हाऊस (दूरचित्रवाणी मालिका)
American television medical drama | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | television series | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | medical diagnosis | ||
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
रचनाकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
वितरण |
| ||
भाग |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
आरंभ वेळ | नोव्हेंबर १६, इ.स. २००४ (Pilot) | ||
शेवट | मे २१, इ.स. २०१२ | ||
कालावधी |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
हाऊस (ज्याला हाऊस, एमडी देखील म्हणतात) ही एक अमेरिकन वैद्यक क्षेत्रातील नाट्यावर आधारलेली दूरचित्रवाणी मालिका आहे. तिचे आठ सीझन फॉक्स नेटवर्कवर 16 नोव्हेंबर 2004 ते 21 मे 2012 पर्यंत दाखवले गेले. या मालिकेतील मुख्य पात्र डॉ. ग्रेगरी हाऊस ( ह्यू लॉरी ), हे आहे. हा एक परंपरेला छेद देणारा, थोडासा दुष्ट प्रवृत्तीकडे झुकणारा परंतु असामान्य वैद्यकीय प्रतिभा असलेला डॉक्टर आहे. त्याला वेदनाशामक औषधांचे व्यसन असूनही तो, न्यू जर्सी मधील काल्पनिक प्रिन्स्टन-प्लेन्सबोरो टीचिंग हॉस्पिटल (PPTH) येथे रोगनिदान करणाऱ्यांच्या टीमचा प्रमुख आहे. या मालिकेची प्रमुख कल्पना पॉल अटानासिओ यांची आहे. तर यातील मुख्य पात्राच्या निर्मातीचे श्रेय डेव्हिड शोर यांना दिले जाते.
मालिकेच्या कार्यकारी निर्मात्यांमध्ये शोर, अटानासिओ, अटानासिओचा व्यवसाय भागीदार केटी जेकब्स आणि चित्रपट दिग्दर्शक ब्रायन सिंगर यांचा समावेश होता. या मालिकेचे चित्रीकरण प्रामुख्याने लॉस एंजेलस काउंटीच्या वेस्टसाइड मधील सेंच्युरी सिटी नावाच्या भागात करण्यात आले. ही मालिका समीक्षकांकडून प्रशंसली गेली व युनायटेड स्टेट्समधील सातत्याने सर्वोच्च रेटिंग मिळविलेल्या मालिकांमध्ये तिची गणना केली जाते.
हाऊस अनेकदा त्याच्या सहकारी डॉक्टरांशी आणि त्याच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या डॉक्टरांशी संघर्ष करतो. याचे मुख्य कारण म्हणजे रुग्णांच्या आजारांबद्दलची त्याची अनेक गृहीते ही सूक्ष्म किंवा विवादास्पद अंतर्दृष्टीवर आधारित असतात. त्याची बॉस, रुग्णालयाची प्रशासक आणि मेडिसिनची डीन डॉ. लिसा कडी ( लिसा एडेलस्टीन ) हिच्याशी त्याचा, रुग्णालयाच्या नियमांचे आणि कार्यपद्धतींचे उल्लंघन केल्याने वारंवार संघर्ष होतो. हाऊसचा एकमेव खरा मित्र ऑन्कोलॉजी विभागाचा प्रमुख डॉ. जेम्स विल्सन ( रॉबर्ट शॉन लिओनार्ड ) हा आहे.
पहिल्या तीन सीझनमध्ये, हाऊसच्या डायग्नोस्टिक टीममध्ये डॉ. रॉबर्ट चेस ( जेसी स्पेन्सर ), डॉ. ॲलिसन कॅमेरॉन ( जेनिफर मॉरिसन ) आणि डॉ. एरिक फोरमन ( ओमर एप्स ) यांचा समावेश आहे. तिसऱ्या सत्राच्या शेवटी, हा संघ विखुरला जातो. परंतु पुढे डॉ. फोरमन यांना पुन्हा सामील करून, हळूहळू हाऊस तीन नवीन टीम सदस्यांची निवड करतो: डॉ. रेमी "थर्टीन" हॅडली ( ऑलिव्हिया वाइल्ड ), डॉ. ख्रिस टॉब ( पीटर जेकबसन ) आणि डॉ. लॉरेन्स कुटनर ( काल पेन ). चेस आणि कॅमेरॉन हॉस्पिटलमध्ये अधूनमधून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत रहातात. पाचव्या हंगामात शेवटी शेवटी कुटनरचे निधन होते; सहाव्या सीझनच्या सुरुवातीला, कॅमेरॉन हॉस्पिटलमधून निघून जाते आणि चेस डायग्नोस्टिक टीमकडे परत येतो. सातव्या हंगामातील बराच काळ थर्टीन रजा घेते, आणि तिची जागा वैद्यकीय विद्यार्थिनी मार्था एम. मास्टर्स ( अंबर टॅम्बलिन ) ही घेते. कडी आणि मास्टर्स आठव्या सिझनच्या आधी निघून जातात; फोरमन मेडिसिनचा नवीन डीन बनतो, तर डॉ. जेसिका ॲडम्स ( ओडेट ॲनेबल ) आणि डॉ. ची पार्क ( शार्लिन यी ) हाऊसच्या टीममध्ये सामील होतात.
युनायटेड स्टेट्समधे, दुसऱ्या सीझनपासून चौथ्या सीझनपर्यंत हाऊस टॉप 10 मालिकांमध्ये होता. ही मालिका 66 देशांमध्ये वितरित केली गेली व 2008 मध्ये ही मालिका जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी म्हणून गणली गेली. [१] .हाऊस शोला पाच प्राइमटाइम एम्मी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक पीबॉडी पुरस्कार आणि नऊ पीपल्स चॉईस पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. 8 फेब्रुवारी 2012 रोजी, फॉक्सने जाहीर केले की, तेव्हा सुरू असलेला आठवा सीझन, शेवटचा असेल. [२] 21 मे 2012 रोजी मालिकेचा शेवटचा भाग व त्यानंतर एक तासाचा पूर्वलक्ष्यी भाग प्रसारित झाला.
निर्मिती
[संपादन]संकल्पना
[संपादन]2004 मध्ये, डेव्हिड शोर, पॉल अटानासिओ आणि अटानासिओच्या व्यावसायिक भागीदार केटी जेकब्स, यांनी (त्यावेळी शीर्षक नसलेली) ही मालिका, फॉक्सला सीएसआय -शैलीतील एक 'वैद्यकीय क्षेत्रातील गुप्तहेर' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम म्हणून सादर केली. [३] या मालिकेत हॉस्पिटल मधील डॉक्टर एखाद्या गुप्तहेराप्रमाणे लक्षणे तपासून रोग निदान करतात अशी स्थूल कल्पना आहे. [४] येल-न्यू हेवन हॉस्पिटल (YNHH) मधील चिकित्सक लिसा सँडर्स यांनी लिहिलेल्या न्यू यॉर्क टाइम्स मासिकातील , "निदान (Diagnosis)" या स्तंभातून, अटानासिओ यांना वैद्यकीय रोग निदान प्रक्रियेवर आधारित नाट्य विकसित करण्यास प्रेरणा मिळाली. वाचकांनी या मालिकेतील काल्पनिक प्रिन्स्टन-प्लेन्सबोरो टीचिंग हॉस्पिटल (PPTH), व प्लेन्सबोरो येथील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये गफलत करु नये. या मालिकेतील काल्पनिक हॉस्पिटल येल-न्यू हेवन हॉस्पिटल (YNHH) या शिक्षण संस्थेच्या अनुषंगाने तयार केले आहे. [५] फॉक्सने ही मालिका विकत घेतली, परंतु नेटवर्कच्या तत्कालीन अध्यक्षांनी, गेल बर्मन यांनी, क्रिएटिव्ह टीमला असे सांगितले की, "मला एक वैद्यकीय शो हवा आहे, परंतु पांढरे कोट घातलेली माणसे हॉलवेमध्ये फिरताना दिसता कामा नयेत". [६] ही अट या शोच्या अंतिम स्वरूपासाठी प्रभावी ठरली असे जेकब्सने म्हणले आहे. [६]
We knew the network was looking for procedurals, and Paul [Attanasio] came up with this medical idea that was like a cop procedural. The suspects were the germs. But I quickly began to realize that we needed that character element. I mean, germs don't have motives.
फॉक्सने शो उचलल्यानंतर, त्याचे नामकरण चेजिंग झेब्रास, सर्कलिंग द ड्रेन असे केले गेले [८] (वैद्यकीय अपभाषेत " झेब्रा " म्हणजे अगदी असामान्य किंवा अस्पष्ट निदान हे दर्शवते तर, "सर्कलिंग द ड्रेन" हा शब्द मृत्यूशैयेवरील रुग्णांसाठी वापरला जातो). [९] "ज्या रोगांचे निदान करता येत नाही त्यांचे निदान" करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांची टीम, हा या शोचा मूळ गाभा होता. [१०] या मालिकेत एक मनोरंजक मध्यवर्ती पात्र असणे महत्वाचे आहे असे शोरला वाटले. हे पात्र रुग्णांच्या व्यक्तिमत्वाचे परीक्षण करून, रुग्णांची गुपिते व थापा शोधून त्यांच्या आजारांचे निदान करतो. [१०] शोर आणि उर्वरित क्रिएटिव्ह टीम या मुख्य पात्राच्या संकल्पनेचा जसजसा विस्तार करत गेले, तसतशी ही मालिका वैद्यकीय संकल्पनांपासून दूर जाऊन मुख्य भूमिकेवर अधिक केंद्रित झाली. [११] या पात्राचे नाव "हाऊस" होते, जे या शोचे शीर्षक म्हणून देखील स्वीकारले गेले. [८] शोरने पात्रांचा आणखी विकास करून पायलट भागासाठी स्क्रिप्ट लिहिली. [३] या पायलट भागाचे दिग्दर्शक व पात्रनिवडीमध्ये प्रमुख भूमिका असलेले ब्रायन सिंगर, याने असे म्हणले आहे की, "पायलटचे शीर्षक 'सर्व थापाडे (एव्हरीबडी लाईज)' असे होते आणि हाच कार्यक्रमाचा गाभा आहे". [११] सुरुवातीच्या अनेक भागांची कथानके, द न्यू यॉर्करचे लेखक बर्टन रौचे, यांनी 1944 ते 1994 दरम्यान नोंदविलेल्या विचित्र वैद्यकीय घटनांवर आधारित होती असे शोरने म्हणले आहे. [४]
एका अध्यापन रुग्णालयात पेशंट म्हणून आलेल्या स्वानुभवावरून शोर यांना शीर्षक पात्राची संकल्पना सुचली. [१२] तेथील आठवणी सांगताना ते म्हणतात की, "मला माहीत होते की, मी खोलीतून बाहेर पडताच, ते माझी [माझ्या अज्ञानाची] थट्टा करतात आणि मला असे वाटले की खोली सोडण्यापूर्वीच अशी थट्टा करणारे पात्र पाहणे मनोरंजक असेल." [१३] शोचे प्रमुख पात्र काही बाबतीत अपंग असेल हा शोच्या गाभ्याचा एक मध्यवर्ती भाग होता. [१४] हाऊसच्या मूळ संकल्पनेत मुख्य पात्र व्हीलचेअर वापरते असे होती, परंतु फॉक्सने हे नाकारले. नेटवर्कच्या या आग्रहाबद्दल जेकब्सने नंतर कृतज्ञता व्यक्त केली - त्याला त्याच्या पायावर उभे केल्याने एक महत्त्वपूर्ण भौतिक परिमाण जोडले गेले. [११] लेखकांनी शेवटी, हाऊसला चुकीच्या निदानामुळे अधू झालेला पाय देणे निवडले, ज्यामुळे त्याला काठी वापरावी लागते आणि त्याला होणाऱ्या वेदनांमुळे मादक पदार्थांवर अवलंबून राहवे लागते. [१४]
शेरलॉक होम्सचे संदर्भ
[संपादन]काल्पनिक गुप्तहेर शेरलॉक होम्सचे संदर्भ संपूर्ण मालिकेत दिसतात. [१५] [१६] शोर होम्सचा चाहता होता आणि होम्सची ग्राहकांबद्दलची उदासिनता त्याला अनन्य वाटली. [१३] होम्स आणि हाऊसच्या तर्कशुद्ध विचार करण्याच्या पद्धतीवरून [१५] व मानसिकतेमधून हे साम्य स्पष्ट दिसते. तसेच, जिथे तर्क लागू पडत नाही तेथील त्याची तर्ककर्कशता [९] आणि त्याला रूची नसलेली प्रकरणे स्वीकारण्याची अनिच्छा [१७] यातूनही हे साम्य दिसते. तर्कशुद्ध पद्धतीने रोगाच्या प्रत्येक कारणाची चिकित्सा करून पद्धतशीरपणे असंभव कारणांची छाननी करणे हेसुद्धा या दोघातील साम्य दाखवून देते; होम्सही अशीच पद्धत वापरतो. [८] दोन्ही पात्रे वाद्ये वाजवतात (हाऊस पियानो, गिटार आणि हार्मोनिका वाजवतो; होम्स, व्हायोलिन) आणि ड्रग्स घेतात (हाऊस विकोडिनवर अवलंबून आहे; होम्स मनोरंजनासाठी कोकेन वापरतो ). [१५] डॉ. जेम्स विल्सन याच्याशी हाऊसचा संबंध व होम्स आणि त्याचा विश्वासू डॉ. जॉन वॉटसन हे देखील यांच्यातील प्रतिध्वनी सारखे वाटतात. [८] विल्सनची व्यक्तिरेखा साकारणारे रॉबर्ट शॉन लिओनार्ड, यांच्या मते, हाऊस आणि त्याच्या पात्राचा मूळ हेतू होम्स आणि वॉटसन यांच्याप्रमाणेच एकत्र काम करण्याचा होता; त्याच्या मते, हाऊसच्या डायग्नोस्टिक टीमने वॉटसनच्या भूमिकेचा तो पैलू गृहीत धरला आहे. [१८] शोर म्हणाले की, हाऊस हे नाव सुद्धा एकप्रकारे होम्सला श्रद्धांजलीच आहे. [८] [१९] हाऊस च्या घराचा पत्ता '221B बेकर स्ट्रीट', हा तर होम्सच्या पात्राशी थेट संदर्भ दाखवतो. [९] विल्सनचा पत्ता देखील 221B आहे.
मालिकेच्या भागांमध्ये शेरलॉक होम्सच्या कथांचे अतिरिक्त संदर्भ सापडतात. पायलट एपिसोडमधील मुख्य रुग्णाचे नाव रिबेका ॲडलर आहे तर " ए स्कँडल इन बोहेमिया " या होम्सच्या पहिल्या लघुकथेतील पात्र आयरीन ॲडलर आहे. [२०] सीझन दोनच्या अंतिम भागात, " मोरियार्टी " नावाचा एक वेडा बंदुकधारी हाऊसला गोळी मारतो[२१] ; हेच नाव होम्सच्या कुप्रसिद्ध कट्टर शत्रूचे आहे. सीझन 4 च्या " इट्स अ वंडरफुल लाई " या एपिसोड मध्ये, हाऊसला ख्रिसमस गिफ्ट म्हणून "कॉनन डॉयल- दुसरी-आवृत्ती " मिळते. सीझन पाचच्या " द इच " या भागामध्ये, हाऊस, कॉनन डॉयलच्या द मेमोयर्स ऑफ शेरलॉक होम्स या पुस्तकाच्या प्रतीच्या वरून त्याच्या चाव्या आणि विकोडिन उचलताना दिसत आहे. पाचव्या भागातील " जॉय टू द वर्ल्ड " या भागात, हाऊस, त्याच्या टीमला मूर्ख बनवण्याच्या प्रयत्नात, जोसेफ बेलचे पुस्तक वापरतो; जोसेफ बेल हे कॉनन डॉयलचे शेरलॉक होम्ससाठीचे प्रेरणास्थान आहे. [८] हे पुस्तक विल्सनने त्याला मागील ख्रिसमसला भेट म्हणून दिलेले असते. या पुस्तकाच्या वर विल्सन लिहितो "ग्रेगने मला तुझ्याबद्दल विचार करायला लावले." हे पुस्तक त्याने हाऊसला दिल्याचे कबूल करण्यापूर्वी, विल्सन संघातील दोन सदस्यांना सांगतो की हे पुस्तक आयरीन एडलर नावाच्या रुग्णाने दिलेले आहे. सीझन 7 भाग 3 मधील रुग्ण, युवकांसाठी रहस्यकथा लिहिणारा लेखक आहे. या रुग्णाने लिहिलेल्या गुप्तहेर पुस्तक मालिकेच्या शेवटच्या भागात कथेचा नायक गूढपणे नाहीसा होतो; हे वाचून होम्सच्या " द फायनल प्रॉब्लेम " ची आठवण होते. मालिकेचा शेवट सुद्धा होम्सला मानवंदना देणारा आहे. हाऊसचा सकृत दर्शनी वाटणार मृत्यू, होम्सच्या " द फायनल प्रॉब्लेम " ची आठवण करून देतो. 1893 मध्ये कॉनन डॉयलने होम्स या पात्राचा शेवट अशाच प्रकारे योजला होता. [२२]
निर्माता संघ
[संपादन]हाऊस मालिका, ही फॉक्ससाठी युनिव्हर्सल नेटवर्क दूरचित्रवाणीच्या संयुक्त विद्यमाने हील आणि टो फिल्म्स, शोर झेड प्रॉडक्शन आणि बॅड हॅट हॅरी प्रॉडक्शनची सह-निर्मिती होती. [२४] हील आणि टो फिल्म्सचे प्रमुख- पॉल अटानासिओ आणि केटी जेकब्स; शोर झेड प्रॉडक्शनचे प्रमुख- डेव्हिड शोर; आणि बॅड हॅट हॅरी प्रॉडक्शनचे प्रमुख- ब्रायन सिंगर, हे संपूर्ण मालिकेचे कार्यकारी निर्माते होते. [१२] पायलट भाग बनवल्यानंतर पहिल्या भागाच्या सुरुवातीला लॉरेन्स कॅप्लो, पीटर ब्लेक, आणि थॉमस एल. मोरन, लेखक म्हणून स्टाफमध्ये सामील झाले. दुसऱ्या सीझनच्या सुरुवातीला डोरिस इगन, सारा हेस, रसेल फ्रेंड आणि गॅरेट लर्नर हे लेखक संघात सामील झाले. जेव्हा मालिका सुरू झाली तेव्हा, फ्रेंड आणि लर्नर, जे एकमेकांचे व्यवसायिक भागीदार आहेत, त्यांना पदांची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी संधी नाकारली. पुढे शोचे यश पाहिल्यानंतर, दुसऱ्या वर्षी जेकब्सने त्यांना पुन्हा नोकरीची ऑफर दिली तेव्हा त्यांनी ते स्वीकारले. [२५] चौथ्या सीझनच्या सुरुवातीला लेखक एली ॲटी आणि सीन व्हाईटसेल शोमध्ये सामील झाले; ॲटी मालिकेच्या शेवटपर्यंत लेखक म्हणून शोमध्ये राहिला, आणि अंतिम भागाचे त्याने सह-लेखन केले. चौथ्या सीझनच्या सुरुवातीपासून, मोरन, फ्रेंड आणि लर्नर यांना अटानासिओ, जेकब्स, शोर आणि सिंगर यांच्याबरोबर मालिकेचे कार्यकारी निर्माते म्हणून श्रेय देण्यात आले. [२४] सीझन पाचच्या दुसऱ्या [२६] आणि तिसऱ्या [२७] भागांसाठी ह्यू लॉरीला कार्यकारी निर्माता म्हणून श्रेय देण्यात आले.
शोर हाऊसचा सर्वेसर्वा समजला जातो. [२८] सहाव्या पर्वाच्या अखेरीस दोन डझनहून अधिक लेखकांनी कार्यक्रमाला हातभार लावला होता. सर्वात विपुल लेखन करणाऱ्यात कपलो (18 भाग), ब्लेक (17), शोर (16), फ्रेंड (16), लर्नर (16), मोरान (14) आणि एगन (13) यांची गणना होते. शोच्या पहिल्या सहा सीझनमध्ये सर्वात जास्त दिग्दर्शन करणाऱ्यात डेरन सराफियन (२२ भाग) यांची गणना होते. परंतु ते सहाव्या सीझनमध्ये सहभागी नव्हते. त्यांच्या खालोखाल ग्रेग यैतानेस (१७) यांची नोंद होते. मालिकेत काम केलेल्या तीन डझनहून अधिक दिग्दर्शकांपैकी फक्त डेव्हिड स्ट्रायटनने सहाव्या सीझनमध्ये तब्बल 10 भागांचे दिग्दर्शन केले. ह्यू लॉरीने सहाव्या भागातील १७ व्या भागाचे, " लॉकडाउन "चे दिग्दर्शन केले. [२९] शो सुरू झाल्यापासून एलन सॉल्टेस व्हिज्युअल इफेक्ट्सचे पर्यवेक्षक होते. [३०] येल स्कूल ऑफ मेडिसिनमधील सहाय्यक क्लिनिकल प्रोफेसर, लिसा सँडर्स या मालिकेच्या तांत्रिक सल्लागार होत्या. त्यांची "निदान (diagnosis)" ही लेखमाला हाऊसचे प्रेरणास्थान होती. [३१] शोरच्या मते, "आम्ही जे काही करतो ते.. तीन वेगवेगळे डॉक्टर तपासतात." [३२] मालिकेच्या सेटवर वैद्यकीय सल्लागार म्हणून बॉबिन बर्गस्ट्रॉम, या नोंदणीकृत परिचारिकेने काम केले. [३२]
सुरुवातीला, निर्माते हाऊसच्या भूमिकेसाठी "अमेरिकन व्यक्ती" शोधत होते. [३३] विशेषतः ब्रायन सिंगर, या भूमिकेसाठी गैर-अमेरिकन अभिनेत्याची नियुक्ती करण्याचा विचारही करु शकत नव्हते. कास्टिंग सत्राच्या वेळी, अभिनेता ह्यू लॉरी नामिबियामध्ये फ्लाइट ऑफ द फिनिक्स या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याने हॉटेलच्या बाथरूममध्ये ऑडिशन टेप एकत्र केला कारण पुरेसा प्रकाश असलेले ते एकमेव ठिकाण होते, [३३] आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. (सिंगरने त्याची तुलना " बिन लादेन व्हिडिओ" शी केली). [३४] लॉरीने या टेप मध्ये काठी ऐवजी त्यावेळी त्याला उपलब्ध असलेली छत्री वापरली. सिंगर त्याच्या अभिनयाने खूप प्रभावित झाला आणि "एक सच्चा अमेरिकन अभिनेता" या व्यक्तिरेखेला किती चांगले पकडू शकतो यावर समाधान व्यक्त केले. [३५] [३६] सिंगरला लॉरी इंग्लिश आहे हे माहीत नव्हते व त्याच्या अमेरिकन उच्चारामुळे ते अजिबात कळून येत नव्हते. लॉरीने या उच्चाराचे श्रेय "खूप टीव्ही आणि बरेच चित्रपट पाहणाऱ्या त्याच्या तरुणाईला" दिले. [३३] डेनिस लीरी, डेव्हिड क्रॉस, रॉब मॉरो आणि पॅट्रिक डेम्प्सी यांसारख्या स्थानिक सुप्रसिद्ध अभिनेत्यांचा या भूमिकेसाठी विचार केला जात होता तरी, शोर, जेकब्स आणि अटानासिओ हे सिंगर इतकेच लॉरीच्या अभिनयाने प्रभावित झाले आणि हाऊस च्या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. [३७]
It wasn't a massive move when I first considered [doing House]. What usually happens is you do a pilot and of the very few picked up, only about a quarter go to a second year. So I thought I'll have three fun weeks. I never dreamed I'd be here three and a half years later.
