हेकानी जाखलू केन्से
Indian lawyer and social entrepreneur | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| नागरिकत्व | |||||
|---|---|---|---|---|---|
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| पुरस्कार | |||||
| |||||
हेकानी जाखलू केन्से (जन्म:१९७६)[१] या नागालँडमधील एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक उद्योजिका आहेत. नागालँडमधील तरुणांना व्यवसायाच्या संधी शोधण्यास मदत करण्यासाठी जाखलू यांनी युथनेट ही गैर-सरकारी संस्था स्थापन केली. २०१८ मध्ये त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२०२३ मध्ये, जाखलू आणि सल्हौतुओनुओ क्रुसे या नागालँड विधानसभेत निवडून येणाऱ्या नागालँडमधील पहिल्या महिला बनल्या. जाखलू या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) च्या सदस्या आहेत.[२]
प्रारंभिक जीवन
[संपादन]हेकानी जाखलू यांचा जन्म नागालँड मधील दिमापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण बंगळूर येथील बिशप कॉटन गर्ल्स स्कूलमध्ये झाले आणि दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली.[३] त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतली.[३]
कारकिर्द
[संपादन]अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर, जाखलू दिल्लीला परत आल्या. दिल्लीत त्यांनी वकील म्हणून कारकिर्द सुरू केली. नागालँडमधील तरुण मोठ्या प्रमाणात दिल्लीत स्थलांतरित होताना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, जाखलू यांनी २००६ मध्ये कोहिमा येथे जाऊन युथनेट नावाची एक गैर-सरकारी संस्था (एनजीओ) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या संस्थेचा उद्देश नागालँडमधील तरुणांसाठी अधिक संधी निर्माण करणे आहे.[१] २०१८ पर्यंत, युथनेटमध्ये ३० कर्मचारी कार्यरत होते आणि त्यांनी २३,५०० लोकांना मदत केल्याची नोंद आहे.[१] ही संस्था उद्योजकांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास मदत करते. याशिवाय कोहिमामध्ये "मेड इन नागालँड" केंद्र स्थापन करून त्यांच्या वस्तूंची विक्री करण्याचे काम देखील करते.[४][५] दोन वर्षांनी, "मेड इन नागालँड" केंद्राने २०२० मध्ये एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उघडला.[५]

जाखलू यांच्या कार्याची दखल घेऊन, त्यांना २०१८ मध्ये नारी शक्ती पुरस्कार मिळाला. हा भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्या वर्षी सन्मानित होणारी ती ईशान्य भारतातील एकमेव व्यक्ती होती.[६]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 Ghose, Dipankar (12 February 2018). "Ahead of polls, what youth in Nagaland say they really want: jobs". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 16 February 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 November 2020 रोजी पाहिले.
- ↑ Dhar, Aniruddha (2 March 2023). "Nagaland scripts history in assembly election, elects 2 women candidates for first time". हिंदुस्तान टाइम्स. 2 March 2023 रोजी पाहिले.
- 1 2 Barua, Ananya (18 March 2019). "This woman quit her dream job to help 30K youth in Nagaland get jobs". The Better India. 22 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 November 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Entrepreneurship conclave held in Nagaland to boost local start-ups". ANI News (इंग्रजी भाषेत). 13 February 2020. 15 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 November 2020 रोजी पाहिले.
- 1 2 "'Made in Nagaland' Center completes 2 years, launches e-commerce site". Morung Express. 29 June 2020. 6 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 November 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Naga social entrepreneur Hekani Jakhalu gets Nari Shakti Puraskar". East Mojo (इंग्रजी भाषेत). 8 March 2019. 20 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 November 2020 रोजी पाहिले.