Jump to content

हिदाल्गो काउंटी (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडिनबर्ग येथील हिदाल्गो काउंटी न्यायालय

हिदाल्गो काउंटी ( /hɪˈdælɡ/ ;es ) अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,७०,७८१ इतकी होती. [] ही काउंटी टेक्सासमधील नवव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी आणि टेक्सास त्रिकोनाबाहेरील सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र एडिनबर्ग येथे आहे [] तर सर्वात मोठे शहर मॅकअ‍ॅलेन आहे.

हिदाल्गो काउंटीची रचना १४ जानेवारी, १८५२ रोजी झाली. या काउंटीला स्पेनपासून मेक्सिकोला स्वातंत्र्य मिळण्याची हाक देणाऱ्या धर्मगुरू मिगेल हिदाल्गो इ कॉस्तियाचे नाव दिलेले आहे. [] दक्षिण टेक्सासच्या रिओ ग्रांद खोऱ्यातीलही काउंटी अमेरिकेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या काउंटींपैकी एक आहे. हिदाल्गो काउंटी मॅकअ‍ॅलेन-एडिनबर्ग-मिशन महानगराचा भाग आहे.

२०२० मध्ये येथील लोकसंख्येचे ९१.९% लोक हिस्पॅनिक होते. ही काउंटी टेक्सासमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेली हिस्पॅनिक-बहुसंख्य काउंटी होती. []

२०२० मध्ये हिदाल्गो काउंटीतील उत्पादनांची एकूण किंमत $११.५ अब्ज होती.

संदर्भ

[संपादन]
  1. "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. December 17, 2023 रोजी पाहिले.
  2. "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  3. Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 156.
  4. "P2: HISPANIC OR LATINO, AND NOT HISPANIC OR LATINO BY RACE". 2020 Census. युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. October 10, 2021 रोजी पाहिले.