लॉरीला, सुरुवातीला, डॉ. जेम्स विल्सन हे मालिकेचे मध्यवर्ती पात्र आहे असे वाटले. पायलट एपिसोडची पूर्ण स्क्रिप्ट मिळेपर्यंत, पात्राच्या स्वरूपामुळे, हाऊस हे एक सहायक पात्र आहे असे त्याने गृहीत धरले होते. लॉरीचे वडील रॅन लॉरी, हे पेशाने खरे वैद्यकीय डॉक्टर होते, त्यामुळे बनावट डॉक्टर बनण्याबद्दल त्याला वडिलांपेक्षा जास्त पैसे मिळाले, याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. [३३] सीझन तीनच्या सुरुवातीपासून, त्याला प्रत्येक भागासाठी पहिल्यापेक्षा जवळजवळ तिप्पट म्हणजे $275,000 ते $300,000 मिळत होते. [३९] लॉरीने पाचव्या सीझनपर्यंत सुमारे $400,000 प्रति एपिसोड, [४०] आणि शेवटच्या सीझनसाठी $700,000 प्रति एपिसोड कमावले, त्यामुळे नेटवर्क दूरचित्रवाणीवरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांमधे त्याची गणना केली जाते. [४१] [४२]
रॉबर्ट शॉन लिओनार्डला CBS शो Numb3rs तसेच हाऊससाठी ची स्क्रिप्ट मिळाली होती. [४३] लिओनार्डला वाटले की Numb3rs स्क्रिप्ट "एक प्रकारची मस्त" आहे आणि त्याने शोसाठी ऑडिशन देण्याचे ठरविले. [४३] तथापि, त्या मालिकेतील ज्या चार्ली एप्स च्या भूमिकेसाठी त्याचा विचार केला जात होता, त्या पात्राचे काम खूप जास्त होते. पुढे त्याने (उपहासाने) असे म्हणले कि, "मी कमीत कमी कामात जास्तीत जास्त आनंदी असतो." [४३] त्यांच्या मते त्यांची हाऊस ऑडिशन विशेष चांगली नव्हती, परंतु सिंगरसोबतच्या त्यांच्या प्रदीर्घ मैत्रीमुळे त्यांना डॉ. विल्सनचा भाग मिळण्यात मदत झाली. [४३] सिंगरला लिसा एडेलस्टीने साकारलेली वेस्ट विंग मालिकेतील वेश्येच्या भूमिका आवडली व त्याने तिला पायलट स्क्रिप्टची एक प्रत पाठवली. [४४] एडेलस्टीनला या मालिकेचे लेखन व विशेष करून हाऊससोबतच्या तिच्या पात्राचे चटपटीत संभाषण आवडले व तिने डॉ. लिसा कुडी ची भूमिका स्वीकारली. [४४]
ऑस्ट्रेलियन अभिनेता जेसी स्पेन्सरच्या एजंटने त्याला डॉ. रॉबर्ट चेसच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी सुचविले. सुरुवातिला स्पेन्सरला वाटले की हा कार्यक्रम 'जनरल हॉस्पिटल' या मालिकेसारखच असेल, परंतु स्क्रिप्ट्स वाचल्यानंतर त्याने आपले मत बदलले. [४५] त्याला भूमिका मिळाल्यानंतर, त्याने निर्मात्यांना हे पात्र ऑस्ट्रेलियन करण्यासाठी राजी केले. [४६] पॅट्रिक डेम्पसीनेही चेसच्या भागासाठी ऑडिशन दिली होती; पुढे ग्रेज ॲनाटॉमी मालिकेतील डॉ. डेरेक शेफर्ड या भूमिकेबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. [४७] डॉ. एरिक फोरमनची भूमिका करणारा ओमर एप्स, याला त्याने पूर्वी केलेल्या भूमिकेतून प्रेरणा मिळाली. या आधी, एनबीसी वाहिनी वरील ईआर या मेडिकल ड्रामा मधील त्रासलेल्या इंटर्नची भूमिका त्याने साकारली होती. [४८] जेव्हा हाऊसचा प्रीमियर झाला तेव्हा फॉक्स दॅट सेवनटीस् शो या मालिकेचे प्रसारण करीत होती आणि त्या मालिकेच्या मुख्य नायकाचे नावही एरिक फोरमन हेच होते; तसे असूनही या पात्राला "एरिक फोरमन" असे नाव देण्यात आले. (दोन्ही मालिका फॉक्सवर, दोन भागापर्यंत एकदम प्रसारित केल्या गेल्या. जेव्हा हाऊसचा पहिला भाग चालू होता, तेव्हा दॅट सेवनटीस् शो च्या सातव्या भागाच्या शेवटी टोफर ग्रेसने तो शो सोडला आणि फक्त त्या मालिकेच्या अंतिम फेरीसाठी परत आला). डॉ. ॲलिसन कॅमेरॉनच्या भागासाठी जेव्हा जेनिफर मॉरिसनची ऑडिशन झाली, तेव्हा तिच्यामते ती काही फारशी चांगली झाली नाही. [४९] तथापि, तिच्या ऑडिशनपूर्वी, सिंगरने तिचे डॉसन क्रीक मधील भूमिकेसह काही इतर परफॉर्मन्स पाहिले होते, आणि तिला या भूमिकेसाठी घेण्याचे आधीच ठरविले होते. [४९] सहाव्या सीझनच्या मध्यभागी तिचे पात्र मालिकेतून जाते तेव्हा मॉरिसनने शो सोडला. [५०]
तिसऱ्या भागाच्या शेवटी, हाऊस चेसला काढून टाकतो, तर फोरमन आणि कॅमेरून राजीनामा देतात. एका एपिसोडमध्ये तो एका स्वच्छता कर्मचाऱ्याला तात्पुरता "डॉ. बफर" म्हणून निदानात मदत करण्यासाठी घेतो. शेवटी नवीन डायग्नोस्टिक टीमची नियुक्ती करण्यासाठी तो एका स्पर्धेच्या माध्यमातून सात अंतिम स्पर्धक निवडतो. चौथ्या सत्राच्या पाचव्या भागामध्ये निर्मात्यांनी फोरमनबरोबर दोन नवीन पूर्ण-वेळ अभिनेत्यांना घेण्याची योजना केली होती. परंतु नंतर, तीन नवीन नियमित कलाकारांना घेण्याचा निर्णय घेण्यात आला. [५१] (एप्प्ससह, अभिनेते मॉरिसन आणि स्पेन्सर कलाकारांमध्ये राहिले, कारण त्यांची पात्रे नवीन असाइनमेंट्सकडे वळवण्यात आली.) निर्मिती दरम्यान, शोच्या लेखकांनी प्रत्येक भागात एका उमेदवारवाराला वगळले; परिणामी, जेकब्स म्हणाले, निर्मात्यांना किंवा कलाकारांना शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला कामावर घेतले जाणार आहे हे माहित नव्हते. [५२] सीझनच्या