Jump to content

२०१७ मुंबई चेंगराचेंगरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१७ मुंबईतील चेंगराचेंगरी
अपघात, चेंगराचेंगरी
ह्याचा भागचेंगराचेंगरी संपादन
देशभारत संपादन
स्थानPrabhadevi railway station संपादन
भौगोलिक गुणक१९°०′२७″N ७२°५०′१०″E संपादन
तारीख२९ सप्टेंबर 2017 संपादन
Has causeपाऊस संपादन
Has immediate causeovercrowding संपादन
Map

२९ सप्टेंबर, २०१७ रोजी मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकात (पूर्वीचे एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानक) चेंगराचेंगरी झाली. [] परळ रेल्वे स्थानक आणि प्रभादेवी उपनगरी रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीमध्ये किमान २३ जण ठार, तर ३९ जण जखमी झाले.[]

घटना

[संपादन]

२९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांमध्ये एकाच वेळी चार उपनगरी गाड्या आल्या.[][] प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या[][] अरुंद पादचारी पुलावर अनेक लोक एकाच वेळी चढले.[][] या वेळी पाऊस पडत होता. या सुमारास कोणी तरी व्यक्ती घसरून पडल्यावर ही चेंगराचेंगरी झाली असावी.[]

पूल पडत आहे अशी अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी अधिक गर्दी करीत पळ काढण्याचा प्रयत्न केला.[१०] एका साक्षीदारानुसार पोलीस आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांनी लगेच प्रतिसाद न दिल्यामुळे परिस्थिती चिघळली.

या चेंगराचेंगरीत किमान २३ लोक मरण पावले‌[११] आणि ३९ जण जखमी झाले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक लोकांचे मृत्यू गुदमरून आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे झाला.[१२]

पोलीस तपास

[संपादन]

"आम्ही जवळपास निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. या चेंगराचेंगरीचं मुख्य कारण म्हणजे पाऊस आणि अचानक वाढलेली गर्दी आहे. एकाचवेळी चार लोकल स्टेशन परिसरात आल्या. त्या लोकलमधून प्रवासी आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली." असे दादर पोलिसांनी सांगीतले.[१३] दादर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (ADR) नोंद झाली आहे.

अपघातांचे बळी

[संपादन]

अपघातात मरण पावलेल्या लोकांची यादी[१४]

नाववयलिंगनिवास
हिलोनी देढिया२४महिलाघाटकोपर
रोहित परब११पुरुषविक्रोळी
ॲलेक्स कॉरिया६१पुरुषविरार
अंकुश जयस्वाल३६पुरुषदादर
शुभा शेट्टी४५महिलाकांजुर मार्ग
सुजाता अल्वा४५महिलाकांजुर मार्ग
चांद्रबंग इंगळे५०महिलाकांजुर मार्ग
विजय बहादूर५०पुरुषघणसोली
सुरेश जैस्वाल५०पुरुषअंधेरी
ज्योतिबा चव्हाण२९पुरुषमुंब्रा
टेरेसा फर्नांडिस३९महिलादादर
मुस्तक रियन४५पुरुषमुंब्रा
मुकेश मिश्रा२२पुरुषशीव
मीना वाल्हेकर३५महिलाउल्हासनगर
शारदा वरपे२५महिलाकल्याण
मयुरेश हळदणकर२०पुरुषवरळी
प्रियांका पासलकर२३महिलाकुर्ला
मसूद शेख३५पुरुषगोवंडी

संदर्भ

[संपादन]
  1. "22 Dead, Many Injured In Stampede Near Mumbai's Elphinstone Station". NDTV. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  2. "Elphinstone Road station stampede: 22 dead, 39 hurt; government announces compensation, orders probe - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  3. "22 Dead, Many Injured In Stampede Near Mumbai's Elphinstone Station". NDTV. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  4. "Stampede in Mumbai kills at least 22". IN (इंग्लिश भाषेत). 2017-09-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. "Stampede at Mumbai Railway Station Kills at Least 22" (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. "Mumbai stampede kills 23, injures 39 at train station". CNN. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  7. "Mumbai railway station stampede kills 22". BBC News. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  8. "Mumbai railway station stampede kills at least 22". The Guardian (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. "Mumbai stampede: 22 killed, over 39 injured". The Hans India (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  10. "Mumbai station stampede kills at least 22 amid rumour bridge was collapsing". The Telegraph. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  11. "Elphinstone stampede: death toll climbs to 23". द हिंदू (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  12. "Crushed: What happened at Mumbai's Elphinstone Road railway station". द हिंदू (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. "एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: पोलिसांनी कारण शोधलं, निष्कर्ष काढला!". 2018-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  14. "'Victims of murder, not an accident'". Mumbai Mirror. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.