२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक अंतिम सामना
![]() दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये (२०१९ मध्ये चित्रित) पहिला आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. | |||||||||
स्पर्धा | २०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||
भारत ४ गडी राखून विजयी | |||||||||
दिनांक | ९ मार्च २०२५ | ||||||||
स्थान | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई | ||||||||
सामनावीर | रोहित शर्मा (भा) | ||||||||
पंच | रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ) | ||||||||
← २०१७ २०२९ → |
२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा अंतिम सामना हा ९ मार्च २०२५ रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा विजेता निश्चित करण्यासाठी खेळला गेलेला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना होता. हा सामना भारत आणि न्यू झीलंड या संघांदरम्यान खेळला गेला. २००० साली खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यानंतर भारत आणि न्यू झीलंड एकमेकांविरुद्ध चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याची ही दुसरी वेळ होती.
न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ७ बाद २५१ धावा केल्या. दुसऱ्या डावात, भारताने ६ गड्यांच्या मोबदल्यात २५४ धावा केल्या आणि ४ गडी राखून विजय मिळवत आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेचे तिसरे विजेतेपद पटकावले आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सामने जिंकून अपराजित राहत आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकणारा पहिला संघ बनला.[१][२] रोहित शर्माला ८३ चेंडूत ७६ धावा केल्याबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आले.[३]
पार्श्वभूमी
[संपादन]२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक ही आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेची नववी आवृत्ती होती, जी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) द्वारे आयोजित केली जाणारी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये २०२४-२०३१ आयसीसी पुरुष यजमान कालखंडाचा भाग म्हणून, आयसीसीने २०२५ चॅम्पियन्स चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवण्याची घोषणा केली.[४]
१९ डिसेंबर २०२४ रोजी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यातील करारानंतर, आयसीसीने घोषणा केली की २०२४-२०२७ आयसीसी स्पर्धा कालखंडामध्ये भारत किंवा पाकिस्तानने आयोजित केलेल्या आयसीसी स्पर्धांमधील भारत आणि पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील.[५] २४ डिसेंबर २०२४ रोजी, आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले, ज्यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम स्पर्धेसाठी तटस्थ ठिकाण होते आणि अंतिम सामना ९ मार्च २०२५ रोजी होणार होता.[६] आयसीसीने पुढे म्हटले आहे की, जर भारत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला तर तो दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळेल, अन्यथा अंतिम सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल.[७]
२०००, २००२, २०१३ आणि २०१७ नंतर भारतीय संघ पाचव्यांदा चॅम्पियन्स चषक अंतिम सामन्यामध्ये खेळला,[८] तर २००० आणि २००९ नंतर न्यू झीलंडचा संघ तिसऱ्यांदा अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.[९] या सामन्यापूर्वी, भारत आणि न्यू झीलंड चॅम्पियन्स चषक स्पर्धेमध्ये फक्त दोनदा एकमेकांविरुद्ध खेळले होते, दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता.[१०]
अंतिम सामन्याचा मार्ग
[संपादन]आढावा
[संपादन]- स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[११]
![]() |
वि | ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
विरोधी संघ | दिनांक | निकाल | गुण | सामना | विरोधी संघ | दिनांक | निकाल | गुण |
गट अ | गट फेरी | गट अ | ||||||
![]() |
२० फेब्रुवारी २०२५ | विजय | २ | १ | ![]() |
१९ फेब्रुवारी २०२५ | विजय | २ |
![]() |
२३ फेब्रुवारी २०२५ | विजय | ४ | २ | ![]() |
२४ फेब्रुवारी २०२५ | विजय | ४ |
![]() |
२ मार्च २०२५ | विजय | ६ | ३ | ![]() |
२ मार्च २०२५ | पराभव | ४ |