नवव्या भागात, हाऊसची नवीन टीम उघड झाली: फोरमनसोबत डॉक्टर लॉरेन्स कुटनर (काल पेन ), [५३] ख्रिस टॉब ( पीटर जेकबसन ), [५४] आणि रेमी "थर्टीन" हॅडली ( ऑलिव्हिया वाइल्ड ) सामील झाले. [५५] शेवटचा एक अपवाद वगळता हाऊसने नाकारलेले उमेदवार शोमध्ये परतले नाहीत. हाऊसने वगळलेली एम्बर "कटथ्रोट बिच" वोलाकिस (ॲनी डुडेक ), उर्वरित चार सीझनमध्ये विल्सनची मैत्रीण म्हणून दिसते, [५६] आणि नंतर सीझन पाच व आठ मध्ये हाऊसच्या भ्रमावस्थेत दिसते. हाऊसच्या टीम मध्ये निवड करण्यासाठीच्या अंतिम फेरीत आलेल्या पात्रांमध्ये पेन आणि वाइल्डची व्यक्तिरेखा इतर अभिनेत्यांच्या तुलनेत जास्त होती, परंतु सर्वजण एकसारख्या ऑडिशन प्रक्रियेतून गेले होते आणि लेखकांनी पात्रे जशी रंगविली तसे ते शोमध्ये राहिले. [५२] पाचव्या सत्राच्या २० व्या भागात पेनने साकारलेले कुटनरचे पात्र काढले गेले, कारण त्याने प्रेसिडेंट ओबामा च्या काळात व्हाईट हाऊस मध्ये 'ऑफिस ऑफ पब्लिक एंगेजमेंट अँड इंटरगव्हर्नमेंटल अफेयर्समध्ये' काम स्वीकारले. [५७]
एडेलस्टीन, एप्स आणि लिओनार्ड यांचे करार सातव्या सत्राच्या शेवटी संपले. खर्च कमी करण्याचा उपाय म्हणून तिन्ही कलाकारांना कमी पगार स्वीकारण्यास सांगण्यात आले. एप्स आणि लिओनार्ड यांनी निर्मात्यांशी तसा करार केला, परंतु एडेलस्टीनने तसे केले नाही. मे 2011 मध्ये, शोच्या आठव्या सीझनसाठी ती परत येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. [५८]
चित्रीकरणाची शैली आणि स्थाने
[संपादन]" वॉक अँड टॉक " चित्रीकरण तंत्राचा वापर करून हाऊसचे चित्रीकरण केले गेले, [६] [१७] या तंत्राचा प्रभावी वापर सेंट एलस्व्हेअर, ईआर, स्पोर्ट्स नाईट आणि द वेस्ट विंग यांसारख्या मालिकांद्वारे याआधीच होऊन ते तंत्र दूरचित्रवाणीवर लोकप्रिय झाले आहे. [५९] या तंत्रामध्ये ट्रॅकिंग शॉट्सचा वापर केला जातो, यात दोन किंवा अधिक पात्रे बोलत असताना लोकेशन्स दरम्यान चालत जातात. [५९] एखाद्या दृश्यामध्ये निकड आणि तीव्रता निर्माण करण्याचा मार्ग म्हणून या तंत्राचा परिणामकारक वापर करता येतो, त्यामुळे या मालिकेत याचा वापर वारंवार केला गेला असे कार्यकारी निर्माती केटी जेकब्स यांनी नमूद केले आहे. [६] तिने पुढे जाऊन नोंदविले की, ह्यू लॉरी 6'2 आणि इतर सर्वांपेक्षा उंच आहे त्यामुळे हे तंत्र अधिकच परिणामकारक ठरले. [६] द न्यू यॉर्कर च्या नॅन्सी फ्रॅंकलिने या मालिकातील स्पेशल इफेक्टसचे वर्णन- "रूग्णांच्या अंतरंगातील अद्भुत प्रवास" असे केले आहे. पुढे त्या म्हणतात "मी पैज लावते की जेव्हा तुमची किडनी बंद होते तेव्हा ते बबल रॅपचे फुगे फुटल्यासारखी पॉपिंगआवाज करते हे तुम्हाला निश्चितच माहित नसेल. " [६०] दुसऱ्या एका समीक्षकाने निरीक्षण नोंदविले आहे की, "कॅमेरे आणि स्पेशल इफेक्ट्स हे फक्त एका रुग्णाच्या घशापुरते मर्यादित नाहीत तर नाकाचे, मेंदूचे व पायांचेही अंतरंग दाखविणारे आहेत", [६१] छायाचित्रणसाठी प्रामुख्याने संगणक-व्युत्पन्न प्रतिमांवर अवलंबून राहण्याऐवजी, शरीरातील अंतर्गतशॉट्समध्ये मिनीएचर इफेक्टस आणि गती नियंत्रित छायाचित्रण यांचा समावेश केला गेला. [३०] अनेक सेटवर अनेक प्रकारचे अनस्क्रिप्टेड प्रॉप्स (कथा संहितेत नसलेल्या वस्तू) उपलब्ध होत्या, ज्यांचा वापर करून लॉरीला त्याच्या व्यक्तिरेखेचे आणि कथेचे विविध पैलू प्रकट करता आले. [६]
या मालिकेचा पायलट भाग व्हँकुव्हरमध्ये चित्रित करण्यात आला; त्यानंतरच्या सर्व भागांचे प्राथमिक छायाचित्रण सेंच्युरी सिटी, लॉस एंजेलस येथील फॉक्स लॉटवर झाले. [३२] ब्रायन सिंगरने त्याच्या गावाजवळील म्हणजेच वेस्ट विंडसर, न्यू जर्सी जवळील हॉस्पिटलची निवड मालिकेतील काल्पनिक हॉस्पिटल दाखविण्यासाठी केली. [१२] मालिकेत दिसणारी प्रिन्स्टन-प्लेन्सबोरो टीचिंग हॉस्पिटलची हवाई दृश्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या फ्रिस्ट कॅम्पस सेंटर [a] येथे चित्रित केली गेली. [६३] तिसऱ्या सीझनच्या "हाफ-विट " या भागाचे काही चित्रीकरण दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात झाले. या भागात डेव्ह मॅथ्यू आणि कर्टवुड स्मिथ यांनी पाहुण्या कलाकारांच्या भूमिका केल्या होत्या. [६४] हाऊसच्या सहाव्या सीझनचा काही भाग न्यू जर्सीच्या पारसिप्पनी-ट्रॉय हिल्स येथील, सध्या वापरात नसलेल्या ग्रेस्टोन पार्क सायकियाट्रिक हॉस्पिटलमध्ये चित्रित करण्यात आला. याचा वापर मालिकेतील काल्पनिक मेफिल्ड सायकियाट्रिक हॉस्पिटल उभे करण्यासाठी केला गेला. [६५]
संदर्भ
[संपादन]- ^ Eurodata TV Worldwide, Agence France Presse (June 12, 2009). "'House' is the world's most popular TV show". April 1, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 21, 2012 रोजी पाहिले.
