विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक गट फेरी चार संघांच्या दोन गटांमध्ये खेळवली जात आहे, ज्यामध्ये एकूण १२ सामने खेळले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीमध्ये प्रवेश करतील.[ १]
डिसेंबर २०२२ मध्ये, पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेसाठी इस्लामाबादमध्ये नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी मान्यता दिली.[ ३] २८ एप्रिल २०२४ रोजी, पाकिस्तानने या कार्यक्रमासाठी तीन ठिकाणे प्रस्तावित केली होती.[ ४] कराची, लाहोर आणि रावळपिंडी ही ती ठिकाणे आहेत. भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार होते,[ ५] परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला.[ ६] त्यामुळे भारताचे सर्व सामने आता दुबईला खेळवले जातील.
[ ७] [ ८]
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ २]
क्रमवारीचे नियम: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) बरोबरी झालेल्या संघांमधील सामन्यांचे निकाल; ५) सुरुवातीच्या गट टप्प्यातील क्रमवारी[ ९]
(य) यजमान
टीप : प्रत्येक गट सामन्याच्या शेवटी एकूण गुण सूचीबद्ध केले आहेत.
टीप : सामन्याचा सारांश पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
पाकिस्तान वि न्यू झीलंड[ संपादन ]
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडचा विल यंग चॅम्पियन्स चषक स्पर्धेमध्ये शतक करणारा न्यूझीलंडचा चौथा फलंदाज आणि स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शतक करणारा पहिला किवी फलंदाज ठरला.[ १०]
वि
भारत २३१/४ (४६.३ षटके)
बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारताच्या रवींद्र जडेजाचा हा २०० वा एकदिवसीय सामना होता.[ ११]
मोहम्मद शमीने (भा) एकदिवसीय सामन्यात २०० वा बळी घेतला. खेळलेल्या सामन्यांच्या बाबतीत २०० एकदिवसीय बळी घेणारा तो संयुक्तपणे दुसरा सर्वात जलद आणि चेंडूच्या बाबतीत सर्वात जलद २०० बळी घेणारा खेळाडू ठरला.[ १२]
महमुदुल्लाह आणि जाकर अलीचा विक्रम मोडीत काढत जाकर अली आणि तौहीद ह्रिदोय ह्यांनी बांगलादेशकडून सहाव्या गड्यासाठी १५४ धावांची सर्वोच्च भागीदारी केली. [ १३]
विराट कोहलीने (भा) एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ वा झेल घेतला, हा भारताकडून एकदिवसीय सामन्यांमधील संयुक्त विक्रम आहे.[ १४]
बांग्लादेशच्या तौहीद ह्रिदोयने एकदिवसीय सामन्यात आपले पहिले शतक झळकावले.[ १५]
मोहम्मद शमीचे (भा) ६० बळी पूर्ण, आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये भारतीय गोलंदाजातर्फे झहीर खानला मागे टाकत सर्वाधिक बळी.[ १६]
रोहित शर्माने (भा) एकदिवसीय सामन्यात ११,००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. विराट कोहलीनंतर तो २६१ डावांमध्ये ११,००० धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला.[ १७]
शुभमन गिलने (भा) केवळ ५१ डावात त्याचे ८ वे एकदिवसीय शतक झळकावले आणि हा टप्पा गाठणारा तो सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला.[ १८]
रोहित शर्माने (भा) आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून १०० विजय गाठले.[ १९]
वि
भारत २४४/४ (४२.३ षटके)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नेदरलँड्सला मागे टाकत (११ वेळा), भारताचा एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक १२ वेळा सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम. [ २०]
मोहम्मद शमीने भारताकडून एका एकदिवसीय सामन्यात एका षटकात (वाईड आणि नो बॉलसह) सर्वाधिक ११ चेंडू टाकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.[ २१]
भारताच्या हार्दिक पंड्याने त्याचा २०० वा आंतरराष्ट्रीय बळी घेतला.[ २२]
भारताच्या कुलदीप यादवने त्याचा ३०० वा आंतरराष्ट्रीय बळी घेतला. ३०० गडी बाद करणारा तो तिसरा सक्रिय भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला.[ २३]
विराट कोहलीने भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक १५८ झेल घेतले, त्याने मोहम्मद अझरुद्दीनला (१५६) मागे टाकले.[ २४]
रोहित शर्मा (भा) १८१ डावांमध्ये ९००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा सर्वात जलद सलामीवीर ठरला.[ २५]
विराट कोहलीने (भा) एकदिवसीय सामन्यांमध्ये २८७ डावांमध्ये १४,००० धावा पूर्ण केल्या, आणि सचिन तेंडुलकरच्या ३५० डावांच्या विक्रमाला मागे टाकत असे करणारा सर्वात जलद खेळाडू ठरला. तसेच ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकत, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक (२७,५०३) धावा करणारा फलंदाज बनला.[ २६]
विराट कोहलीने (भा) रोहित शर्माला मागे टाकत पाकिस्तानविरुद्ध आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. आयसीसी स्पर्धा सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध पाच वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो एकमेव खेळाडू बनला.[ २७]
विराट कोहलीने (भा) नाबाद १०० धावा केल्या आणि एकदिवसीय सामन्यांमधील त्याचे ५१ वे शतक साजरे केले. त्याच्या शतकामुळे आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये त्याने २३ पेक्षा जास्त वेळा ५०+ धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. ३६ वर्षे आणि ११० दिवसांच्या वयात, तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.[ २८] [ २९] [ ३०]
बांगलादेश वि न्यू झीलंड[ संपादन ]
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने बांगलादेश विरुद्ध त्याच्या सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाजी कामगिरीची नोंद केली (१० षटकात ४/२६). या कामगिरीसोबत त्याने पॉल वाइझमनच्या ४/४५ ला मागे टाकून, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजातर्फे सर्वोत्तम गोलंदाजीचा नवा विक्रम प्रस्थापित केला,.[ ३१]
केन विल्यमसनने (न्यू) आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून स्टीफन फ्लेमिंगला मागे टाकले.[ ३२]
रचिन रवींद्रने २६ डावात एकदिवसीय सामन्यात १,००० धावा पूर्ण केल्या. तो एकदिवसीय सामन्यात हा टप्पा गाठणारा न्यूझीलंडचा पाचवा सर्वात जलद फलंदाज ठरला.[ ३३]
रचिन रवींद्र आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये ४ शतके करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला.[ ३४]
ग्लेन फिलिप्सने (न्यू) एकदिवसीय सामन्यांमध्ये १,००० धावा पूर्ण केल्या.[ ३५]
या सामन्याच्या निकालामुळे, भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आणि पाकिस्तान आणि बांगलादेश स्पर्धेबाहेर पडले.[ ३६]
पाकिस्तान वि बांगलादेश[ संपादन ]
पावसामुळे खेळ होऊ शकला नाही
भारत २४९/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडने नाणेफेक जिकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
विराट कोहलीचा (भा) हा ३०० वा एकदिवसीय सामना होता.[ ३७]
मॅट हेन्रीने (न्यू) ने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील एका सामन्यात तिसऱ्यांदा आणि भारताविरुद्ध पहिले बळींचे पंचक साजरे घेतले.[ ३८]
केन विल्यमसनने (न्यू) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध २५०० धावा पूर्ण केल्या.[ ३९]
वरुण चक्रवर्तीचे (भा) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पंचबळी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असे करणारा तो तिसरा भारतीय ठरला.[ ४०]
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ २]
वर्गीकरणाचे नियम: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) बरोबरी झालेल्या संघांमधील सामन्यांचे निकाल; ५) सुरुवातीच्या गट टप्प्यातील क्रमवारी
टीप : प्रत्येक गट सामन्याच्या शेवटी एकूण गुण सूचीबद्ध केले आहेत.
टीप : सामन्याचा सारांश पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
अफगाणिस्तान वि दक्षिण आफ्रिका[ संपादन ]
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चॅम्पियन्स चषक स्पर्धेमधील अफगाणिस्तानचा हा पहिलाच एकदिवसीय सामना होता.
