Jump to content

हवाईचा डेव्हिड कालाकौआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हिड कालाकौआ, हवाई
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वKingdom of Hawaiʻi संपादन
स्थानिक भाषेतील नावKalākaua संपादन
दिलेले नावDavid संपादन
जन्म तारीख१६ नोव्हेंबर 1836 संपादन
जन्मस्थानहोनोलुलु संपादन
मृत्यू तारीख२० जानेवारी 1891 संपादन
मृत्यूस्थानसॅन फ्रान्सिस्को संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणkidney disease संपादन
चिरविश्रांतीस्थानRoyal Mausoleum of Hawaii संपादन
वडीलKapaakea संपादन
आईKeohokālole संपादन
वैवाहिक जोडीदारKapiolani संपादन
कुटुंबHouse of Kalākaua संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाHawaiian, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायराजा, संगीतकार संपादन
पदराजा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाRoyal School संपादन
निवासस्थानʻIolani Palace संपादन
राजकीय पक्षाचा सभासदHawaiian National Party संपादन
धर्मChurch of Hawaii संपादन
पुरस्कारGrand Cross of the Legion of Honour, Knight Grand Cross of the Order of St Michael and St George, Collar of the Supreme Order of the Chrysanthemum, Order of the Rising Sun, Grand Cross of the Order of the Dannebrog संपादन

डेव्हिड कालाकौआ (नोव्हेंबर १६, इ.स. १८३६ - जानेवारी २०, इ.स. १८९१:सान फ्रांसिस्को, अमेरिका) हा हवाईचा राजा होता. हा फेब्रुवारी १२, इ.स. १८७४पासून मृत्यूपर्यंत हवाईच्या राजेपदी होता.

याच्या सत्ताकालात हवाई राज्याचे पारंपारिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले परंतु या दरम्यान अनेक राजकीय संघर्षही झाले. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या वाढत्या प्रभावात दडपल्या गेलेल्या हवाईच्या संस्कृतीला, विशेषतः हुला नृत्य, पारंपारिक पौराणिक कथा आणि संगीताला त्यांनी पुन्हा गतवैभव मिळवून दिले. या त्याला मेरी मोनार्क (आनंदी राजा) म्हणून ओळखले जाते. हवाईच्या आर्थिक स्थैर्यासाठी त्याने १८७६ मध्ये अमेरिकेसोबत एक महत्त्वाचा व्यापारी करार केला, ज्याने स्थानिक साखर उद्योगाला मोठी चालना मिळाली. कालाकौआ हा १८८१ मध्ये जगप्रवास करणारे हवाईचे पहिला राजा होता. १८८७ मध्ये परदेशी व्यापारी आणि राजकीय विरोधकांनी त्यांना लष्करी बळाचा धाक दाखवून संगीनी राज्यघटनेवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. यामुळे राजाच्या अधिकारांना मर्यादा बसली. येथून हवाईच्या राजेशाहीचे पतन सुरू झाले.[]</ref>"King Kalākaua, the "Merrie Monarch"". Hawaii.com (इंग्रजी भाषेत).</ref>

राजा कालाकौआला स्वतःचे अपत्य नसल्यामुळे त्याच्या कारकीर्दीत वारसदार निवडणे अत्यंत निकडीचे होते. त्याने सुरुवातीला आपला धाकटे भाऊ प्रिन्स विल्यम पिट लेलेइओहोकू यांना अधिकृत वारसदार घोषित केले होते. १८७७ मध्ये विल्यमचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्याच वर्षी त्याने आपली बहीण लिलिउओकलानी हिला राज्याची भावी वारसदार म्हणून जाहीर केले. कालाकौआ यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान लिलिउओकलानीने सक्षमपणे राजप्रतिनिधी म्हणून कार्यभार सांभाळला होता. २० जानेवारी १८९१ रोजी अमेरिकेतील सान फ्रांसिस्को येथे एका दौऱ्यावर असताना प्रकृती बिघडून कालाकौआ यांचे निधन झाले. त्याच्यानंतर लिलिउओकलानी हवाईच्या राजगादीवर आली. ही हवाईची पहिली राणी आणि शेवटची सार्वभौम शासक होती.[]<ref>"Liliuokalani: The Story of Hawaii's Last Monarch". Roberts Hawaii (इंग्रजी भाषेत).

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Kalakaua". Encyclopaedia Britannica (इंग्रजी भाषेत).
  2. "The Three Estates of the Hawaiian Kingdom". Hawaiian Kingdom Official Blog (इंग्रजी भाषेत).