- ^ Seidman, Robert (February 8, 2012). "Current Season to Be The Last for 'House'". TV by the Numbers. February 10, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 8, 2012 रोजी पाहिले.
- ^ a b Frum, Linda (March 14, 2006). "Q&A with 'House' creator David Shore". Maclean's. Rogers Communications. October 10, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 2, 2007 रोजी पाहिले.
- ^ a b Gibson, Stacey (March 2008). "The House That Dave Built". University of Toronto Magazine. June 1, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 5, 2008 रोजी पाहिले.
- ^ Challen, p. 96.
- ^ a b c d e f MacIntyre, April (November 17, 2008). "'House M.D.' interview: Katie Jacobs talks Cuddy, Cameron and House triangle". Monsters and Critics. January 11, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 6, 2009 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "M&Cjacobsinterview" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Challen, p. 41.
- ^ a b c d e f "House ... and Holmes". Radio Times. BBC Magazines Ltd. January 2006. p. 57. September 9, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ a b c Jensen, Jeff (April 6, 2007). "Full 'House'". Entertainment Weekly. pp. 44–47. July 8, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 10, 2009 रोजी पाहिले.
- ^ a b साचा:Cite video
- ^ a b c Werts, Diane (January 29, 2009). "Fox's medical marvel stays on top". Variety. January 25, 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c Jensen, Jeff (April 8, 2005). "Dr. Feelbad". Entertainment Weekly. December 11, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 7, 2008 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "EWinfo" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ a b Shore, David (2006). "Developing The Concept". Hulu.com. The Paley Center for Media. September 13, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 16, 2008 रोजी पाहिले.
- ^ a b Shore, David; Jacobs, Katie (2006). "House's Disability". Hulu.com. The Paley Center for Media. September 13, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 16, 2008 रोजी पाहिले.
- ^ a b c "House and Holmes: A Guide to Deductive and Inductive Reasoning" (PDF). FactCheck. August 7, 2008 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. June 25, 2009 रोजी पाहिले.
- ^ Slate, Libby (April 17, 2006). "House Calls, An Evening with House". Academy of Television Arts and Sciences. February 9, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 23, 2008 रोजी पाहिले.
- ^ a b Wild, Diane Kristine (September 2, 2005). "Review: House, M.D. Season 1 DVD". Blogcritics. June 5, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 27, 2008 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "Season 1 DVD review" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Ryan, Maureen (May 1, 2006). "'House'-a-palooza, part 2: Robert Sean Leonard". Chicago Tribune. May 10, 2006 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 12, 2007 रोजी पाहिले.
- ^ Wittler, Wendell (April 15, 2005). "Living in a 'House' built for one". today.com]. May 26, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 14, 2018 रोजी पाहिले.
- ^ Murray, Scott (April 26, 2007). "Is there a Dr Watson in the House?". The Age. p. 21.
In the pilot, the patient is Rebecca Adler, named, no doubt, after Irene Adler. 'To Sherlock Holmes, she was always the woman,' as Dr. Watson so tenderly described her.
- ^ Wild, Diane Kristine (May 24, 2006). "TV Review: House Season Finale – "No Reason"". Blogcritics. September 11, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 26, 2008 रोजी पाहिले.
- ^ Sepinwall, Alan (May 22, 2012). "Series Finale Review: 'House'—'Everybody Dies': Keep Me in Your Heart for a While". HitFix. February 23, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 6, 2012 रोजी पाहिले.
- ^ "Bryan Singer from House". Film.com. March 8, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 10, 2009 रोजी पाहिले.
- ^ a b "House Announces Casting News". The Futon Critic. July 18, 2007. December 13, 2008 रोजी पाहिले.
- ^ Barnett, Barbara (May 18, 2008). "House, MD Season Finale: A Conversation with Writers Garrett Lerner and Russel Friend". Blogcritics. December 16, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 13, 2008 रोजी पाहिले.
- ^ ""Not Cancer" from Season 5 of House". Film.com. January 18, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 10, 2009 रोजी पाहिले.
- ^ ""Adverse Events" from Season 5 of House". Film.com. April 16, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 10, 2009 रोजी पाहिले.
- ^ Andreeva, Nellie (March 30, 2006). "Shore lands 2-yr. deal with NBC Uni". The Hollywood Reporter. January 18, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 11, 2008 रोजी पाहिले.
- ^ "House TV Show". Film.com. June 19, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 9, 2010 रोजी पाहिले.
