हिमालयीन एव्हिएशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिमालयन एव्हिएशन या पानावरून पुनर्निर्देशित)
हिमालयन एव्हिएशन
स्थापना १९४५
बंद १९५३ इंडियन एअरलाइन्स मध्ये विलीन
मुख्यालय भारत कोलकाता, भारत

हिमालयीन एव्हिएशन ही भारतातील एक विमान कंपनी होती जी राष्ट्रीयकरण होईपर्यंत भारतीय उपखंडातील उत्तरेकडील भागात कार्यरत होती आणि १९५३ मध्ये इंडियन एरलाइन्स कंपनीत विलीन झाली.

घटना[संपादन]

  • २० फेब्रुवारी १९५० रोजी हिमालयन एव्हिएशन ने नेपाळहून गौचर (नेपाळ) ते कलकत्ता (सध्या कोलकाता) (भारत) पर्यंतची पहिली आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू केले.[१]
  • ७ डिसेंबर १९५१ रोजी कराचीच्या स्टॉपओव्हर पॉईंटवर पाकिस्तानने अहमदाबादहून काबुल, अफगाणिस्तानकडे जाणाऱ्या हिमालयन एव्हिएशनच्या विमानाला स्थानबद्ध केले. पाकिस्तानने यापूर्वी उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत ओलांडणाऱ्या दिल्ली-काबुल थेट हवाई मार्गाचा वापर नाकारला होता. भारत आणि पाकिस्तानने पर्यायी अहमदाबाद-कराची- जाहेदान (इराण)-काबूल हा मार्ग ठरविला होता.[२]

सेवा[संपादन]

हिमालयीन एव्हिएशनची सनदी (चार्टर्ड) उड्डाणसेवे पासून सुरुवात झाली.[३] कालांतराने, ही सेवा नाईट-मेल सेवा आणि अनुसूचित प्रवासी उड्डाणां मध्ये विस्तारित झाले. जास्तीत जास्त महसूल मिळविण्यासाठी, त्यांनी त्यांच्या रात्रीच्या विमानातील उड्डाणांवरही प्रवाश्यांना नेण्यास सुरुवात केली.[४]

ताफा[संपादन]

ताफ्यात बहुधा डग्लस डीसी ३ विमानांचा समावेश होता.

संदर्भ[संपादन]

  1. ^ COVER STORY (Spotlight Weekly), 14th Dec. 2001
  2. ^ "Miscellaneous : dated 7 December 1951: Pak. halts Indian plane to Kabul". The Hindu. 7 December 2001. 26 July 2018 रोजी पाहिले.
  3. ^ Roy R. Roadcap (1992). World Airline Record. Roy R. Roadcap & Associates.
  4. ^ Kalka Prasad Bhatnagar (1951). Transport in Modern India. Kishore Publishing House, Kanpur.