हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग
| हृदयवाहिन्यासंबंधी आजार | |
|---|---|
|
| |
| सूक्ष्मदर्शकीय प्रतिमा: हृदय ज्यामध्ये fibrosis (पिवळे) आणि अमायलॉइडोसिस (तपकिरी) दिसते. Movat's stain. | |
| लक्षणे | छातीत वेदना, श्वास लागणे, थकवा, शुद्ध हरपणे |
| गुंतागुंत | हृदय अपयश, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अॅन्युरिझम, पेरिफेरल आर्टरी रोग, अचानक हृदयविकाराने मृत्यू.[१] |
| सामान्य प्रारंभ | वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक सामान्य |
| प्रकार | कोरोनरी आर्टरी रोग, स्ट्रोक, हृदय अपयश, उच्च रक्तदाबजन्य हृदय रोग, र्ह्युमॅटिक हृदय रोग, cardiomyopathy, हृदयाची अनियमित धडधड |
| जोखिम घटक | मधुमेह,रक्तातील चरबीचे उच्च प्रमाण, जादा वजन, धूम्रपान, औषधांचा अतिवापर, मद्यपानाचा अतिरेक, आनुवंशिक प्रवृत्ती |
| प्रतिबंध | समतोल आहार, व्यायाम, तंबाखू टाळणे, मर्यादित मद्यपान, एकूण जीवनशैलीत बदल |
| उपचार | उच्च रक्तदाब, रक्तातील चरबी, मधुमेह यांचे नियंत्रण |
| औषधोपचार | ऍस्पिरिन, बीटा ब्लॉकर्स , रक्त पातळ करणारी औषधे |
| मृत्यू | 17.9 million / 32% (2015) |
हृदयरोग (Cardiovascular Disease) , हृदय आणि रक्तवाहिन्या (धमनी, शिरा व केशवाहिन्या) संबंधित रोगांचा अभ्यास करतो.[२] प्रामुख्याने हृदय-संवहन तंत्र, मेंदू, मूत्रपिंड व परिधीय धमन्या (PAD) संबंधित रोगांना हृदयरोग म्हणतात.[३] हृदयरोगाची अनेक कारणे असू शकतात, परंतु उच्च रक्तदाब व एथेरोस्क्लेरोसिस ही प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर, वयाबरोबर हृदयाच्या संरचनात्मक व शरीरक्रियात्मक बदलांमुळेही हृदयरोग उद्भवतो, जे निरोगी व्यक्तींनाही होऊ शकते.[४] १९७० नंतर विकसित देशांमध्ये मृत्युदर कमी झाला असला तरी हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार हे जगभरात आणि आफ्रिका वगळता इतर सर्व प्रदेशांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहेत[५][६] त्याचवेळी, मध्यम व अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण व त्यामुळे होणारे मृत्यू वेगाने वाढत आहेत.[७] जरी हृदयरोग प्रौढांना होतो, तरी हृदयरोगाची पूर्वावस्था एथेरोस्क्लेरोसिस खूप आधीपासूनच सुरू होते.[८] म्हणूनच पौष्टिक आहार, शारीरिक श्रम, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे यांद्वारे हृदयरोग प्रतिबंधावर भर दिला जातो.
प्रकार
[संपादन]हृदयरोगाचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ:
- कोरोनरी हृदयरोग
- कार्डिओ-मायोपॅथी
- उच्च रक्तदाबजन्य हृदयरोग
- हार्ट फेल्युअर
- कोर पल्मोनाल (Cor Pulmonale) – हृदयाची उजवी बाजू निकामी होणे, श्वसनास अडथळा
- कार्डियाक डिसरिदमिया (Cardiac Dysrhythmia)
- व्हाल्व्युलर हृदयरोग,
- सेरेब्रोव्हास्कुलर रोग – मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे रोग, जसेपक्षाघात
- परिधीय धमनींचे रोग (Peripheral Arterial Diseases)-हृदय किंवा मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांव्यतिरिक्त, इतर धमन्यांचे असामान्यरीत्या अरुंद होणे.
