हिमावत
Father of Parvati in Hinduism | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| |||||
हिमावत हा हिंदू धर्मातील हिमालय पर्वतांचे अवतार/मानवीकरण आहे. तो हिमालयाचा संरक्षक देव आहे आणि महाभारत आणि इतर हिंदू धर्मग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो.[१]
विविध हिंदू धर्मग्रंथांमध्ये हिमालयाच्या व्यक्तिरेखेचा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आहे, आणि म्हणूनच हिमावतला हिमवंत, हिमवान, हिमराज, आणि पर्वतेश्वर असेही म्हणतात.
आख्यायिका
[संपादन]गंगा देवी, रागिणी [२] आणि शिवाची दुसरी पत्नी पार्वती हे हिमावतच्या मुली आहे. त्याची पत्नी ही वैदिक देवी मैनावती आहे, जी रामायणानुसार मेरु पर्वताची कन्या आहे. किंवा विष्णु पुराण सारख्या इतर काही स्त्रोतांनुसार, मैनावती ही पितृ वर्गातील सदस्य असलेल्या स्वधा आणि तिचा पती कवी यांची कन्या आहे. शिवपुराणात हिमावत आणि मैना यांच्यातील लग्नाचे वर्णन आहे.[३]
देवी-भागवत पुराणातील सातव्या स्कंधाच्या शेवटच्या नऊ अध्यायांमध्ये (३१-४०) आढळणारा देवी गीतेचा पवित्र ग्रंथ हा पार्वती आणि तिचे वडील हिमावत यांच्यातील संवाद आहे. हा भाग देवीचे वैश्विक स्वरूप, उपनिषदांच्या प्रमुख ग्रंथांवरील ध्यान, अष्टांग-योग, ज्ञान, कर्म आणि भक्तीचे, देवीला समर्पित मंदिरांची स्थाने आणि तिच्या उपासनेशी संबंधित विधींबद्दल माहिती देतो.
हिमावतच्या कथेचा उल्लेख ब्रह्मांड पुराण आणि केनोपनिषदातही आढळतो.
संदर्भ
[संपादन]- ↑ www.wisdomlib.org (2017-03-08). "Himavat: 15 definitions". www.wisdomlib.org (इंग्रजी भाषेत). 2022-10-21 रोजी पाहिले.
- ↑ Jones, Constance; Ryan, James D. (2006-01-01). Encyclopedia of Hinduism (इंग्रजी भाषेत). Infobase Publishing. ISBN 9780816075645.
- ↑ www.wisdomlib.org (2018-10-04). "The marriage of Himācala [Chapter 1]". www.wisdomlib.org (इंग्रजी भाषेत). 2022-10-21 रोजी पाहिले.
- संदर्भग्रंथ
- W. J. Wilkins (2003). Hindu Gods and Goddesses. Courier Dover Publications. ISBN 0486431568.
- Dictionary of Hindu Lore and Legend (आयएसबीएन 0-500-51088-1) by Anna Dallapiccola.