२०१६ अटलांटिक हरिकेन मोसम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१६ अटलांटिक हरिकेन मोसम हा अटलांटिक महासागरात सुरू होणाऱ्या चक्रीवादळांचा मोसम होता. हा मोसम १२ जानेवारी ते २५ नोव्हेंबर दरम्यान होता. यात एकूण १६ वादळे झाली. त्यांपैकी १५ चक्रीवादळे होती व त्यातील सात वादळांचे हरिकेनमध्ये रूपांतर झाले. त्यांतील ४ हरिकेन मोठी वादळे होती.

२०१२नंतर हा मोसम सर्वाधिक लांबीचा होता व या वर्षी २०१२नंतर सर्वाधिक चक्रीवादळे झाली होती. या वर्षी झालेल्या हरिकेन मॅथ्यू या कॅटेगरी ४ च्या वादळात ताशी २७० किमी वेगाचे वारे होते.

वादळे[संपादन]

नाव तारीख कॅटेगरी वाऱ्याचा कमाल वेग
(किमी/तास,
सतत १ मिनिट)
लघुत्तम हवादाब
मिलिबार
प्रदेश नुकसान
(लाख अमेरिकन डॉलर)
मृत्यू
(अप्रत्यक्ष)
ॲलेक्स जाने १२-१५ कॅट १ १४० ९८१ बर्म्युडा, ॲझोर्स नगण्य (१)
बॉनी मे २७-जून ४ ट्रॉपिकल स्टॉर्म ७५ १००६ बहामा, आग्नेय अमेरिका ६.४
कॉलिन जून ५-७ ट्रॉपिकल स्टॉर्म ८५ १००१ युकातान, क्युबा, फ्लोरिडा, अमेरिकेचा पूर्व किनारा १०.४
डॅनियेल जून १९-२१ ट्रॉपिकल स्टॉर्म ७५ १००७ युकातान, पूर्व मेक्सिको नगण्य
अर्ल ऑग २-६ कॅट १ १४० ९७९ लेसर अँटिल्स, पोर्तो रिको, हिस्पॅनियोला, जमैका, केमन द्वीपसमूह, मध्य अमेरिका, मेक्सिको २,५०० ९४ (१२)
फियोना ऑग १६-२३ ट्रॉपिकल स्टॉर्म ८५ १००४ --
गास्टन ऑग २२-सप्टें २ कॅट ३ १९५ ९५५ --
आठ ऑग २८-सप्टें १ ट्रॉपिकल डिप्रेशन ५५ १०१० ॲझोर्स
हर्माइन ऑग २८-३ कॅट ३ १३० ९८१ डॉमिनिकन प्रजासत्ताक, क्युबा, फ्लोरिडा, बहामा, अमेरिकेचा पूर्व किनारा, कॅनडाचा अटलांटिक किनारा ५५० ४ (१)
इयान सप्टें १२-१६ ट्रॉपिकल स्टॉर्म ९५ ९९४ --
जुलिया सप्टें १४-१९ ट्रॉपिकल स्टॉर्म ८५ १००७ आग्नेय अमेरिका ६१.३
कार्ल सप्टें १२-२५ ट्रॉपिकल स्टॉर्म ११० ९८८ केप व्हर्दे, बहामा नगण्य
लिसा सप्टें १९-२५ ट्रॉपिकल स्टॉर्म ८५ ९९९ --
मॅथ्यू सप्टें २८-ऑक्टो ९ कॅट ५ २७० ९३४ अँटिल्स, वेनेझुएला, कोलंबिया, अमेरिकेचा पूर्व किनारा, कॅनडाचा अटलांटिक किनारा १,५०,९०० ५८६ (१७)
निकोल ऑक्टो ४-१८ कॅट ४ २२० ९५० बर्म्युडा १५०
ऑट्टो नोव्हें २०-२५ कॅट ३ १८५ ९७५ पनामा, कोस्टा रिका, निकाराग्वा, कोलंबिया १,९००+ २३
मागील:
२०१५ अटलांटिक हरिकेन मोसम
अटलांटिक हरिकेन मोसम
१२ जानेवारी, इ.स. २०१६२५ नोव्हेंबर, इ.स. २०१६
पुढील:
२०१७ अटलांटिक हरिकेन मोसम