Jump to content

२०१७ एन्नोर तेल गळती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
2017 Ennore oil spill; २०१७ एन्नोर तेल गळती; எண்ணூர் துறைமுக கப்பல் மோதல் விபத்து; Oil spill in India; Oil spill in India
२०१७ एन्नोर तेल गळती 
Oil spill in India
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
  • भारत
Map१३° १३′ ४१.४″ N, ८०° २१′ ४८″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

२०१७ मध्ये एन्नोरमध्ये तेल गळती झाली जी भारतातील तामिळनाडूमधील चेन्नईजवळील एन्नोर येथील कामराजर बंदराबाहेर झाली.[][] २८ जानेवारी २०१७ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे ४:०० वाजता बाहेर जाणाऱ्या रिकाम्या टँकर बीडब्ल्यू मेपल आणि आत येणाऱ्या तेलाने भरलेला डॉन कांचीपुरम टँकर यांची टक्कर झाली व तेल गळती झाली.[]

ही टक्कर कामराजर बंदरापासून दोन नॉटिकल मैल अंतरावर एन्नोर येथील नैसर्गिक बंदरात झाली. कोरोमंडल किनाऱ्यावर चेन्नईच्या उत्तरेस २० किमी वर हे आहे बंदर आहे.

घटना

[संपादन]

२७ जानेवारी २०१७ रोजी पहाटे ४ वाजता दोन्ही जहाजांची टक्कर झाली. सकाळी कामराजर बंदर प्राधिकरणाने एक प्रेस स्टेटमेंट जारी केले की पर्यावरणाचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यात असेही सूचित केले गेले की दोन्ही जहाजे सुरक्षितपणे नांगरलेली आहेत आणि जहाजांना झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन केले जात आहे.[] दुपारपर्यंत, तेल गळती दिसून आली, व मृत कासवे किनाऱ्यावर वाहून जात होती आणि जवळच्या किनारी भागातील रहिवाशांना तेलाचा तीव्र वास येत होता.[] भारतीय तटरक्षक दलाने परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि आवश्यक ती मदत पुरवली.[]

परिणाम

[संपादन]

२९ जानेवारी २०१७ रोजी या टक्करीच्या कारणाचा तपास सुरू झाला.[] मासेमार समुदायाने दावा केला की शेकडो मासे मृत्युमुखी पडले आणि गळती किनाऱ्यावर आल्यामुळे ते मासेमारीसाठी जाऊ शकत नाहीत.[][]

७ फेब्रुवारी रोजी, तेल गळती व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नांमुळे अंदाजे १६० मेट्रिक टन गाळ बाहेर पडला,[१०] ५७०० हून अधिक लोकांनी तो काढला.[११] [१२] [१३]

फेब्रुवारी २०१७ मध्ये, भारतीय तटरक्षक दलाने सांगितले की अंदाजे ३४,००० चौरस मीटर (३,७०,००० चौ. फूट) क्षेत्र प्रभावित झाले होते.[१४] त्यांनी सांगितले की ९५ टक्के गळती चेन्नई बंदराच्या उत्तरेकडे होती आणि ८०० मीटर (२,६०० फूट) लांबीवर गाळ साचला होता. त्यांनी पुढे सांगितले की शहराच्या मरीना बीचच्या किनाऱ्यावर कमीत कमी परिणाम झाला आणि तिरुवल्लूर उपनगराच्या किनाऱ्यावर ३ किलोमीटर (१.९ मैल) वर तेल जमा झाले.[१५] गळतीचे प्रमाण ९.९ दशलक्ष US gallon (३७,००० मी) इतके अंदाजे होते.[१६]

तामिळनाडू सरकारवर संकटकालीन संवाद आणि आकस्मिक प्रतिसादात अपयश आल्याबद्दल टीका झाली.[१७]

संदर्भ

[संपादन]
  1. "Pollution central: in thEnnore oil spill". The Hindu (इंग्रजी भाषेत). 31 January 2017. 27 February 2017 रोजी पाहिले.
  2. "Two oil ships collide off Ennore port, Indian Coast Guard on alert". United News of India (UNI). 28 January 2017. 7 February 2017 रोजी पाहिले.
  3. "Press Note – Kamarajar Port" (PDF). 28 January 2017. 7 February 2017 रोजी पाहिले.
  4. "Press Note – Kamarajar Port" (PDF). 28 January 2017. 7 February 2017 रोजी पाहिले.
  5. "Chennai oil spill dooms turtles". The Hindu (इंग्रजी भाषेत). 29 January 2017. 7 February 2017 रोजी पाहिले.
  6. Shivakumar, C (29 January 2017). "Oil spill across Kamarajar Port after ships collide off Ennore Port". The New Indian Express (TNIE). 7 February 2017 रोजी पाहिले.
  7. Anand, N (29 January 2017). "Misjudgment caused collision of ships". The Hindu (इंग्रजी भाषेत). 7 February 2017 रोजी पाहिले.
  8. Ramakrishnan, Deepa H. "Oil pollution threatens Chennai's beaches too". The Hindu (इंग्रजी भाषेत). 27 February 2017 रोजी पाहिले.
  9. "Dead turtles, fish wash ashore after collision". News Today (इंग्रजी भाषेत). 30 January 2017. 8 February 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 February 2017 रोजी पाहिले.
  10. "Chennai oil spill: Tamil Nadu CM promises normalcy soon". indiatoday.intoday.in/videos. 5 February 2017. 7 February 2017 रोजी पाहिले.
  11. "90 percent spill cleared, fish safe for consumption: CM Panneerselvam on Chennai oil spill". The New Indian Express (TNIE). 5 February 2017. 7 February 2017 रोजी पाहिले.
  12. "Chennai oil spill: Health hazards of this ecological nightmare are monumental". Firstpost.com (इंग्रजी भाषेत). 7 January 2017. 7 January 2017 रोजी पाहिले.
  13. "Chennai oil spill: Sludge-cleaning efforts move at snail's pace as state depts pass buck to each other". Firstpost.com (इंग्रजी भाषेत). 7 February 2017. 7 February 2017 रोजी पाहिले.
  14. Thangavelu, Dharani (3 February 2017). "Chennai oil spill: 72 tonnes of oil sludge collected, says Coast Guard". Livemint. 2 March 2017 रोजी पाहिले.
  15. "Chennai oil spill: Men and machines fight black wave". The Times of India. 2 February 2017. 2 March 2017 रोजी पाहिले.
  16. "Chennai Oil Spill". oil.piratelab.org. 7 February 2017. 2 March 2017 रोजी पाहिले.
  17. Mazoomdaar, Jay (3 February 2017). "Oil Spill: We're well prepared on paper but sluggish response made preparedness a joke". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 7 February 2017 रोजी पाहिले.