हान्स नीमन
| हान्स नीमन | ||
|---|---|---|
| २०२३ च्या ग्रँड स्विस स्पर्धेत नीमन | ||
| पूर्ण नाव | हान्स मोक नीमन | |
| देश | ||
| जन्म | २० जून, २००३ सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स | |
| पद | ग्रॅंडमास्टर | |
| फिडे गुणांकन | २७२९ (क्र. २०) (नोव्हेंबर २०२५) | |
| सर्वोच्च गुणांकन | २७३८ (ऑक्टोबर २०२५) | |
हान्स मोक नीमन (जन्म: २० जून २००३) हा एक अमेरिकी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि ट्विच स्ट्रीमर आहे. त्याने १ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा टॉप १०० ज्युनियर खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आणि २२ जानेवारी २०२१ रोजी तो ग्रँडमास्टर झाला. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्याने जागतिक क्रमवारीत क्र. १५ हे त्याचे सर्वोच्च मानांकन मिळवले.
जानेवारी २०२४ मध्ये, नीमनने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या ब-गटात भाग घेतला. ग्रँडमास्टर लियाम व्रोलिज्क आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांच्याविरुद्ध विजयांसह स्पर्धेची सुरुवात केल्यानंतर, त्याला आंतरराष्ट्रीय मास्टर एलाइन रोबर्स आणि ग्रँडमास्टर मार्क'आंद्रिया मौरिझी यांच्याविरुद्ध सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आणि शेवटी तो सातव्या स्थानावर राहिला.
जुलै २०२५ मध्ये, नीमनने फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅमच्या लास व्हेगस पडावाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, जेथे त्याने उपांत्यपूर्व फेरीत जावोखिर सिंदारोव्ह आणि उपांत्य फेरीत फॅबियानो कारुआना यांना पराभूत केले परंतु अंतिम फेरीत लेव्हॉन अरोनियनकडून १½–½ ने पराभूत झाला. त्याच्या कामगिरीमुळे त्याला १८ ग्रँड स्लॅम गुण आणि $१४०,००० चे उपविजेतेपद बक्षीस रक्कम मिळाले.[१] सप्टेंबरमध्ये, नीमनने ग्रँड स्विस स्पर्धा खेळली, जेथे अंतिम फेरीत अनिश गिरीकडून निर्णायक सामना हरल्यावर त्याने ७/११ गुणांसह आठवे स्थान मिळवले.
फसवणूकिचा आरोप
[संपादन]सप्टेंबर २०२२ मध्ये, २०२२ च्या सिंकफिल्ड कपच्या तिसऱ्या फेरीत बुद्धिबळ विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत केल्यानंतर नीमन वादात अडकला.[२] परिणामी, कार्लसनने स्पर्धेतून माघार घेतली, ज्याचा अर्थ अनेकांनी नीमनने सामन्यादरम्यान फसवणूक केल्याचा आरोप म्हणून लावला. नंतर, कार्लसनने थेट नीमनवर फसवणूकीचा आरोप केला आणि म्हणले की तो त्याच्यासोबत भविष्यात सामने खेळण्यास नकार देईल. यानंतरच्या मुलाखतीत, नीमनने लहानपणी ऑनलाइन बुद्धिबळ खेळांमध्ये फसवणूक केल्याची कबुली दिली, परंतु प्रत्यक्ष सामन्यामध्ये फसवणूक केल्याचे नाकारले.[३]
नीमनला चेस.कॉम जागतिक स्पर्धेतून काढण्यात आले आणि त्याला चेस.कॉम वर कोणत्याही प्रकारे खेळण्यास बंदी घालण्यात आली. चेस.कॉम ने एक अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये अंतर्गत फसवणूक विरोधी उपाययोजनांनुसार नीमनने "कदाचित फसवणूक" केली होती. प्रतिसादात, नीमनने कार्लसन, चेस.कॉम आणि सहकारी ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा यांच्याविरुद्ध $१० करोड मानहानीचा खटला दाखल केला.[४] २७ जून २०२३ रोजी, एका संघीय न्यायाधीशाने नीमनचा एक दावा फेटाळून लावला.[५] २८ ऑगस्ट २०२३ रोजी, नीमन, कार्लसन आणि चेस.कॉम यांनी जाहीर केले की त्यांनी या प्रकरणावर एक संधी केली आहे, ज्यामध्ये नीमनला चेस.कॉम वर पूर्णपणे पुनर्संचयित करण्यात आले आणि भविष्यातील चेस.कॉम कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली. जर दोघे सामन्यात जुळले तर कार्लसन त्याला खेळण्यास सहमत होणार या अटीवर सर्व पक्षांनी पुढील कायदेशीर कारवाई न करण्याचे मान्य केले.[६]
यानंतर नीमनने २०२४ च्या जागतिक ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत कार्लसनचा प्रत्यक्षात सामना केला, जेथे त्याने चार पैकी एका खेळात कार्लसनला पराभूत केले, परंतु सामना एकूण १½-२½ ने गमावला.
संदर्भ
[संपादन]- ↑ रॉजर्स, जॅक (२०२५-०७-२०). "Freestyle Chess Las Vegas Grand Slam: Aronian Defeats Niemann, Wins $200,000 First Prize In Las Vegas". Chess.com (इंग्रजी भाषेत).
- ↑ मॅक्गोर्टी, कोलिन (२०२२-०९-०५). "Sinquefield Cup 3: Niemann beats Carlsen to cross 2700". 2023-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-11-20 रोजी पाहिले.
- ↑ इंगल, शॉन (२०२२-०९-०७). "Top chess player Hans Niemann admits cheating in past but says he is now 'clean'". द गार्डियन (इंग्रजी भाषेत).
- ↑ मैश्मन, एल्जा (२०२२-१०-२२). "Chess cheating row: Hans Niemann sues accusers Magnus Carlsen and Chess.com for libel". बीबीसी.
- ↑ "Hans Niemann's $100 Million Lawsuit Over Chess Cheating Allegations Is Dismissed". वॅल स्ट्रीट जर्नल. २०२३-०६-२७.
- ↑ लझ, टॉम (२०२३-०८-२८). "Carlsen and Niemann settle dispute over cheating claims that rocked chess". द गार्डियन.