रायन रिकलटन (दक्षिण आफ्रिका) याने एकदिवसीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक झळकावले. चॅम्पियन्स चषक पदार्पणात शतक झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकन खेळाडू ठरला.[ ४१]
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा, दक्षिण आफ्रिकेच्या डावात चार किंवा त्याहून अधिक फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या.[ ४२]
ह्या सामन्यात एकूण ५२३ धावा केल्या गेल्या ज्या उभय संघामधील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोच्च धावा आहेत. [ ४३]
ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड[ संपादन ]
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
बेन डकेटने त्याचे तिसरे एकदिवसीय शतक झळकावले. चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणात शतक झळकावणारा तो पहिला इंग्लंडचा फलंदाज ठरला.[ ४४]
बेन डकेटने (इं) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवली आणि नेथन ॲस्टलचा विक्रम मोडला (२००४ मध्ये अमेरिकेविरुद्ध १४५*). त्याने इंग्लिश फलंदाजातर्फे सर्वाधिक धावा केल्या आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात १५० धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला.[ ४५]
ॲडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया) ने त्याचा ३०० वा आंतरराष्ट्रीय बळी घेतला.[ ४६]
ऑस्ट्रेलियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक सांघिक धावसंख्येचा विक्रम मोडला आणि त्याच सामन्यात इंग्लंडचा विक्रम मोडला.[ ४७]
जॉश इंग्लिसने (ऑ) एकदिवसीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक झळकावले.[ ४८]
जॉश इंग्लिसने (ऑ) चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात जलद शतक झळकावले. [ ४९]
२००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय होता.[ ५०]
आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील हा धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता.[ ५१]
ह्या सामन्यात उभय संघानी एकूण ७०७ धावा केल्या. आयसीसी चॅम्पियन्स चषक इतिहासाच्या एका सामन्यातील ह्या सर्वात जास्त धावा होत्या[ ५२]
ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका[ संपादन ]
नाणेफेक नाही.
पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
जोस बटलरने ४४ वा एकदिवसीय सामना खेळून इंग्लंडचा कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याच्या यादीत मायकेल आथरटनला मागे टाकत सातवे स्थान पटकावले.
जोफ्रा आर्चरने (इं) एकदिवसीय कारकिर्दीमधील ५०वा बळी घेतला. तो जेम्स अँडरसनला मागे टाकून फक्त ३० सामन्यांमध्ये ५० बळी घेणारा सर्वात जलद इंग्लिश गोलंदाज बनला.[ ५३]
इब्राहिम झद्रानने (अफगाणिस्तान) एकदिवसीय सामन्यात १,५०० धावा पूर्ण केल्या आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेमध्ये शतक करणारा तो पहिला अफगाणी फलंदाज ठरला.[ ५४]
इब्राहिम झद्रानने अफगाणिस्तानसाठी आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत दोन शतके ठोकली, जी त्याच्या देशातील कोणत्याही खेळाडूने सर्वाधिक आहेत.[ ५५]
इब्राहिम झद्रानने (अफगाणिस्तान) आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या (१७७) केली आणि बेन डकेटचा विक्रम (१६५*) मोडला.[ ५६] त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाण फलंदाजाकडून सर्वाधिक वैयक्तिक धावांचा स्वतःचाच १६२ धावांचा विक्रम मोडला.[ ५७]
अफगाणिस्तानने आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याआधी २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९१/५ अशी कामगिरी केली होती.[ ५८]
बेन डकेट (इंग्लंड) हा एकदिवसीय कारकिर्दीतील २१ डावात १००० धावा पूर्ण करणारा संयुक्तपणे सर्वात जलद इंग्लिश फलंदाज ठरला.[ ५९]
अफगाणिस्तानच्या अझमतुल्लाह ओमरझाईने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच बळींचे पंचक घेतले.[ ६०]
हा अफगाणिस्तानचा एकदिवसीय सामन्यांमध्ये तिसरा सर्वात कमी धावांनी विजय होता. [ ६१]
या सामन्याच्या निकालामुळे, इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाद झाला.[ ६२]
अफगाणिस्तान वि ऑस्ट्रेलिया[ संपादन ]
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
अफगाणिस्तानच्या अझमतुल्लाह ओमरझाईने एकदिवसीय कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या.[ ६३]
ट्रॅव्हिस हेडच्या (ऑस्ट्रेलिया) ७,५०० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण.[ ६४]
ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध फक्त २९ चेंडूत ५० धाव केल्या, आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात जलद सांघिक अर्धशतकाचा मागील विक्रम मोडला.[ ६५]
या सामन्याच्या निकालामुळे, ऑस्ट्रेलिया स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.[ ६६]
इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका[ संपादन ]
इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
लियाम लिविंगस्टोनचा (इं) हा १०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
कागिसो रबाडाने (दक्षिण आफ्रिका) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध १०० वा बळी घेतला.[ ६७]
लुंगी न्गिदी (दक्षिण आफ्रिका) ने त्याचा १०० वा एकदिवसीय बळी घेतला.[ ६८]
या सामन्याच्या निकालामुळे, दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली तर अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला.[ ६९]
^ "Official fixtures announced for ICC Men's Champions Trophy 2025" [आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी अधिकृत वेळापत्रक जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २४ डिसेंबर २०२४. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ a b c "आयसीसी चॅम्पियन्स चषक २०२४ - गुणफलक" . ईएसपीएन क्रिकइन्फो .