- जन्मजात हृदयरोग (congenital heart disease)-
ऱ्ह्युमॅटिक हृदयरोग – संधिवाताच्या तापामुळे हृदयाचे स्नायू व झडपा क्षतिग्रस्त होणे
जोखमीचे घटक
[संपादन]हृदयरोगास अनेक गोष्टी जबाबदार असतात: वय, लिंग, उच्च रक्तदाब, अतिरिक्त रक्तमेद (हायपरलिपिडेमिया ) मधुमेह , धूम्रपान, अतिरिक्त मद्यपान, कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल आणि वायू प्रदूषण. वेगवेगळ्या प्रदेशांसाठी वेगवेगळी कारणे जबाबदार असली तरी एकत्रितपणे ही सर्व हृदयरोगाची कारणे आहेत. मात्र जीवनशैलीत बदल, सामाजिक सुधारणा, औषधोपचार आणि उच्च रक्तदाब, अतिरिक्त रक्तमेद, व मधुमेह प्रतिबंधाद्वारे हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
वय
[संपादन]
हृदयरोगामागे वय हा सर्वात महत्त्वाचा जोखमीचा घटक आहे.[७] असे दिसून आले आहे की ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींपैकी ८२ टक्के हृदयरोगाने मृत्युमुखी पडले आहेत.[९] त्याचवेळी, ५५ वर्षांनंतर पक्षाघात होण्याची शक्यता दुप्पट होते.[१०] वयाबरोबर हृदयरोग का वाढतो, याचे अनेक स्पष्टीकरण प्रस्तावित केले गेले आहेत. त्यापैकी एक सीरम पित्तस्थिरोलशी संबंधित आहे.[११] बहुतांश लोकसंख्येत वयाबरोबर सीरम कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. पुरुषांमध्ये ४५ ते ५० वर्षांपर्यंत आणि स्त्रियांमध्ये ६० ते ६५ वर्षांपूर्वी नाही.[११] वय रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये संरचनात्मक बदल घडवते, त्यामुळे धमन्यांची लवचिकता नष्ट होते, परिणामी कोरोनरी धमनीचा रोग होतो.[१२]
लिंग
[संपादन]प्रजनन-सक्षम स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो.[७][१३] प्रजनन-काल संपल्यानंतर, स्त्रियांना हृदयरोग होण्याची शक्यता पुरुषांइतकीच असते.[१३][७] जर एखाद्या स्त्रीला मधुमेह असेल, तर तिला मधुमेह असलेल्या पुरुषापेक्षा जास्त हृदयरोग होण्याचा धोका असतो.[१४] मध्यमवयीन लोकांमध्ये कोरोनरी हृदयरोग स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना २ ते ५ पट जास्त आढळतो.[११] जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, हृदयरोगाने होणाऱ्या मृत्युदरात लिंगभेद सुमारे ४०% फरक निर्माण करू शकतो.[१५] दुसऱ्या एका सर्वेक्षणानेही सांगितले आहे की लिंगभेद हृदयरोगाच्या जोखमीच्या सुमारे निम्म्याशी संबंधित आहे.[११] एका स्पष्टीकरणानुसार, हृदयरोगातील लिंगभेदाचे कारण हार्मोन्समधील फरक आहे.[११] स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हा प्रमुख लैंगिक हार्मोन आहे. ग्लुकोज चयापचयद्वारे इस्ट्रोजेन संरक्षणात्मक प्रभाव टाकतो.[११] प्रजनन-काल संपल्यानंतर इस्ट्रोजेनचे उत्पादन कमी होते आणि HDL कमी होते व LDL, कोलेस्टेरॉल वाढते.[११][१२]
वायू प्रदूषण
[संपादन]पॅथोफिजिओलॉजी
[संपादन]लोकसंख्याआधारित संशोधनानुसार, हृदयरोगाची पूर्वावस्था असलेला एथेरोस्क्लेरोसिस बालपणापासूनच सुरू होतो.[१६] हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की एथेरोस्क्लेरोसिसमुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत प्रत्येक तीनपैकी एक व्यक्ती मृत्युमुखी पडते. याला प्रतिबंध करण्यासाठी सामान्य जनतेमध्ये शिक्षण व जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह मेलिटस हे हृदयरोगाशी संबंधित आहेत.[१७] हे दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराचीही पूर्वचिन्हे आहेत.[१८] वास्तविक, मधुमेहाशी संबंधित हृदयरोग हे सर्वाधिक मृत्यूचे कारण आहे.[१९][२०][२१]
लक्षणे
[संपादन]हृदयरोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता. मात्र हे नेहमीच एकमेव लक्षण नसते. इतर लक्षणांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास, पोटाच्या वरच्या भागात असह्य वेदना, डोके हलके वाटणे, शरीराच्या वरच्या भागात – जसे पाठ, पोट, घसा, डाव्या दंडात वेदना, मान किंवा जबड्यात दुखणे किंवा अस्वस्थता यांचा समावेश होतो.[२२]
रोगशास्त्र
[संपादन]
हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. २००८ साली ३०% जागतिक मृत्यूसाठी हृदयरोग जबाबदार होता. अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील ८०% जागतिक मृत्यूसाठी हृदयरोग जबाबदार आहे. एका अंदाजानुसार, २०३० पर्यंत दरवर्षी हृदयरोगामुळे २३ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतील. WHO च्या ग्लोबल रिपोर्ट ऑन हायपरटेन्शन २०२३ नुसार, बांगलादेशात दरवर्षी २ लाख ७३ हजार लोक हृदयरोगाने मृत्युमुखी पडतात.[२४]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Heart disease". Mayo Clinic. 2022-08-25.
- ↑ Maton, Anthea (1993). Human Biology and Health. Englewood Cliffs, New Jersey: Prentice Hall. ISBN 0-13-981176-1.