उपांत्य सामना १ | बाद फेरी | उपांत्य सामना २ | ||||||
![]() |
४ मार्च २०२५ | विजय | उपांत्य | ![]() |
५ मार्च २०२५ | विजय | ||
२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक अंतिम सामना |
भारत
[संपादन]पहिल्या सामन्यापासून ते उपांत्य फेरीपर्यंत भारतीय संघ अपराजित होता. त्यांनी चॅम्पियन्स चषक मोहिमेची सुरुवात बांगलादेशवर विजय मिळवून केली[१२] आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला.[१३] नंतर, त्यांनी न्यू झीलंडचा ४४ धावांनी पराभव केला आणि गट अ चा विजेता म्हणून गट फेरी पूर्ण केली.[१४] त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून २०००, २००२, २०१३ आणि २०१७ नंतर विक्रमी पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.[१५]
न्यू झीलंड
[संपादन]न्यू झीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेची सुरुवात यजमान पाकिस्तानवर विजय मिळवून केली[१६] आणि त्यानंतर बांगलादेशला हरवले.[१७] तथापि, त्यांना शेवटच्या गट सामन्यात भारताकडून पराभव स्वीकारावा लागला आणि गट अ मध्ये संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.[१८] नंतर, त्यांनी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला हरवून २००० आणि २००९ नंतर तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.[१९]
सामना
[संपादन]सामना अधिकारी
[संपादन]६ मार्च २०२५ रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (ICC) इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रायफेल यांना मैदानी पंच म्हणून नियुक्त केले, तसेच वेस्ट इंडीजचे जोएल विल्सन यांना तिसरे पंच म्हणून, श्रीलंकेचे कुमार धर्मसेना यांना राखीव पंच म्हणून आणि रंजन मदुगले यांना सामनाधिकारी म्हणून नियुक्त केले.[२०][२१]
- मैदानी पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
- टीव्ही पंच: जोएल विल्सन (वे)
- राखीव पंच: कुमार धर्मसेना (श्री)
- सामनाधिकारी: रंजन मदुगले (श्री)
संघ आणि नाणेफेक
[संपादन]न्यू झीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. उपांत्य फेरी खेळणाऱ्या संघात भारतातर्फे कोणताही बदल केला गेला नव्हता, तर न्यू झीलंडने मॅट हेन्रीच्या जागी नेथन स्मिथला संघात स्थान दिले.[२२]
न्यू झीलंडचा डाव
[संपादन]न्यू झीलंडचे सलामीवीर विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी ५७ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केल्यानंतर वरुण चक्रवर्तीने ८ व्या षटकाच्या शेवटी यंगला बाद करून भागीदारी फोडली. नंतर, कुलदीप यादवने रवींद्र आणि केन विल्यमसन यांना पुढील षटकांमध्ये बाद केले आणि न्यू झीलंडची अवस्था ३ गाडी बाद ७५ अशी झाली. लवकरच, टॉम लॅथमलाही रवींद्र जाडेजाने स्वस्तात बाद केले. नंतर, डॅरिल मिचेलने १०१ चेंडूत ६३ धावा करून डाव स्थिर केला आणि त्यानतंर तो भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या हाती झेलबाद झाला. न्यू झीलंडचा डाव काहीसा मंदावला पण मायकेल ब्रेसवेलच्या ४० चेंडूतील नाबाद ५३ धावा आणि ग्लेन फिलिप्सच्या ३४ धावांमुळे त्यांनी ७ गडी बाद २५१ धावा केल्या. यादव आणि चक्रवर्तीने प्रत्येकी २ बळी घेतले तर जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १ बळी घेतला.[२३][२४][२५]
भारताचा डाव
[संपादन]५० षटकांत २५२ धावांचे लक्ष्य गाठताना, भारताने ४९ षटकांतच पाठलाग पूर्ण केला आणि ४ गडी राखून विजय मिळवला.[२६] सलामीवीर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी १०५ धावांची भागीदारी करत डावाची सुरुवात चांगली केली. त्यानंतर १९ व्या षटकात गिलला मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सने ३१ धावांवर झेलबाद केले. गिलच्या विकेटनंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीला मायकेल ब्रेसवेलने त्याला स्वस्तात बाद केले, त्याने दोन चेंडूंत एक धाव केली. त्यानंतर मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी नांगर टाकला. अय्यरने ६२ चेंडूंत ४८ धावा काढल्या आणि नंतर सँटनरने त्याला बाद केले, तर पटेलला ४० चेंडूंत २९ धावांवर ब्रेसवेलने बाद केले.[२६][२७] ३३ चेंडूत नाबाद ३४ धावा करणाऱ्या केएल राहुलने हार्दिक पंड्याच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पंड्याने काईल जेमीसनला विकेट देण्याआधी १८ चेंडूत १८ धावा केल्या. रवींद्र जाडेजाने ६ चेंडूत नाबाद ९ धावा करत एक षटक शिल्लक असताना विजयी धावा काढल्या.[२८][२९]