^ "Government gives PCB green light to build stadium in Islamabad" [इस्लामाबादमध्ये स्टेडियम बांधण्यासाठी सरकारचा पीसीबीला हिरवा कंदील]. डॉन न्यूज . २ जानेवारी २०२२. २० फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "PCB proposes three venues for 2025 Champions Trophy" [पीसीबीकडून २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन ठिकाणे प्रस्तावित]. ईएसपीएन क्रिकइन्फो . १३ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy 2025: PCB draft schedule has all India games in Lahore" [चॅम्पियन्स चषक २०२५: पीसीबीच्या मसुदा वेळापत्रकात सर्व भारतीय सामन्यांचा समावेश लाहोरमध्ये]. ईएसपीएन क्रिकइन्फो . १३ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "India will not travel to Pakistan for 2025 Champions Trophy" [२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानला जाणार नाही]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy: India vs Pakistan on February 23 in UAE" [चॅम्पियन्स ट्रॉफी: भारत विरुद्ध पाकिस्तान २३ फेब्रुवारी रोजी यूएईमध्ये]. ईएसपीएन क्रिकइन्फो . २२ डिसेंबर २०२४. २० फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "Official fixtures announced for ICC Men's Champions Trophy 2025" [आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी अधिकृत वेळापत्रक जाहीर]. आयसीसी . २४ डिसेंबर २०२४. २० फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "ICC Champions Trophy 2025" [२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक] (PDF) . आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, प्लेयिंग कंडिशन्स . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . 9 . १५ फेब्रुवारी २०२५. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
^ "HISTORY! Will Young Becomes First Kiwi In 21 Years To Achieve THIS Special Feat" [इतिहास! विल यंग ठरला २१ वर्षांत हा खास पराक्रम करणारा पहिला किवी खेळाडू]. क्रिकेट.कॉम . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "Ravindra Jadeja reaches major milestone in India's Champions Trophy 2025 opener against Bangladesh" [रवींद्र जडेजाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या भारताच्या बांगलादेश विरुद्ध पहिल्या सामन्यात गाठला एक महत्त्वाचा टप्पा]. फर्स्टपोस्ट . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy 2025: Mohammed Shami becomes fastest Indian bowler to reach 200 ODI wickets" [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: मोहम्मद शमी ठरला सर्वात जलद २०० एकदिवसीय बळी घेणारा भारतीय गोलंदाज.]. स्पोर्टस्टार . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "IND vs BAN: Jaker Ali, Towhid Hridoy record highest sixth-wicket partnership for Bangladesh in ODIs" [भारत विरुद्ध बांगलादेश: जाकर अली, तौहीद ह्रिदोयची बांगलादेशसाठी एकदिवसीय सामन्यात सहाव्या गड्यासाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम]. स्पोर्टस्टार . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "Most catches by an Indian in ODIs" [एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूकडून सर्वाधिक झेल]. ईएसपीएन क्रिकइन्फो . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy: Towhid puts Indian bowlers on notice with maiden ODI 100" [चॅम्पियन्स ट्रॉफी: तौहिदचे पहिले एकदिवसीय शतक भारतीय गोलंदाजांवर प्रश्नचिन्ह]. बिझनेस स्टँडर्ड . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "Mohammed Shami creates history, becomes India's GOAT in ICC events & fastest to 200 ODI wickets" [मोहम्मद शमीने इतिहास रचला, आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि २०० एकदिवसीय बळी घेणारा सर्वात जलद गोलंदाज.]. क्रिकेटऍडिक्टर.कॉम . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "Rohit Sharma becomes second -fastest player in the world to complete 11,000 ODI runs" [रोहित शर्मा ११,००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा सर्वात जलद खेळाडू ठरला.]. स्पोर्टस्टार . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "Shubman Gill leaves behind Virat Kohli, Sachin Tendulkar; second straight ODI century drives India to win vs Bangladesh" [शुभमन गिलने विराट कोहली, सचिन तेंडुलकरला मागे टाकले; सलग दुसऱ्या एकदिवसीय शतकामुळे भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला]. हिंदुस्थान टाइम्स . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "Rohit Sharma Creates History, Becomes First Captain In The World To..." [रोहित शर्माने रचला इतिहास, जगातील पहिला कर्णधार बनला....]. टाइम्स नाऊ . २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले .
