guilty of breaching ICC Code of Conduct" [आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सूर्यकुमार दोषी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २३ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  57. ^ "IND vs PAK: Why was presentation ceremony after Asia Cup 2025 Final delayed?" [भारत विरुद्ध पाकिस्तान: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर सादरीकरण समारंभ का लांबला?]. स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). द हिंदू. २८ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  58. ^ सिन्हा, प्रत्युष (२८ सप्टेंबर २०२५). "India refuse to collect Asia Cup trophy from Mohsin Naqvi" [मोहसीन नक्वीकडून आशिया चषक ट्रॉफी घेण्यास भारताचा नकार]. Cricbuzz (इंग्रजी भाषेत). १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  59. ^ "Winners India refuse Asia Cup trophy from ACC chief" [विजेत्या भारताने एसीसी प्रमुखांकडून आशिया चषक ट्रॉफी नाकारली]. रॉयटर्स. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  60. ^ "'They are disrespecting cricket': Pak captain Salman Agha flings cheque in frustration after India snubs PCB chief - BusinessToday" [ते क्रिकेटचा अनादर करत आहेत': भारताने पीसीबी प्रमुखांना नकार दिल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा निराश झाला - बिझनेसटुडे]. बिझजेस टुडे (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  61. ^ "Pakistan Captain Salman Ali Agha Gets Booed For Throwing Away Runners-Up Cheque Post Asia Cup Final Loss" [आशिया कपच्या अंतिम सामन्यात पराभवानंतर उपविजेत्या खेळाडूचा चेक फेकल्याबद्दल पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याच्या विरोधात जल्लोष.]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स. 29 September 2025.
  62. ^ "India thrashes Pakistan in Asia Cup 2025 final but refuses to take trophy during presentation ceremony" [आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले पण पारितोषिक वितरण समारंभात ट्रॉफी घेण्यास नकार]. द इकॉनॉमिक टाईम्स. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  63. ^ "Asia Cup Ends Without Suryakumar Yadav Lifting Trophy Despite Win" [विजयानंतरही सूर्यकुमार यादवने ट्रॉफी उचलल्याशिवाय आशिया चषक स्पर्धेची सांगता]. न्यूज१८. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  64. ^ "Suryakumar says champions India 'denied' the trophy after Asia Cup win" [आशिया चषक स्पर्धेनंतर चॅम्पियन भारताला ट्रॉफी 'नाकारली' असे सूर्यकुमार म्हणाला]. रॉयटर्स. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  65. ^ "Asia Cup | BCCI secretary Devajit Saikia to Pak board chief Mohsin Naqvi: 'Return trophy and medals as soon as possible'" [आशिया चषक| बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पाक बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना सांगितले: 'शक्य तितक्या लवकर ट्रॉफी आणि पदके परत करा']. द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ३० सप्टेंबर २०२५. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  66. ^ रसूल, डॅनियल (१ ऑक्टोबर २०२५). "India can come and collect Asia Cup trophy if they want it, says ACC chief Mohsin Naqvi" [भारताला हवे असेल तर ते आशिया चषक ट्रॉफी येऊन घेऊ शकतात, असे एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी म्हटले.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]