हिना (चित्रपट)
1991 film by Randhir Kapoor | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| पटकथा | |||
| निर्माता | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| कालावधी |
| ||
| |||
हिना हा १९९१ चा भारतीय प्रणय नाट्य चित्रपट आहे, जो ख्वाजा अहमद अब्बास यांनी लिहिलेला आहे आणि रणधीर कपूर यांनी निर्मित व दिग्दर्शित केला आहे. यात ऋषी कपूर, पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार आणि अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची योजना आणि सुरुवात दिग्दर्शक राज कपूर यांनी केली होती, परंतु चित्रीकरणापूर्वीच त्यांचे निधन झाल्यामुळे ह्याचे चित्रीकरण त्यांच्या मोठ्या मुलाने रणधीरने केले. चित्रपटाचे संवाद पाकिस्तानी लेखिका हसीना मोइन यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट समीक्षात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाच्या अकादमी पुरस्कारासाठी भारताचा उमेदवार होता, परंतु तो नामांकित म्हणून स्वीकारला गेला नाही.
चित्रपटाचा काश्मीर भाग हा हिमाचल प्रदेशातील मनाली येथे चित्रित करण्यात आला आहे. काही भागांचे चित्रीकरण पाकिस्तान (मुरी, इस्लामाबाद), स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामध्ये झाले.[१]
संगीत
[संपादन]चित्रपटाचे संगीत रवींद्र जैन यांनी दिले होते आणि गीते जैन, नक्ष लायलपुरी आणि मौलाना कुदसी यांनी लिहिली होती.[२][३] बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, सुमारे २२,००,००० युनिट्स विकल्या गेल्याने, या चित्रपटाचा साउंडट्रॅक वर्षातील सहावा सर्वाधिक विक्री होणारा अल्बम होता. [४]
बिनाका गीतमाला १९९१ च्या वार्षिक यादीत "मैं हूं खुश रंग मेंदी" सातव्या क्रमांकावर आणि "नार दाना अनार दाना" हे विसाव्या क्रमांकावर होते.[५]
| # | गीत | गायक | गीतकार |
|---|---|---|---|
| १ | "मैं हूं खुशरंग हिना" (आनंदी) | लता मंगेशकर | रवींद्र जैन |
| २ | "नार दाना अनार दाना" | ||
| ३ | "देर ना हो जाये कहीं" | लता मंगेशकर, सुरेश वाडकर, मोहम्मद. सईद, फरीद साबरी, सतीश | |
| ४ | "चिठ्ठिये नी दर्द फिराक वालीये" | लता मंगेशकर | नक्ष लायलपुरी |
| ५ | "मरहाबा सय्यदी" | मोहम्मद अझीझ | मौलाना कुदसी |
| ६ | "जानेवाले ओ जानेवाले" | लता मंगेशकर, सुरेश वाडकर | रवींद्र जैन |
| ७ | "बेदर्दी तेरे प्यार ने" | लता मंगेशकर | |
| ८ | "वॅश माल्ले" | मोहम्मद अझीझ | |
| ९ | "मैं हूं खुशरंग हिना" (दुःखी) | लता मंगेशकर, मोहम्मद अझीझ | |
| १० | "मैं देर करता नाही" | लता मंगेशकर, सुरेश वाडकर |
पुरस्कार
[संपादन]- ३७ वे फिल्मफेर पुरस्कार [६]
जिंकले
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - फरीदा जलाल
- सर्वोत्कृष्ट छायांकन – राधू कर्माकर
नामांकन
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - रणधीर कपूर, राजीव कपूर
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - रणधीर कपूर
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – झेबा बख्तियार
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सईद जाफरी
- सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण - झेबा बख्तियार
- सर्वोत्कृष्ट गीतकार - रवींद्र जैन "मैं हूँ खुश रंग मेंदी"
संदर्भ
[संपादन]- ^ Jain, Madhu. "Henna: Labour of love". India Today (इंग्रजी भाषेत). 27 May 2021 रोजी पाहिले.
- ^ Pandya, Haresh (13 October 2015). "Ravindra Jain Profile". Outlook India. 17 April 2021 रोजी पाहिले.
- ^ "Star under a shadow". द हिंदू. 21 November 2013. 24 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "BoxOffice India.com". 2010-01-02. 2 January 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-11-17 रोजी पाहिले.
- ^ "It's all in the name". द हिंदू. 8 September 2002. 24 March 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "37th Filmfare Awards".