^ "IND vs PAK: India set record for most consecutive tosses lost in ODIs" [भारत विरुद्ध पाकिस्तान: भारताने एकदिवसीय सामन्यात सलग सर्वाधिक वेळा नाणेफेक हरण्याचा विक्रम रचला]. द टाइम्स ऑफ इंडिया . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "India vs Pakistan: Mohammed Shami Achieves Big Unwanted Record, Surpasses Jasprit Bumrah" [भारत विरुद्ध पाकिस्तान: मोहम्मद शमीचा जसप्रीत बुमराहला मागे टाकत मोठा नकोसा विक्रम]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "CT 2025: Hardik Pandya completes 200 international wickets" [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: हार्दिक पंड्याचे २०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण]. हिंदुस्थान टाइम्स . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "कुलदीप यादव रविचंद्रन अश्विनसोबत एलिट यादीत सामील, असे करणारा पाचवा भारतीय फिरकी गोलंदाज बनला..." न्यूज१८ . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy 2025: Kohli goes past Azharuddin's record for most catches by an Indian fielder in ODIs" [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: कोहलीने अझरुद्दीनचा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम मागे टाकला.]. स्पोर्टस्टार . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy 2025: Rohit Sharma Creates History, Breaks Sachin Tendulkar's Record; Becomes First Player In The World To..." [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: रोहित शर्माने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला; जगातील पहिला खेळाडू बनला...]. टाइम्स नाऊ . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "IND vs PAK: Virat Kohli becomes fastest to hit 14,000 ODI runs, breaks Sachin Tendulkar's record" [भारत विरुद्ध पाकिस्तान: विराट कोहलीच्या सर्वात जलद १४,००० एकदिवसीय धावा पूर्ण, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला]. द इंडियन एक्सप्रेस . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "विराट कोहलीने इतिहास रचला; रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडला; जगातील पहिला खेळाडू बनला..." टाइम्स नाऊ . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Kohli aces another chase for India, Pakistan stare at exit" [कोहलीने भारतासाठी आणखी एक धावसंख्या उभारली, पाकिस्तान बाहेर पडण्याच्या मार्गावर]. डीडी न्यूज . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Virat Kohli equals Indian legend's huge record with half-century in IND vs PAK 2025 Champions Trophy clash" [२०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अर्धशतक झळकावून विराट कोहलीची भारतीय दिग्गजांच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी.]. स्पोर्ट्सकीडा . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "IND vs PAK, 2025 Champions Trophy: Top records and stats emerging from India vs Pakistan match" [भारत विरुद्ध पाकिस्तान, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील टॉप रेकॉर्ड आणि आकडेवारी.]. स्पोर्ट्सकीडा . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Michael Bracewell's career-best 4-26 restricts Bangladesh" [मायकेल ब्रेसवेलच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ४-२६ धावांनी बांगलादेशला रोखले]. क्रिकबझ्झ . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Kane Williamson breaks Fleming's historic record despite failing against Bangladesh in Champions Trophy 2025" [२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध अपयशी ठरल्यानंतरही केन विल्यमसनने फ्लेमिंगचा ऐतिहासिक विक्रम मोडला.]. इंडिया टीव्ही . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Mustafizur removes Conway to bring back life into the game for Bangladesh" [मुस्तफिजूरने कॉनवेला बाद करून बांगलादेशसाठी सामन्यात पुन्हा जीव ओतला.]. आयसीसी . 