सामन्याचा तपशील
[संपादन]वि
|
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रोहित शर्मा (भारत) ने ब्रायन लाराच्या सलग १२व्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.[३०]
- डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) ने आयसीसी मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या.
- रोहित शर्मा (भारत) ने न्यूझीलंडविरुद्ध १,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.[३१]
- रोहित शर्माने कर्णधार म्हणून २,५०० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.[३२]
- रोहित शर्मा (भारत) ने आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याचे पहिले अर्धशतक केले.[३३]
- श्रेयस अय्यर (भारत) ने न्यूझीलंड (न्यूझीलंड) विरुद्ध १,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.
- रोहित शर्मा (भारत) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला कर्णधार ठरला.[३४]
सामन्याचा धावफलक[३५]
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
गडी बाद होण्याचा क्रम: १-५७ (विल यंग, ७.५ ष), २-६९ (रचिन रवींद्र, १०.१ ष), ३-७५ (केन विल्यमसन, १२.२ ष), ४-१०८ (टॉम लॅथम, २३.२ ष), ५-१६५ (ग्लेन फिलिप्स, ३७.५ ष), ६-२११ (डॅरिल मिचेल, ४५.४ ष), ७-२३९ (मिचेल सँटनर, ४८.६ ष)
गडी बाद होण्याचा क्रम: १-१०५ (शुभमन गिल, १८.४ ष), २-१०६ (विराट कोहली, १९.१ ष), ३-१२२ (रोहित शर्मा, २६.१ ष), ४-१८३ (श्रेयस अय्यर, ३८.४ ष), ५-२०३ (अक्षर पटेल, ४१.३ ष), ६-२४१ (हार्दिक पंड्या, ४७.३ ष)
|
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "India edge New Zealand to win the Champions Trophy 2025" [न्यूझीलंडला हरवून भारताने जिंकला २०२५ चॅम्पियन्स चषक]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Dominant & unbeaten India lift ICC Champions Trophy 2025" [दबदबा असलेल्या आणि अपराजित भारताने आयसीसी चॅम्पियन्स चषक २०२५ स्पर्धा जिंकली]. बीसीसीआय. १९ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rohit Sharma becomes 2nd Indian to win Player of the Match award in Champions Trophy final" [चॅम्पियन्स चषक अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय.]. इंडिया टीव्ही न्यूज. १९ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "USA to stage T20 World Cup: 2024-2031 ICC Men's tournament hosts confirmed" [अमेरिकेत होणार टी२० विश्वचषक: २०२४-२०३१ आयसीसी पुरुष स्पर्धांचे यजमानपद निश्चित] (इंग्रजी भाषेत). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ नोव्हेंबर २०२१. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Update issued on India and Pakistan hosted matches at ICC events" [आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानने आयोजित केलेल्या सामन्यांबद्दल ताजी माहिती जारी.] (इंग्रजी भाषेत). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ डिसेंबर २०२४. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC Men's Champions Trophy 2025 schedule announced" [आयसीसी पुरुष चॅम्पियन्स चषक स्पर्धा २०२५ चे वेळापत्रक जाहीर] (इंग्रजी भाषेत). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २४ डिसेंबर २०२४. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC Champions Trophy 2025" [आयसीसी चॅम्पियन्स चषक २०२५] (PDF). ICC Champions Trophy, playing conditions. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 9. १५ फेब्रुवारी २०२५. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