- ^ a b Bennett, Tara (May 19, 2008). "The VFX Doctor in the House". VFX World. July 3, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 17, 2009 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "VFX" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Max, Jill (May 2008). "A doctor's passion for medical storytelling". Yale Medicine Magazine. June 28, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 3, 2008 रोजी पाहिले.
- ^ a b c Staff (January 29, 2006). "Behind The Scenes At "House"". Entertainment Tonight. CBS Studios Inc. July 10, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 25, 2008 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "ET" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ a b c d Keveney, Bill (November 16, 2004). "Hugh Laurie gets into 'House'". USA Today. September 27, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 26, 2008 रोजी पाहिले.
- ^ Brioux, Bill (November 14, 2004). "Compelling 'House' Doctor". Toronto Sun. p. TV2.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;The Concept
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ DeLeon, Kris (June 24, 2008). "How Hugh Laurie Got into 'House'". BuddyTV. October 19, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 11, 2008 रोजी पाहिले.
- ^ Challen, p. 39.
- ^ Clune, Richard (October 28, 2007). "Man about the House". The Daily Telegraph. April 1, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 19, 2008 रोजी पाहिले.
- ^ "Raise Prescribed for 'House' Star". Zap2it. February 23, 2008. December 31, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 5, 2008 रोजी पाहिले.
- ^ Fox, Erin (September 12, 2008). "House's Hugh Laurie Gets Huge Raise". TV Guide. August 6, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 9, 2009 रोजी पाहिले.
- ^ Huff, Richard (February 9, 2012). "TV drama 'House' with Hugh Laurie will come to an end". New York Daily News. February 9, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 20, 2022 रोजी पाहिले.
- ^ Schneider, Michael (February 13, 2012). "The Real Story Behind House's Cancellation". TV Guide. January 30, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 20, 2022 रोजी पाहिले.
- ^ a b c d Wolk, Josh (July 3, 2007). "A Summer Away from the 'House'". Entertainment Weekly. December 11, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 18, 2008 रोजी पाहिले.
- ^ a b Challen, p. 65.
- ^ Staff (September 17, 2007). "Doctor in the house". The Star. January 9, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 28, 2008 रोजी पाहिले.
- ^ Le Marquand, Sarrah (October 3, 2006). "Young doctor". The Courier-Mail. January 9, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 27, 2008 रोजी पाहिले.
- ^ Elfman, Doug (April 20, 2006). "Actress makes 'House' call". Buffalo Grove Countryside.
- ^ Bennett, Geoff (October 11, 2007). "Omar Epps Is Back in the 'House'!". AOL. August 19, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 28, 2008 रोजी पाहिले.
- ^ a b Challen, p. 83.
- ^ Martin, Denise (September 24, 2009). "Actress Jennifer Morrison to exit 'House'". Los Angeles Times. September 26, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 26, 2009 रोजी पाहिले.
- ^ Hendrickson, Paula (January 29, 2009). "Growing cast increases show's depth". Variety. August 29, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 18, 2009 रोजी पाहिले.
- ^ a b Ausiello, Michael (November 28, 2007). "Exclusive: Why House Fired "Cutthroat Bitch"". TV Guide. June 7, 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 1, 2008 रोजी पाहिले.
- ^ Rice, Lynette (October 3, 2007). "Kal Penn joins 'House' as series regular". Entertainment Weekly. April 14, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 30, 2008 रोजी पाहिले.
- ^ del Castillo; Valerie Anne (October 15, 2008). "Penn and Jacobson Talk About Their Journey on 'House'". BuddyTV. March 31, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 15, 2008 रोजी पाहिले.
- ^ Rizzo, Monica (December 11, 2007). "The Hot New Star of House, Olivia Wilde". People.
- ^ Horowitz, Lisa (June 13, 2008). "Playing House in Hollywood". TelevisionWeek. December 24, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 2, 2009 रोजी पाहिले.
- ^ Ausiello, Michael (April 7, 2009). "'House' exclusive: The shocking story behind last night's big death". Entertainment Weekly. February 15, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 10, 2009 रोजी पाहिले.
- ^ Ng, Philiana (May 17, 2011). "Lisa Edelstein Isn't Returning to 'House' Next Season". The Hollywood Reporter. November 14, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 17, 2011 रोजी पाहिले.
- ^ a b Bordwell, David; Thompson, Kristin (February 9, 2007). "Walk the talk". David Bordwell's site on cinema. August 21, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 6, 2009 रोजी पाहिले.
- ^ Franklin, Nancy (November 29, 2004). "Playing Doctor". The New Yorker. p. 168. November 11, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 24, 2008 रोजी पाहिले.
- ^ Bianculli, David (November 16, 2004). "'House' Gets Fine Treatment". New York Daily News. November 2, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 3, 2009 रोजी पाहिले.
- ^ "Campus Map". Princeton University. October 2, 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 27, 2008 रोजी पाहिले.
- ^ Holtz, Andrew (2006). The Medical Science of House, M.D. Oncology Times. 28. Berkley Trade. pp. 50–52. doi:10.1097/01.COT.0000295295.97642.ae. ISBN 978-0-425-21230-1. June 19, 2009 रोजी पाहिले.
- ^ "Television". University of Southern California. December 2, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 7, 2009 रोजी पाहिले.
- ^ Ragonese, Lawrence (April 14, 2009). "TV show 'House' to film at Greystone Park Psychiatric Hospital". The Star-Ledger. March 31, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 25, 2009 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.
- संदर्भ चुका असणारी पाने
- लॉस एंजेलसमध्ये चित्रित केलेले दूरचित्रवाणी कार्यक्रम
- युनिव्हर्सल दूरचित्रवाणीद्वारे दूरदर्शन मालिका
- प्राइमटाइम एमी पुरस्कार विजेती दूरदर्शन मालिका
- पीबॉडी पुरस्कार विजेते दूरदर्शन कार्यक्रम
- इंग्लिश दूरचित्रवाहिनी मालिका
- २०१० च्या दशकातील अमेरिकन कार्यस्थळ असणाऱ्या दूरदर्शन मालिका
- २०१० च्या दशकातील अमेरिकन वैद्यकीय दूरदर्शन मालिका