Jump to content

हिस्लॉप कॉलेज (नागपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिस्लॉप कॉलेज या पानावरून पुनर्निर्देशित)

हिस्लॉप कॉलेज हे नागपूरमधील एक जुने कॉलेज आहे.

इतिहास

[संपादन]

ब्रिटिश काळात मध्य प्रांताची राजधानी असूनही नागपूरमध्ये इ.स. १८८२ पर्यंत महाविद्यालय नव्हते. इ.स. १८८३ या वर्षी महाल परिसरात हिस्लॉपची स्थापना झाली. १९०४ पर्यंत हे महाविद्यालय त्यावेळच्या कलकत्ता विद्यापीठाशी आणि नंतर अलाहाबाद विद्यापीठाशी संलग्न होते. नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ते त्याच्याशी जोडण्यात आले. १९४१ मध्ये चर्च ऑफ स्कॉटलंडकडून या महाविद्यालयाचे अधिकार भारताकडे आले.

कॉलेजचे नाव

[संपादन]

भूगर्भशास्त्रज्ञ आण‌ि शिक्षणतज्ज्ञ असलेल्या ‌स्टीफन हिस्लॉप यांनी सुमारे १८ वर्षे विदर्भात काम केले होते. या मिशनऱ्याचे नाव या महाविद्यालयाला देण्यात आले आहे.

कॉलेजचे प्रतिभाशाली माजी प्राध्यापक

[संपादन]

कॉलेजचे प्रतिभावान माजी विद्यार्थी

[संपादन]

नागपूर शहराच्या आणि देशाच्या विविध क्षेत्रावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक व्यक्तींनी येथे शिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, प्रख्यात समाजसेवक बाबा आमटे, लेखक पु.भा. भावे, चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी, नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, अनिस अहमद, मुकुल वासनिक, कृष्णराव गुलाबराव देशमुख यांसारख्या अनेक मान्यवरांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण हिस्लॉपमध्ये पूर्ण केले आहे.

विदर्भातील पहिला पत्रकारिता अभ्यासक्रम

[संपादन]

ज्या काळात पत्रकारितेत येण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम करावा लागतो याची जाणीवही नव्हती आणि गरजही कुणाला वाटत नव्हती, त्या काळात हिस्लॉपने पत्रकारिता अभ्यासक्रमाचा पाया रचला. प्राचार्य डॉ. डी.जी. मोझेेस व प्रा. इपान यांच्या नेतृत्वात १९५२ मध्ये विदर्भातील सर्वांत पहिला पत्रकारितेचा अभ्यासक्रम येथे सुरू करण्यात आला. प्रमाणपत्र, पदवी व पदविका अशा स्वरूपातील हा अभ्यासक्रम १९६६ मध्ये बंद पडला व नंतर नागपूर विद्यापीठात सुरू करण्यात आला.

महाविद्यालयाला मिळालेला वारसा दर्जा

[संपादन]

२०१३ मध्ये केंद्र सरकारने महाविद्यालयांना वारसा दर्जा देण्याची योजना सुरू केली होती. त्या आधारे हिस्लॉप म‌हाविद्यालयाला राष्ट्रीय वारसा दर्जा प्राप्त झाला. हेरिटेज महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्याने संस्थेचा दर्जा उंचावण्याकरिता आता विद्यापीठ अनुदान मंडळाकडून आर्थिक साहाय्यही मिळू शकते. म‌हाविद्यालयाच्या इमारतींमध्ये सुधारणा करणे किंवा शैक्षणिक प्रकल्प राबविणे या करिता हा निधी वापरता येईल.