- ^ "India's dominance continues: 5th final appearance in seven ICC tournaments" [भारताचे वर्चस्व कायम: सात आयसीसी स्पर्धांमध्ये पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश]. बिझनेस स्टँडर्ड. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "NZ overpower SA to make Champions Trophy final" [दक्षिण आफ्रिकेवर मत करून न्यूझीलंडने गाठली चॅम्पियन्स चषक स्पर्धेची अंतिम फेरी]. बीबीसी. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Champions Trophy 2025: Revisiting India and New Zealand's head-to-head record ahead of Sunday's final" [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: रविवारच्या अंतिम सामन्यापूर्वी भारत आणि न्यूझीलंडच्या समोरासमोरील विक्रमाची उजळणी]. फर्स्टपोस्ट. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "2025 ICC Champions Trophy, points table standings" [२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक, गुणफलक क्रमवारी].
- ^ "Gill hits ton as India cruise to victory over Bangladesh" [गिलच्या शतकामुळे भारताचा बांगलादेशवर विजय]. बीबीसी स्पोर्ट्स. २० फेब्रुवारी २०२५. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Kohli slams 100, India breeze past Pakistan by six wickets" [कोहलीच्या १०० धावा, भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ फेब्रुवारी २०२५. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Champions Trophy: Varun Chakravarthy takes 5 wickets as India defeat New Zealand by 44 runs to set up semifinal date with Australia" [चॅम्पियन्स ट्रॉफी: वरुण चक्रवर्तीच्या ५ बळींमुळे भारताने न्यूझीलंडला ४४ धावांनी हरवले आणि ऑस्ट्रेलियासोबत सेमीफायनलची तारीख निश्चित केली.]. द इंडियन एक्सप्रेस. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "IND vs AUS: Kohli leads India into fifth Champions Trophy final" [IND विरुद्ध AUS: कोहलीच्या कामगिरीने भारत पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत]. स्पोर्टस्टार. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "New Zealand Dominate Pakistan With 60-Run Win In Champions Trophy Opener" [चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर ६० धावांनी विजय मिळवला.]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "NZ beat Bangladesh to reach Champions Trophy semis" [बांगलादेशला नमवून न्यूझीलंडचा चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश.]. बीबीसी. २४ फेब्रुवारी २०२५. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Champions Trophy: Chakravarthy spins out New Zealand to ensure India top group" [चॅम्पियन्स ट्रॉफी: चक्रवर्तीने न्यूझीलंडला बाद करत भारताला गटात अव्वल स्थान मिळवून दिले]. द गार्डियन. २ मार्च २०२५. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "New Zealand secure place in ICC Champions Trophy 2025 final" [आयसीसी चॅम्पियन्स चषक २०२५ च्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचे स्थान निश्चित]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Match officials for Champions Trophy 2025 final confirmed" [चॅम्पियन्स चषक स्पर्धा २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी सामनाधिकारी निश्चित]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Paul Reiffel, Richard Illingworth named on-field umpires for Champions Trophy final" [चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पॉल रायफेल, रिचर्ड इलिंगवर्थ यांची मैदानी पंच म्हणून नियुक्ती.]. द टाइम्स ऑफ इंडिया. ६ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "IND vs NZ, Champions Trophy Final: New Zealand suffer big blow as they win toss and bat against unchanged India" [भा वि न्यू, चॅम्पियन्स चषक अंतिम सामना: न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने मोठा धक्का बसला.]. द टाइम्स ऑफ इंडिया. २५ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Spin quartet keep New Zealand to 251 in CT final" [चॅम्पियन्स चषक अंतिम सामन्यात फिरकी चौकडीने न्यूझीलंडला २५१ धावांपर्यंत रोखले] (इंग्रजी भाषेत). क्रिकबझ्झ. ९ मार्च २०२५. २ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
- ^ हाशिम, ताहा (९ मार्च २०२५). "India v New Zealand: Champions Trophy men's cricket final – live" [भारत विरुद्ध न्यूझीलंड: चॅम्पियन्स चषक पुरुष क्रिकेट अंतिम सामना – थेट]. द गार्डियन (इंग्रजी भाषेत). ISSN 0261-3077. 2025-03-09 रोजी पाहिले.
