Jump to content

हेझल कीच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेझल कीच
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
दिलेले नावHazel संपादन
आडनावKeech संपादन
जन्म तारीख२८ फेब्रुवारी 1987 संपादन
जन्मस्थानएसेक्स संपादन
वैवाहिक जोडीदारयुवराजसिंग संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाBeal High School संपादन
निवासस्थानमुंबई संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2007 संपादन
धर्महिंदू धर्म संपादन

हेझल कीच (२८ फेब्रुवारी १९८७:एसेक्स, इंग्लंड - ), उर्फ रोझ डॉन ही एक ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. कीच ने भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मालिकात काम केले. कीच ने २०१७ साली भारतीय क्रिकेट खेळाडू युवराजसिंह सोबत लग्न केले. लग्नानंतर तिचे नाव गुरबसंत कौर असे ठेवण्यात आले.[][][] तिने बिल्ला आणि बॉडीगार्ड या चित्रपटात काम केले. तसेच ती सुझुकीच्या जाहिरातीत देखील दिसली.[] तिने फ्रँकफिन म्युझिक रीमिक्स आयटम नंबर "कहीं पे निगाहें" मध्ये नृत्य केले.[] २०१३ मध्ये तीने वास्तव प्रदर्शनी बिग बॉस ७ मध्ये सहभाग घेतला होता.

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

कीचचा जन्म २८ फेब्रुवारी १९८७ रोजी इंग्लंडमधील एसेक्स येथे झाला.[][] तिचे वडील ब्रिटिश वंशाचे आणि आई इंडो-मॉरिशियन हिंदू होती.[][][१०][११][१२][१३] तिने तिचे शालेय शिक्षण लंडनमधील रेडब्रिज येथील बील हायस्कूलमध्ये पूर्ण केले.[१४] येथे तिने स्टेज शोमध्ये सादरीकरण केले आणि भारतीय शास्त्रीय नृत्य, इंग्रजी नृत्य आणि पाश्चात्य समकालीन नृत्यासह विविध प्रकारचे नृत्य शिकले.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

१२ नोव्हेंबर २०१५ रोजी, कीचने भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंह सोबत सोयरिक केली.[१५][१६][१७] त्यांचे लग्न ३० नोव्हेंबर २०१६ रोजी झाले.[१८][१९] लग्नानंतर, हेझलने "गुरबसंत कौर" हे नाव धारण केले, जे तिला संत बलविंदर सिंग यांनी लग्न समारंभात दिले होते.[] २५ जानेवारी २०२२ रोजी या जोडप्याला त्यांचे पहिले मूल, ओरियन नावाचा मुलगा झाला.[२०] त्यांचे दुसरे मूल, ऑरा नावाची मुलगी १७ जुलै २०२३ रोजी जन्माला आली.[२१][२२]

कीचने एका मुलाखतीत कबूल केले की ती कधीकाळी तीव्र नैराश्यात होती आणि आत्महत्या करणार होती. परंतु लवरकच यातून ती बाहेर पडली आणि म्हणूनच तिने अशा लोकांना मदत करण्यासाठी मानसोपचारशास्त्रात डिप्लोमा घेतला.

चित्रपट सूची

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका भाषा
२००२ हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स अतिरिक्त कलाकार [२३] इंग्रजी
२००४ हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबान
२००५ हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
२००७ बिल्ला रिया तमिळ
२००९ किक आयटम गीत तेलगू
२०११ बॉडीगार्ड माया कपूर हिंदी
२०१२ मॅक्सिमम] आयटम गीत
कृष्णम् वंदे जगद्गुरुम् तेलुगू
२०१३ हीर अँड हिरो] पंजाबी
२०१५ धरम संकट में हिंदी
बांके की क्रेझी बारात

मालिका

[संपादन]
वर्ष नाव भूमिका नोंदी संदर्भ
२०१२ कॉमेडी सर्कस स्पर्धक कृष्णा अभिषेक सोबत
२०१३ झलक दिखला जा ६ तीन का तडका सहभाग
बिग बॉस ७]] ७ दिवसांनी निष्कासित

