हॉर्स शू बेंड
हॉर्स शू बेंड ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील नैसर्गिक खडकरचना आहे. कॉलोराडो नदीने पठारात कोरलेल्या वळणांनी ही रचना झालेली आहे.
नैसर्गिक आकार
[संपादन]अमेरिकेतील ॲरिझोना राज्यात प्रचंड विस्ताराची पठारे आहेत तसेच मोठमोठे पर्वत आहेत. ग्रँड कॅन्यन ही जगातील सगळ्यात मोठी घळ सुद्धा येथे आहे.
ह्या राज्यात कॉलोराडो नदी सारख्या आदिम काळापासून नद्या आहेत. इथे दऱ्या खोऱ्यात लाईमस्टोन,सँडस्टोन, इत्यादी मुळे सुंदर रंगीबेरंगी कडे निर्माण झाले आहेत. इथेच कोलोरॅडो नदीच्या प्रवाहामुळे नैसर्गिकरीत्या घोड्याच्या नालेसारखा आकार निर्माण झाला आहे.त्यालाच घोड्याची नाल म्हणजेच हॉर्स शू आणि वळण म्हणजे बेंड हे नाव पडले आहे. कोलोरॅडो नदीच्या प्रवाहामुळे आजुबाजूला खोल दरी निर्माण होऊन सुमारे २७०°अंशाचा मोरपिशी रंगाचा एक सुंदर निसर्गरम्य देखावा निर्माण झाला आहे.
येथे नदीचे पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ आहे. नदी पन्नास ते साठ लक्ष वर्षे वाहत आहे त्यामुळे असंख्य निसर्ग सौंदर्याचे कोपरे तयार झाले आहेत. कोलोरॅडो नदीत राफ्टिंग करता येते आणि हे सर्व पाहण्यासाठी गाईड ची सोय सुद्धा उपलब्ध आहे.
ह्या परिसरात नवाहो या मूळ अमेरिकन लोकांच्या वस्त्या आहेत तसेच त्यांच्या संस्कृतीचे प्राचीन अवशेषही सापडलेले आहेत.हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.अमेरिकेतील तसेच जगभरातील लोक हे पर्यटन स्थळ पाहायला येतात. [१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार,१० ऑगस्ट २०२५