हायडेलबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हायडेलबर्ग
Heidelberg
जर्मनीमधील शहर

Heidelberg corr.jpg

Wappen Heidelberg.svg
चिन्ह
हायडेलबर्ग is located in जर्मनी
हायडेलबर्ग
हायडेलबर्ग
हायडेलबर्गचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 49°24′44″N 8°42′36″E / 49.41222°N 8.71000°E / 49.41222; 8.71000

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बाडेन-व्युर्टेंबर्ग
क्षेत्रफळ १०८.८३ चौ. किमी (४२.०२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,४९,६३३
  - घनता १,३७५ /चौ. किमी (३,५६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
heidelberg.de


हायडेलबर्ग (जर्मन: Heidelberg) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यामधील एक शहर आहे. जर्मनीच्या नैऋत्य भागात नेकार नदीच्या काठावर वसलेले हे शहर येथील पुरातन किल्ला व विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. येथील हायडेलबर्ग विद्यापीठाचा जर्मनीतील तसेच जगातील प्राचीन विद्यापीठात समावेश होतो. हायडेलबर्ग मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बाँबहल्ल्यापासून वाचलेल्या अनेक पुरातन इमारती आहेत. त्यामुळे मध्ययुगीन जर्मन् शहर कसे होते याचे हायडेलबर्ग उत्तम उदाहरण आहे.

हायडेलबर्ग शहरात अमेरिकन सैन्याचे मोठे ठाणे आहे व अमेरिकेचे मोठे वैद्यकिय स्थळ आहे. जर्मनीतील सर्वाधिक इंग्रजी शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिक केंद्र म्हणूनही हायडेलबर्गची चांगलीच ओळख आहे. मानहाईम व लुडविग्सहाफन ही मोठी औद्योगिक केंद्रे येथून जवळच आहेत.


संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: