२०१८ कान्स चित्रपट महोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१८ कान्स चित्रपट महोत्सव हा वार्षिक चित्रपट महोत्सव फ्रांसच्या कान्स शहरात ८ ते १९ मे २०१८ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या समारंभाची ही ७१वी आवृत्ती होती.

ऑस्ट्रेलियन अभिनेत्री केट ब्लँचेेट यांनी जूरी अध्यक्ष म्हणून काम केले. हिरोकाझू कोरे-ईडन दिग्दर्शित जपानी चित्रपट शॉप लिफ्टर्सने पाल्मे डी'ओर जिंकला.

असगर फरहादीच्या मानसशास्त्रीय थ्रिलर एव्हरीबडी नोज या हावियेर बारदेम, पेनेलोप क्रूज आणि रिकार्डो डॅरिन यांनी अभिनीत चित्रपटासह हा उत्सव सुरू झाला.