Jump to content

दिल्ली विधानसभा निवडणूक, २०१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१३ दिल्ली विधानसभा निवडणूक या पानावरून पुनर्निर्देशित)
दिल्ली विधानसभा निवडणूक, २०१३
भारत
२००८ ←
४ डिसेंबर २०१३ → २०१५

दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागा
बहुमतासाठी ३६ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता हर्षवर्धन अरविंद केजरीवाल शीला दीक्षित
पक्ष भाजप आप काँग्रेस
मागील निवडणूक २३ - ४३
जागांवर विजय ३१ २८
बदल ३५

दिल्ली

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

शीला दीक्षित

निर्वाचित मुख्यमंत्री

अरविंद केजरीवाल

२०१३ मधील दिल्ली विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर ४, इ.स. २०१३ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. दिल्ली बरोबरच मिझोरम, राजस्थान मध्यप्रदेश आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकासुद्धा घेण्यात आल्या. मतमोजणी डिसेंबर ४, इ.स. २०१३ रोजी करण्यात आली. ह्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला दारुण अपयशाचा सामना करावा लागला. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही व सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपने अल्पमतातील सरकार बनवायला नकार दिला. अखेर अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. पर्ंतु केवळ ४९ दिवस सत्तेवर राहिल्यानंतर केजरीवालने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व विधानसभा बरखास्त करण्यात येऊन २०१५ साली पुन्हा नव्याने निवडणूक घेतली गेली ज्यात ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून आप पार्टीने एकच खळबळ उडवून दिली.

पक्षनिहाय उमेदवार

[संपादन]
पक्षनिहाय उमेदवार
पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार
काँग्रेस ७० भाजप ६६ बसपा ७०
राष्ट्रवादी ७० भाकप १० माकप
आम आदमी पार्टी ६९ अकाली दल द्रविड मुन्नेट्र कळगम

निवडणुकीचा निकाल

[संपादन]

मतमोजणी ८ डिसेंबर २०१३ला झाली व खालील प्रमाणे पक्षीय बलाबल आहे.

पक्षनिहाय उमेदवार
पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार
काँग्रेस भाजप ३१ आम आदमी पार्टी २८
अकाली दल जनता दल (संयुक्त) अपक्ष
  भाजप व अकाली दल
  आम आदमी पार्टी
  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  जनता दल
  अपक्ष