- ↑ Bridget B. Kelly; Institute of Medicine; Fuster, Valentin (2010). Washington, D.C. ISBN 0-309-14774-3 https://archive.org/details/promotingcardiov0000nati. Unknown parameter
|Publisher=ignored (|publisher=suggested) (सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ Dantas AP, Jimenez-Altayo F, Vila E. (325): 1–2. doi:10.3389/fphys.2012.00325. PMID 22934073. Unknown parameter
|नियतकालिक=ignored (सहाय्य); Unknown parameter|तारीख=ignored (सहाय्य); Cite journal requires|journal=(सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ साचा:पुस्तक संदर्भ
- ↑ Mendis, S.; Puska, P.; Norrving, B.(editors) (2011), Global Atlas on cardiovascular disease prevention and control, ISBN 978-92-4-156437-3CS1 maint: extra text: authors list (link)
- 1 2 3 4 Finegold. (2): 934–945. doi:10.1016/j.ijcard.2012.10.046. PMID 23218570. Unknown parameter
|तारीख=ignored (सहाय्य); Unknown parameter|नाव=ignored (सहाय्य); Unknown parameter|नियतकालिक=ignored (सहाय्य); Cite journal requires|journal=(सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ McGill HC, McMahan CA, Gidding SS. (9): 1216–27. doi:10.1161/CIRCULATIONAHA.107.717033. PMID 18316498 https://archive.org/details/sim_circulation_2008-03-04_117_9/page/1216. Unknown parameter
|तारीख=ignored (सहाय्य); Unknown parameter|Journal=ignored (|journal=suggested) (सहाय्य); Cite journal requires|journal=(सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ "Understand Your Risk of Heart Attack". American Heart Association. http://www.heart.org/HEARTORG/Conditions/HeartAttack/UnderstandYourRiskofHeartAttack/Understand-Your-Risk-of-Heart-Attack_UCM_002040_Article.jsp#
- ↑ Mackay, Mensah, Mendis, et al. The Atlas of Heart Disease and Stroke. World Health Organization. January 2004.
- 1 2 3 4 5 6 7 Jousilahti Vartiainen, Tuomilehto Puska (1999). : 1165–1172. doi:10.1161/01.cir.99.9.1165 https://archive.org/details/sim_circulation_1999-03-09_99_9/page/1164. Unknown parameter
|नियतकालिक=ignored (सहाय्य); Cite journal requires|journal=(सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - 1 2 Jani B, Rajkumar C. : 357–362. doi:10.1136/pgmj.2005.036053 https://archive.org/details/sim_postgraduate-medical-journal_2006-06_82_968/page/357. Unknown parameter
|नियतकालिक=ignored (सहाय्य); Cite journal requires|journal=(सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - 1 2 http://www.world-heart-federation.org/cardiovascular-health/cardiovascular-disease-risk-factors. Unknown parameter
|संग्रहण-दिनांक=ignored (सहाय्य); Unknown parameter|संग्रहण-URL=ignored (सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ NPR.org http://www.npr.org/blogs/health/2014/05/22/314869923/diabetes-raises-womens-risk-of-heart-disease-more-than-for-men. Unknown parameter
|तारीख=ignored (सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ Jackson R, Chambles L, Higgins M, Kuulasmaa K, Wijnberg L, Williams D (WHO MONICA Project, and ARIC Study.) Sex difference in ischaemic heart disease mortality and risk factors in 46 communities: an ecologic analysis. Cardiovasc Risk Factors. 1999; 7:43-54.
- ↑ Vanhecke TE, Miller WM, Franklin BA, Weber JE, McCullough PA. (5): 718–23. doi:10.1097/01.hjr.0000214611.91490.5e. PMID 17001210. Unknown parameter
|नियतकालिक=ignored (सहाय्य); Unknown parameter|तारीख=ignored (सहाय्य); Cite journal requires|journal=(सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ Highlander P, Shaw GP. : 43–54. doi:10.1177/1753944709354305. Unknown parameter
|नियतकालिक=ignored (सहाय्य); Cite journal requires|journal=(सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ NPS Medicinewise. http://www.nps.org.au/health_professionals/publications/prescribing_practice_review/current/prescribing_practice_review_53. Unknown parameter
|संग्रहण-URL=ignored (सहाय्य); Unknown parameter|संग्रहण-दिनांक=ignored (सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ Kvan E., Pettersen K.I., Sandvik L., Reikvam A. : 184–188. doi:10.1016/j.ijcard.2006.11.003. Unknown parameter
|नियतकालिक=ignored (सहाय्य); Cite journal requires|journal=(सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ साचा:नियतकालिक संदर्भ
- ↑ DECODE, European Diabetes Epidemiology Group. : 617–621. doi:10.1016/S0140-6736(98)12131-1. PMID 10466661 https://archive.org/details/sim_the-lancet_1999-08-14_354_9178/page/n101. Unknown parameter
|नियतकालिक=ignored (सहाय्य); Cite journal requires|journal=(सहाय्य); Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ arthosuchak. ArthoSuchak http://www.arthosuchak.com/archives/19774/लक्षण-जानुन-हृदयरोग-थेके-बाचुन/. Missing or empty
|title=(सहाय्य) - ↑ "WHO Disease and injury country estimates". World Health Organization.
- ↑ देशात दरवर्षी हृदयरोगाने मृत्यू पावतात २ लाख ७३ हजार लोक, जागो न्यूज टुएंटी फोर डॉटकॉम, २९ सप्टेंबर २०२४