Jump to content

होस्नी मुबारक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होस्नी मुबारक
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वKingdom of Egypt, Republic of Egypt, United Arab Republic, इजिप्त संपादन
स्थानिक भाषेतील नावحُسني مُبارك संपादन
दिलेले नावMuḥammad संपादन
आडनावMubarak संपादन
जन्म तारीख४ मे 1928 संपादन
जन्मस्थानKafr el-Muṣīlḥa संपादन
मृत्यू तारीख२५ फेब्रुवारी 2020 संपादन
मृत्यूस्थानकैरो संपादन
मृत्युचे कारणsurgical complications संपादन
चिरविश्रांतीस्थानHeliopolis संपादन
वैवाहिक जोडीदारSuzanne Mubarak संपादन
अपत्यAlaa Mubarak, Gamal Mubarak संपादन
नातेवाईकHeidy Rasekh संपादन
मातृभाषाअरबी भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाअरबी भाषा, इंग्लिश भाषा संपादन
Place of detentionTora Prison संपादन
Convicted ofभ्रष्टाचार, killing संपादन
कार्यक्षेत्रराजकारण संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाEgyptian Military College, Military Academy of the General Staff of the Armed Forces of Russia, Supreme Military Institute of the Armed Forces of the Kyrgyz Republic, M.V. Frunze Military Academy संपादन
निवासस्थानकैरो संपादन
राजकीय पक्षाचा सभासदNational Democratic Party, Arab Socialist Union संपादन
Candidacy in election2005 Egyptian presidential election, 1999 Egyptian presidential confirmation referendum संपादन
धर्मसुन्नी इस्लाम संपादन
सैनिकी दर्जाair marshal संपादन
सेना शाखाEgyptian Air Force संपादन
महत्वाची घटनापनामा पेपर्स संपादन
यादी आहेQ88968786 संपादन

मुहम्मद होस्नी सय्यिद मुबारक (अरबी भाषा: محمد حسني سيد مبارك‎ ; रोमन लिपी: Muhammad Hosni Sayyid Mubarak ;) (मे ४, इ.स. १९२८ - फेब्रुवारी २५, इ.स. २०२०) हे इ.स. १९८१ ते इ.स. २०११ या कालखंडात अधिकारारूढ असलेले इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते.

होस्नी मुबारक यांना इ.स. १९७५ साली इजिप्ताचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नेमले गेले. ऑक्टोबर १४, इ.स. १९८१ रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादात याची हत्या झाल्यावर मुबारकने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राजकारणात शिरण्यापूर्वी ते इजिप्ती वायुसेनेचे अधिकारी होते. इ.स. १९७२ ते इ.स. १९७५ या कालखंडात त्यांनी इजिप्ती वायुसेनेचा सेनापती म्हणून पदभार सांभाळला.

८ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी कैरोच्या ताहरीर चौकात जमलेल्या मुबारक राजवटविरोधी निदर्शकांचा जमाव

मुबारकने राष्ट्राध्यक्षपद सोडावे, अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांनी २५ जानेवारी, इ.स. २०११ पासून देशभर निदर्शने आरंभली. जनतेने चालवलेल्या आंदोलनांच्या दबावापुढे झुकत होस्नी मुबारकाने फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी आपण इ.स. २०११ सालातील अध्यक्षपदाच्या निवडणुकांत भाग घेणार नसल्याची घोषणा केली. जनतेचे आंदोलन चालूच राहिल्याने अखेरीस उपराष्ट्राध्यक्ष ओमर सुलैमान याने ११ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी मुबारकने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा केली. १८ दिवसांच्या जनआंदोलनांमुळे होस्नी मुबारकाची ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आली व सैन्याकडे सत्तेची सूत्रे तात्पुरती सोपवण्यात आली.

फेब्रुवारी २५, इ.स. २०२०मध्ये त्यांचे निधन झाले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Egypt's former president Hosni Mubarak dies at 91". www.aljazeera.com. 25 February 2020 रोजी पाहिले.
  2. "Former Egyptian president Hosni Mubarak dies". BBC News (इंग्रजी भाषेत). 25 February 2020. 25 February 2020 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]