हळदी कुंकू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हळदी कुंकू

हळदी-कुंकू ही हिंदू महिलांशी संबंधित एक धार्मिक संकल्पना आहे.[१][२]

स्वरूप[संपादन]

सुवासिनी महिला एकत्र येऊन हा समारंभ साजरा करतात. (आधुनिक काळात विधवा महिलांना यामध्ये सहभागी करून घेण्याचे प्रमाणही दिसून येते.)यामध्ये एक महिला आपल्या घरी हळदी कुंकू समारंभ आयोजित करते आणि त्याला अन्य महिलांना बोलावते. यामध्ये विशिष्ट पूजा, सण यानिमित्ताने महिलांना आमंत्रित करून त्यांना कपाळावर हळद आणि कुंकू लावले जाते.पान-सुपारी दिली जाते.अत्तर लावले जाते,अंगावर गुलाबपाणी शिंपडले जाते. काही प्रसंगी ओटीही भरली जाते.[३]

हळदी कुंकू केले जाणारे सण[संपादन]

 • चैत्रगौरी- चैत्र महिन्यात चैत्र गौरीचे हळदीकुंकू केले जाते. यावेळी आलेल्या महिला आणि मुलींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे दिले जाते. ओल्या हरभरा-याने ओटी भरली जाते. मोगरा फुले किंवा त्याचे गजरे दिले जातात.[४]
 • वटपौर्णिमा- या दिवशी वडाच्या झाडापाशी महिला एकत्र येऊन वडाची पूजा करतात. एकमेकींना हळदी- कुंकू लावून फणसाचे गरे,फळ देतात.
 • श्रावण महिना- श्रावण महिन्यात महिला नागपंचमी, मंगळागौरी सत्यनारायण पूजा या निमित्ताने एकत्र येऊन पूजा करतात व या प्रसंगीही एकमेकींना हळदी कुंकू दिले जाते.
 • भाद्रपद महिना- भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजा, गणपती आणि विशेषतः ज्येष्ठ गौरी पूजनाच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात.[५]
 • शारदीय नवरात्र- शारदीय नवरात्रात महिला एकमेकींना घरी बोलावून श्रीसूक्त पाठ करतात, अष्टमीच्या दिवशी देवीचे पूजन करतात. ललिता पंचमीला कुमारिका पूजन करतात. या विशेष दिवसात हळदी कुंकू केले जाते. *
 • कोजागिरी पौर्णिमा या पूजेमध्ये केले जाणारे लक्ष्मीपूजन, दिवाळी लक्ष्मीपूजन, मार्गशीर्ष गुरुवार व्रत अशा प्रसंगीही हळदी कुंकू केले जाते.[६]
 • मकरसंक्रांत- या दिवशी महिला एकमेकींना वाण देतात, ते धान्याचे, वस्तूचे असते. रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू केले जाते.[७] नववधूचे तिळवण आणि लहान बाळाचे बोरन्हाण यानिमित्त ही हळदी कुंकू आवर्जून केले जाते.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "मकरसंक्रांत : हळदीकुंकू करण्याचे महत्त्व". सनातन संस्था (इंग्रजी भाषेत). 2019-01-11 रोजी पाहिले.
 2. ^ Joshi, O. P. (2004-01-01). Introduction to Hinduism (इंग्रजी भाषेत). ABD Publishers.
 3. ^ पाटील, संध्या (2013-03-01). "का करतो आम्ही हळदी-कुंकू ?".
 4. ^ Publicity, Maharashtra (India) Directorate of (1961). Mahārāshṭrāce jilhe.
 5. ^ "गौरीपूजन अन्‌ हळदी-कुंकवाची लगबग". 2018-09-17.
 6. ^ जोशी, प्रशांत (2018-12-20). "Margashirsha Mahalakshmi Vrat : जाणून घ्या कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत, पूजेची मांडणी आणि विधी".
 7. ^ नेवरेकर, दीपाली (2019-01-06). "Makar Sankranti 2019: मकर संक्रांती ते रथसप्तमी दरम्यान हळदी कुंकू कार्यक्रम करण्याचं महत्त्व काय?".