2025-04-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Rachin Ravindra shatters massive record, becomes New Zealand's leading century-scorer in ICC ODI events" [रचिन रवींद्रने मोडला मोठा विक्रम, बनला आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचा सर्वाधिक शतके करणारा फलंदाज]. द ट्रिब्यून . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "BAN vs NZ Match 6 Commentary | Crickit" [बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामना ६ समालोचन | क्रिकइट]. हिंदुस्थान टाइम्स . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "India & New Zealand qualify for Champions Trophy semi-finals" [भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी पात्र]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .[permanent dead link ]
^ "Virat Kohli Scripts History In 300th ODI, Becomes First Player Ever In Cricket To..." [विराट कोहलीने ३०० व्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला, क्रिकेटमध्ये पहिला खेळाडू बनला...]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy: Matt Henry takes fifer against India, registers big feat" [चॅम्पियन्स ट्रॉफी: मॅट हेन्रीने भारताविरुद्ध पाच बळी घेत मोठी कामगिरी केली.]. बिझनेस स्टँडर्ड . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "IND vs NZ: Kane Williamson creates history with resilient knock against India" [भारत विरुद्ध न्यूझीलंड: केन विल्यमसनने भारताविरुद्ध दमदार खेळी करत इतिहास रचला]. इंडिया टीव्ही न्यूज . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "India top Group A as Varun Chakaravarthy's five-for sinks New Zealand in Dubai" [दुबईमध्ये वरुण चक्रवर्तीच्या पाच बळीमुळे न्यूझीलंडचा पराभव, भारत अ गटात अव्वल स्थानावर]. टेलिग्राफ इंडिया . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Who is Ryan Rickelton? Proteas batter who scored a ton vs Afghanistan" [रायन रिकलटन कोण आहे? अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा प्रोटीयस फलंदाज]. बिझनेस स्टँडर्ड . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Only the second time there have been 4 50+ scores in one CT innings" [चॅम्पियन चषक स्पर्धेच्या एका सामन्यातील एका डावात ४ फलंदाजांतर्फे ५०+ धावा झाल्याची ही फक्त दुसरी वेळ.]. हिंदुस्थान टाइम्स . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Highest match aggregates for Afghanistan vs South Africa in ODIs" [एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका ह्या संघांदरम्यानच्या सामन्यांमधील सर्वाधिक एकूण धावा]. ईएसपीएन क्रिकइन्फो . ४ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "England's Ben Duckett Makes IPL Teams Regret With A Spectacular Hundred Vs Australia" [इंग्लंडच्या बेन डकेटने झळकावले ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक, आयपीएल संघांवर पश्चात्तापाची पाळी.]. क्रिकेट.वन . ५ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Ben Duckett goes past Ganguly, Tendulkar to achieve big Champions Trophy milestone as England pile misery on Australia" [इंग्लंडचे ऑस्ट्रेलियावर संकट, बेन डकेटने गांगुली, तेंडुलकर यांना मागे टाकत गाठला चॅम्पियन्स ट्रॉफीचा मोठा टप्पा.]. हिंदुस्थान टाइम्स . ५ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Most Wickets Taken By Australian Spinners In International Cricket" [आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांनी घेतलेले सर्वाधिक विकेट]. क्रिकेट.वन . ५ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "AUS vs ENG: England registers highest total in ICC Champions Trophy history before Australia smashes record in same match" [ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड: इंग्लंडने नोंदवली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या, तर ऑस्ट्रेलियाने त्याच सामन्यात मोडला विक्रम.]. स्पोर्टस्टार . २२ फेब्रुवारी २०२५.
