Jump to content

हॉटेल पेनसिल्व्हेनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॉटेल पेनसिल्व्हेनिया न्यू यॉर्कच्या मध्यवर्ती भागात पेन प्लाझा पॅव्हेलियन आणि मॅडिसन स्क्वेर गार्डन[] पासून कांही अंतरावर एंपायर स्टेट बिल्डिंगच्या जवळ असलेले हॉटेल आहे.

इतिहास

[संपादन]

हे हॉटेल २५ जानेवारी १९१९ रोजी सुरू झाले.[] हे होटेल पेनसिल्व्हेनिया रेलरोडसाठी एल्सवर्थ स्टॅटलर यांनी चालू केले. मक किम ,मीईएड & व्हाइट या समूहाचे विल्यम सिम्स रिचर्डसन यांनी याचा आराखडा तयार केला. पेनसिल्व्हेनिया स्टेशन यांनीही मूलतः हाच आराखडा त्याच रोडच्या विरुद्द बाजूसाठी तयार केला होता.(सन १९६३ मध्ये मॅडीसन स्क्वेयर गार्डन साठी खोल्या तयार करण्यासाठी जुने पेनसिल्व्हेनिया स्टेशन संपूर्ण पाडले आणि आत्ताचे वापरात असणारे स्टेशन त्याखाली सुधारित पद्दतीचे बांधले.)

स्टेटलेर हॉटेलचे बांधकाम झाल्यापासून पेनसिल्व्हेनिया व्यवस्थापन पहात होते, त्यांनी ती मालमत्ता सन १९४८ मध्ये पूर्ण ताब्यात घेतली. आणि त्याचे नाव हॉटेल स्टेटलर केले. सन १९५४ मध्ये यांची सर्व १७ हॉटेल कोनरड हिल्टन ने खरेदी केली. त्यानंतर त्याचे नाव स्टेटलेर हिल्टन झाले. सन १९८४ मध्ये हिल्टन यांनी ते विक्री करेपर्यंत याच नावाने ते चालू राहिले. एर लिंगस विभागाचे दुनफे हॉटेल्स ग्रुप हे हॉटेल बराच काळं चालवीत होते तेव्हा त्यांनी त्याचे नाव न्यू यॉर्क स्टेटलेर असे बदलले. एकत्रित व्यवसाय करत असलेल्या फेंटा हॉटेल चेनचे ब्रिटिश एरवेझ लुफथांसा आणि स्वीस्स एर ने सन १९८४ मध्ये हे खरेदी केले आणि ते न्यू यॉर्क पेंटा म्हणून ओळखले जाऊ लागले. सन १९९२ मध्ये पेंटा व्यवसायातून बाहेर पडले आणि हे हॉटेल पुन्हा त्याचे हॉटेल पेनसिल्व्हेनिया या मूल नावात आले.

खोल्या व इतर सुविधा

[संपादन]

या हॉटेल मध्ये सुपीरियर डबल रुम, एक किंग बेडसह सुपीरियर रूम, सुपीरियर किंग रूम, बेडरूम सूट, उपलब्ध आहेत.या खोल्यात टेलिफोन, इस्त्री व्यवस्था आहे. या शिवाय सुपीरियर २ डबल्स ही २ डबल बेडची ३०० चौरस फूटची अतिथि रूम आहे. यात मुव्हीज व्यवस्था असणारे टीव्ही, व्हिडिओ गेम्स, हेयर ड्रायर,क्लॉक रेडियो,इस्त्री, इस्त्री बोर्ड ही व्यवस्था आहे.

पेन्न ५००० – १ डबल बेड या अतिथि रूम मध्ये एक डबल बेड पिल्लो टॉप माट्रेस्स, बेडचे बाजूला एम पी ३ क्लॉक रेडियो, इर्गोनोमिक दोन खुर्च्यासह कामकाजासाठी टेबल आणि उच्च शक्तीची अतिवेगवान इंटरनेट केबल, फ्लॅट टीव्ही आणि विडिओ गेम्स, रेफ्रीजिरेटर, पेन्न क्लब, इच्छेप्रमाणे अल्पोपआहार, २४ तास कॉफी आणि चहा, उच्च प्रतीच्या इंटरनेट सह संगणक, या सुविधा[] आहेत.

पेन्न ५००० क्लब – १ किंग या अतिथिग्रहात[] पेन्न ५००० – १ डबल बेड बेड यात असणाऱ्या सर्व सुवीधा आहेतच त्याशिवाय क्लब मध्ये आरामात मौज मजा करणेचीही सुविधा आहे. या हॉटेल मध्ये १७०५ वातानुकूलित अतिथि रूम्स आहेत. आपल्या मनोरंजनासाठी प्रीमिअम टीव्ही चांनेल्स, विडिओ-गेम येथे पुरविलेले आहेत.इंटरनेट सेवाही आपल्या कामकाजासंबंधाने उपलब्ध आहे. सोयीसाठी इस्त्री, इस्त्री बोर्ड, सरकते पडदे, आणि हाऊसकीपिंग व्यवस्थाही पुरविली आहे.

फिटनेस केंद्र, गिफ्ट दुकाने, वर्तमानपत्र, यथेच खरेदी व्यवस्था,आणि व्हरांड्यातील टेलिव्हीजन व्यवस्था व इतर सुवीधान्चा वापर करून आनंद लुटा. या हॉटेल मधील २ उपहारग्रह आणि २ कॉफीशॉप मध्ये प्रत्येक दिवशी सर्व भूखंडातील अल्पोपआहार उपलब्ध आहे. २४ तास व्यवसाय केंद्र,संगणक स्थानक, अतिजलद प्रवेश या सुविधांचा ही अंतर्भाव आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "मॅडिसन स्क्वेर गार्डन".
  2. ^ "जगातील सर्वात मोठी हॉटेल आज सुरू होणार". २१ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
  3. ^ "होटल पेनसिल्व्हेनिया,न्यू यॉर्कची सुविधा".
  4. ^ "हॉटेल सेवा व सुविधा". 2015-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-10-21 रोजी पाहिले.