संदर्भ

[संपादन]
  1. PTI (16 September 2011). "Salman would never groan in pain: Hazel Keech". NDTV. 2 March 2022 रोजी पाहिले.
  2. Sonal Chawla (3 March 2011). "Sallu's new girl Hazel Keech follows Kat". द टाइम्स ऑफ इंडिया. 25 September 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 December 2013 रोजी पाहिले.
  3. 1 2 ABP News Web Desk (2 December 2016). "POST MARRIAGE Hazel Keech changes her NAME completely". ABP Live. 2 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 March 2018 रोजी पाहिले.
  4. "Christine Zedek — Tamil Actress Gallery stills images clips". IndiaGlitz. 2 May 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2012 रोजी पाहिले.
  5. "Meet the new item number in town". Rediff.com. 31 December 2004. 20 July 2012 रोजी पाहिले.
  6. "Yuvraj Singh braves a freezing day for Hazel Keech: Only because it is your birthday". India Today (इंग्रजी भाषेत). 28 February 2020. 13 December 2020 रोजी पाहिले.
  7. "Happy Birthday Hazel Keech: Her 6 Best Moments on Social Media". News18 (इंग्रजी भाषेत). 28 February 2020. 13 December 2020 रोजी पाहिले.
  8. Gulshankumar Wankar (1 September 2016). "Yuvraj Singh blasts Western Union for denying money to fiancée Hazel Keech". Hindustan Times. 25 April 2019 रोजी पाहिले.
  9. राकेश तिवारी (31 August 2016). "युवराज सिंह की मंगेतर हेजल कीच ने एक कंपनी पर लगाया 'नस्ली भेदभाव' का आरोप, युवी भी भड़के..." (हिंदी भाषेत). NDTV. 19 July 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 April 2019 रोजी पाहिले.
  10. "Interesting facts about Yuvraj Singh's rumoured new flame, Hazel Keech". India TV. 7 September 2015. 12 August 2016 रोजी पाहिले.
  11. Renuka Vyavahare (14 November 2015). "Yuvraj Singh's mother: Hazel Keech is a reflection of me". द टाइम्स ऑफ इंडिया. TNN. 25 April 2019 रोजी पाहिले.
  12. Mumbai Mirror; Sonal Chawla (3 March 2011). "Sallu's new girl Hazel Keech follows Kat". द टाइम्स ऑफ इंडिया. 25 September 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 April 2019 रोजी पाहिले.
  13. "Hazel Keech talks about her favourite past times One of my favourite past times is travelling. I love visiting new places and revisiting others". Mid-Day. 30 August 2012. 2013-12-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 December 2013 रोजी पाहिले.
  14. Rob Parsons (9 September 2011). "West End chorus girl strikes Bollywood gold". Evening Standard. 21 April 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2012 रोजी पाहिले.
  15. TNN (14 November 2015). "Yuvraj Singh Gets Engaged To Model-Actress Hazel Keech". द टाइम्स ऑफ इंडिया. 31 March 2018 रोजी पाहिले.
  16. Sumiran Kashyap Sahni (6 April 2016). "Relationship, honeymoon and wedding details: Yuvraj Singh and Hazel Keech in a tell-all interview". India Today. 24 November 2018 रोजी पाहिले.
  17. "Yuvraj Singh-Hazel Keech marriage details: Couple gearing up for their big day". telugu.gulte.com. 7 November 2016. 2 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 March 2018 रोजी पाहिले.
  18. "Yuvraj Singh and Hazel Keech exchange wedding vows". The Hindu. Press Trust of India. 30 November 2016. 1 December 2016 रोजी पाहिले.
  19. "Yuvraj Singh, Hazel Keech tie the knot: Couple get married in intimate affair". The Indian Express. 30 November 2016. 2 December 2016 रोजी पाहिले.
  20. "Yuvraj Singh, wife Hazel Keech blessed with baby boy". The Indian Express. 26 January 2022. 3 March 2022 रोजी पाहिले.
  21. "Yuvraj Singh & Hazel Keech welcome second child, name baby girl Aura". The Economic Times. 26 August 2023. 16 October 2023 रोजी पाहिले.
  22. "Hazel Keech And Yuvraj Singh Share Pics From Daughter Aura's 1st Birthday". NDTV. 17 July 2024. 9 March 2025 रोजी पाहिले.
  23. "Did you know Hazel Keech acted in three Harry Potter films?". India Today. 26 September 2018. 21 March 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]