ह्यूबर्ट सेसिल बूथ
ह्यूबर्ट सेसिल बूथ(४ जुलै १८७१-१४ जानेवारी १९५५)हे एक इंजिनिअर होते.यांनी प्रथम सिक्युरिटेड व्हॅक्यूम क्लिनरचा शोध लावला. त्यांनी फेरिस व्हील,पूल आणि कारखाने देखील डिझाइन केले. पुढे ते ब्रिटिश व्हॅक्यूम क्लीनर आणि इंजिनियरिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले.[१][२] १९०३ मध्ये त्यांनी ब्रिटिश व्हॅक्यूम क्लिनरची कंपनी तयार केली. सफाईदारांना एक युनिफॉर्म दिला. हळूहळू लोकांना ते आवडायला लागले. ब्रिटिश राजपार व नौदला देखील बुथ कंपनीचे ग्राहक म्हणून सामील झाले.[३][४]
सुरुवातीचे जीवन[संपादन]
बूथ यांचा जन्म इंग्लंड मधील ग्लॉसेस्टर मध्ये १८७१ या साली झाला. त्यांनी त्यांचे शिक्षण ग्लॉसेस्टर कॉलेज आणि ग्लॉस्टर काउंटी शाळेत मुख्याध्यापक रेव्हरंड एच.लॉयड ब्रेरेटन यांच्या अतंर्गत केले.१८९८ मध्ये ते प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यानंतर त्यांनी सेंट्रल टेक्निकल कॉलेज, सिटी अँड गिल्ड, लंडन येथे प्रवेश घेतला.प्रोफेसर विल्यम काथॉर्न यांच्या अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग व मॅकेनिकल इंजिनीअरिंगचा अभ्यास पूर्ण केला. अभियांत्रिकी विभागामध्ये दुसरी पदवी मिळविली. त्याचबरोबर त्यांनी डिप्लोमा ऑफ एसोसिएटशिप पूर्ण केल.ते इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्सचे विद्यार्थी झाले.[५]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "OBITUARY. HUBERT CECIL BOOTH. 1871-1955". Proceedings of the Institution of Civil Engineers (इंग्रजी भाषेत). 4 (4): 631–632. 1955-07. doi:10.1680/iicep.1955.11412. ISSN 1753-7789.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Sucking up to the vacuum cleaner" (इंग्रजी भाषेत). 2001-08-30. 2018-07-04 रोजी पाहिले.
- ^ ब्यूरो, सत्याग्रह. "गूगल ने वैक्यूम क्लीनर बनाने वाले ह्यूबर्ट सेसिल बूथ को डूडल के जरिये श्रद्धांजलि दी". सत्याग्रह (हिंदी भाषेत). 2018-07-04 रोजी पाहिले.
- ^ linenews.in. "Hubert सेसिल बूथ - LineNews.in". linenews.in (इंग्रजी भाषेत). 2018-07-04 रोजी पाहिले.
- ^ "इस अंग्रेज इंजीनियर ने बनाया था आधुनिक वैक्यूम क्लीनर, आज गूगल ने दिया सम्मान". Jansatta (हिंदी भाषेत). 2018-07-04 रोजी पाहिले.