Jump to content

हिरण्यगर्भ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऋग्वेदसूक्ते ही मुख्यत्वे विविध देवतांची स्तुती करतात. परंतु ऋग्वेदातील काही सूक्तांमधून तत्त्वज्ञानादी अन्य गोष्टींचीही चर्चा केली आहे. उदा० सृष्टीची उत्पत्ती कशी झाली असावी' ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचाही यांत प्रयत्न केलेला आहे. ऋग्वेदातील हिरण्यगर्भ सूक्त (१०.१२१), नासदीय सूक्त (१०.१२९), पुरुषसूक्त(१०.९०) अशा सूक्तांतून या प्रश्नाची विविध उत्तरे दिलेली दिसतात. या संकल्पना विज्ञाननिष्ठ आहेत तसेच तत्कालीन (?) अन्य संस्कृतींतील कल्पनांशी त्यांचे विलक्षण साम्य दिसून येते .हिरण्यगर्भ सूक्तामध्ये देवांचा अधिपती 'प्रजापति' याची उत्पत्ती हिरण्यगर्भापासून झाली असे म्हणले आहे.