^ "Inglis bashes maiden ODI ton in record Australia chase in Champions Trophy" [चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लिसने पहिले एकदिवसीय शतक ठोकले]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ५ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Inglis, Carey combine to nullify Duckett's historic ton" [इंग्लिस आणि केरी यांनी मिळून डकेटच्या ऐतिहासिक शतकाचे महत्त्व कमी केले.]. क्रिकबझ्झ.कॉम . ५ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy: Australia have not won a single match since 2009, here are other interesting facts about the tournament" [चॅम्पियन्स ट्रॉफी: २००९ पासून ऑस्ट्रेलियाने एकही सामना जिंकलेला नाही, स्पर्धेबद्दल इतर मनोरंजक तथ्ये येथे आहेत]. द इकॉनॉमिक टाइम्स . ५ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "AUS vs ENG: Australia completes highest successful chase in a 50-over ICC event" [ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड: ऑस्ट्रेलियाने ५० षटकांच्या आयसीसी स्पर्धेत धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग केला]. स्पोर्टस्टार . ५ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy: Records fall like ninepins in high-octane Aus-Eng run-fest" [चॅम्पियन्स ट्रॉफी: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडच्या सामन्यात विक्रम कोसळले]. जिओ न्यूज . ५ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Quickest to 50 ODI wickets, full list: Archer breaks Anderson's all-time England record" [सर्वात जलद ५० एकदिवसीय विकेट्स, संपूर्ण यादी: आर्चरने अँडरसनचा इंग्लंडचा सर्वकालीन विक्रम मोडला]. विस्डेन . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "ENG vs AFG: Ibrahim Zadran becomes first Afghanistan batter score century in Champions Trophy" [इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा इब्राहिम झद्रान अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज.]. स्पोर्टस्टार . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Ibrahim Zadran Becomes First Afghanistan Player To Hit Multiple Centuries Across ICC ODI Events, Achieves Feat During AFG vs ENG Champions Trophy 2025 Match in Lahore" [इब्राहिम झद्रान आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये अनेक शतके ठोकणारा पहिला अफगाणिस्तानचा खेळाडू, लाहोरमध्ये झालेल्या एएफजी विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सामन्यादरम्यान केला पराक्रम.]. लेटेस्टली . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "AFG vs ENG: Ibrahim Zadran records highest score by a batter in ICC Champions Trophy" [अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड: इब्राहिम झद्रानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फलंदाजाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम.]. स्पोर्टस्टार . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Ibrahim Zadran smacks 177 runs against England: List of records Afghanistan international broke" [इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्ध केल्या १७७ धावा: अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूने मोडलेल्या विक्रमांची यादी]. इंडिया टीव्ही . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Ibrahim Zadran scripts Champions Trophy record with fiery knock against England" [इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार खेळीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला विक्रम]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Fastest to 1000 ODI runs: Ben Duckett equals England record, joint-fourth on all-time list" [सर्वात जलद १००० एकदिवसीय धावा: बेन डकेटची इंग्लंडच्या विक्रमाशी बरोबरी, सर्वकालीन यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर]. विस्डेन . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy 2025: England knocked out as Afghanistan create history with eight-run victory" [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: इंग्लंडचा पराभव, अफगाणिस्तानने आठ धावांनी विजय मिळवत रचला इतिहास]. फर्स्टपोस्ट . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Afghanistan ODI Records – Smallest victories" [अफगाणिस्तान एकदिवसीय विक्रम – सर्वात लहान विजय]. ईएसपीएन क्रिकइन्फो . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "England out of Champions Trophy after Afghanistan thriller" [अफगाणिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यानंतर इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर]. बीबीसी . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Azmatullah Omarzai completes 1000 runs in ODI cricket, propels Afghanistan to fighting total against Australia" [अझमतुल्लाह उमरझाईच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानला लढाऊ धावसंख्येपर्यंत पोहोचवले]. इंडिया टीव्ही . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy 2025: Afghanistan vs Australia, Match 10: Stats Review of player records and achieved milestones" [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सामना १०: खेळाडूंच्या विक्रमांचा आकडेवारी आढावा आणि साध्य केलेले टप्पे]. क्रिकट्रॅकर . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Australia vs Afghanistan: Australia Shatter Champions Trophy Record" [ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान: ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा विक्रम मोडला]. प्रोपाकिस्तानी.पीके . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Australia qualify for semi-finals after rain truncates chase against Afghanistan in Lahore" [लाहोरमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Champions Trophy 2025: England vs South Africa, Match 11: Stats Review of player records and achieved milestones" [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सामना ११: खेळाडूंच्या विक्रमांचा आणि साध्य केलेल्या टप्पे यांचा आकडेवारी आढावा]. क्रिकट्रॅकर . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Lungi Ngidi Joins Elite Club, Completes 100 Wickets In ODIs After Dismissing Jos Buttler" [जोस बटलरला बाद करुन लुंगी न्गिदी एलिट क्लबमध्ये सामील, एकदिवसीय सामन्यात १०० बळी पूर्ण]. क्रिकेट.वन . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
^ "Semi-finalists confirmed for Champions Trophy 2025" [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी उपांत्य फेरीतील संघ निश्चित]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ६ मार्च २०२५ रोजी पाहिले .
टप्पे आकडेवारी माहिती २०२९ आयसीसी चॅम्पियन्स चषक →
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.