Jump to content

हुआन रॉद्रिगेझ काब्रियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुआन रॉद्रिगेझ काब्रियो
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वCorona de Castilla संपादन
जन्म-नावJuan Rodríguez Cabrillo संपादन
दिलेले नावJuan संपादन
आडनावCabrillo संपादन
Patronym or matronymRodríguez संपादन
जन्म तारीख1497 संपादन
मृत्यू तारीख३ जानेवारी 1543 संपादन
मृत्यूस्थानSanta Catalina Island संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषास्पॅनिश भाषा संपादन
व्यवसायexplorer, navigator, discoverer, conquistador संपादन
पदsea captain संपादन

हुआन रॉद्रिगेझ काब्रियो (अंदाजे १५०० - ३ जानेवारी, १५४३) हा स्पॅनिश साम्राज्याच्या सेवेतील एक धाडसी नाविक आणि शोधक होता. हा युनायटेड स्टेट्सच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचणारा पहिला युरोपीय होता.[] रॉद्रिगेझ काब्रियोच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तो काँकिस्तादोर एर्नान कोर्तेझच्या सैन्यात धनुर्धारी सैनिकांचा सरदार म्हणून सामील झाला होता आणि त्याने अस्तेक साम्राज्याविरुद्धच्या युद्धात भाग घेतला होता. त्यानंतर मध्य अमेरिकेतील अनेक मोहिमांमध्ये त्याने भाग घेतला. यांदरम्यान सध्याच्या ग्वातेमालामधील जमीन आणि सोन्याच्या खाणी बळकावल्या आणि आपली संपत्ती वाढवली.[]

स्पॅनिश अधिकाऱ्यांनी काब्रियोला पॅसिफिक महासागराच्या उत्तरेकडील भागांचा शोध घेण्याची आणि अटलांटिक महासागराला जोडणारा सागरी मार्ग शोधण्याची जबाबदारी सोपवली. २७ जून १५४२ रोजी त्याने तीन जहाजांसह मेक्सिकोच्या नाव्हिदाद बंदरातून प्रवासाला सुरुवात केली.[] या सफरीदरम्यान २८ सप्टेंबर १५४२ रोजी ते सध्याच्या सान डिएगोजवळील उपसागरात पोहोचला. या प्रदेशाला नंतर अल्ता कॅलिफोर्निया असे नाव देण्यात आले. पुढे जात त्याने कॅलिफोर्नियाच्या इतर भागांचा आणि अनेक बेटांचा नकाशा तयार केला. या मोहिमेवरून परतत असताना चॅनेल बेटांवर स्थानिक लोकांशी झालेल्या संघर्षानंतर एका अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीच्या संसर्गामुळे ३ जानेवारी १५४३ रोजी त्यांचे जहाजावरच निधन झाले.[] सान डिएगो येथे काब्रियो राष्ट्रीय स्मारक हे त्याचे स्मारक आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Juan Rodriguez Cabrillo". Encyclopædia Britannica. 2026-06-27 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Juan Rodriguez Cabrillo - Cabrillo National Monument". U.S. National Park Service. 2026-06-27 रोजी पाहिले.