- ^ "Champions Trophy Final LIVE: India vs New Zealand – cricket score, radio, highlights & updates" [चॅम्पियन्स चषक अंतिम सामना थेट: भारत विरुद्ध न्यूझीलंड – क्रिकेट स्कोअर, रेडिओ, हायलाइट्स आणि अपडेट्स]. बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b "India vs New Zealand, Final, ICC Champions Trophy, 2025" [भारत विरुद्ध न्यूझीलंड, अंतिम सामना, आयसीसी चॅम्पियन्स चषक, २०२५]. क्रिकबझ्झ. ३ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rohit, Rahul, spinners lead India to third Champions Trophy title" [रोहित, राहुल आणि फिरकीपटूंनी भारताला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद मिळवून दिले.]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
- ^ "The cup, the ghosts and the calm within the storm" [तो चषक, भुते आणि वादळातील शांतता]. क्रिकबझ्झ. ३ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Champions Trophy final: India survive scare to beat New Zealand and win title" [चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल: न्यूझीलंडला हरवून भारताने जिंकला विजेतेपदाचा किताब]. बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). 2025-03-09. ३ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Champions Trophy Final - IND vs NZ: Rohit Sharma loses 12th straight toss, equals Brian Lara's all-time record" [चॅम्पियन्स चषक अंतिम सामना - भा विरुद्ध न्यू: रोहित शर्माने सलग १२ वा टॉस गमावला, ब्रायन लाराच्या सर्वकालीन विक्रमाशी बरोबरी]. द इंडियन एक्सप्रेस. २५ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rohit Sharma Joins Virat Kohli In Elite List, Becomes 7th Indian Batter To..." [रोहित शर्मा एलिट यादीत विराट कोहलीसोबत सामील, सातवा भारतीय फलंदाज बनला…]. न्यूज१८. २५ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "स्पेशल 2500 रन...चैंपियंस ट्रॉफी में रोहित शर्मा की दहाड़, धोनी-कोहली और गांगुली के क्लब में मारी एंट्री" [स्पेशल २५०० धाव...चॅम्पियन चषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माची गर्जना, धोनी-कोहली आणि गांगुलीच्या क्लबमध्ये प्रवेश]. झी न्यूज (हिंदी भाषेत). २५ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Champions Trophy 2025: Rohit Sharma hits first fifty in 9th ICC final appearance" [चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: रोहित शर्माने नवव्या आयसीसी फायनलमध्ये पहिले अर्धशतक ठोकले]. द इंडियन एक्सप्रेस. २५ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rohit Sharma shares the secret of India's success" [रोहित शर्माने सांगितले भारताच्या यशाचे रहस्य]. आयसीसी. २५ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "IND v NZ Live score – ICC Champions Trophy 2025 March 9, 2025 Final in Dubai" [भारत विरुद्ध न्यूझीलंड थेट धावफलक – आयसीसी चॅम्पियन्स चषक २०२५, ९ मार्च २०२५ दुबईमधील अंतिम सामना] (इंग्रजी भाषेत). ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ मार्च २०२५. २० मार्च २०२५ रोजी पाहिले.