हातोडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अत्याधुनिक हातोडा

हातोडा (अन्य नावे: हातोडी ; इंग्रजी: Hammer, हॅमर ;) हे हाताने गती देऊन लक्ष्यावर ठोका मारण्यासाठी वापरले जाणारे अवजार आहे. याच्या संरचनेत हातांत धरण्यासाठी एक दांडा व दांड्याला अग्रास धातू किंवा तत्सम पदार्थाचा वजनदार तुंबा, अर्थात ठोकळा, असतो. हातोड्याचा दांडा हातांत धरून त्यास गती दिली जाते व नेम धरून तुंब्याचा प्रहार लक्ष्यावर केला जातो. आकारमानाने लहान असणाऱ्या, हलक्या वजनाच्या हत्यारांस हातोडी अशी संज्ञा वापरली जाते.

हातोडा हे मानवी इतिहासातले बहुदा सर्वांत प्राचीन हत्यार आहे. ज्ञात पुराव्यांनुसार इ.स.पू. २६,००,०००च्या सुमारासदेखील दगडी हातोडे प्रचलित होते.


चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: