हर्षदीप कौर
Indian singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | डिसेंबर १६, इ.स. १९८६ दिल्ली | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
![]() |
हर्षदीप कौर (जन्म: १६ डिसेंबर १९८६) ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे जी तिच्या बॉलिवूड-हिंदी, पंजाबी, इंग्रजी आणि सुफी गाण्यांसाठी ओळखली जाते. तिच्या भावपूर्ण सूफी सादरीकरणामुळे तिला "सूफी की सुलताना" म्हणून ओळखले जाते.[१] दोन रिॲलिटी शोमध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर, कौरने बॉलिवूडमध्ये एक प्रमुख गायिका म्हणून स्वतःची स्थापना केली. कौरने तिचे पहिले बॉलिवूड गाणे "सजना मै हारी" गायले तेव्हा ती सोळा वर्षांची होती.
कौरने हिंदी, पंजाबी, मल्याळम, तमिळ आणि उर्दू यासह अनेक भारतीय भाषांमध्ये चित्रपट संगीतासाठी गाणी गायली आहेत आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्वतःची स्थापना केली आहे. तिने आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे,[२] जसे ए.आर. रहमान, प्रीतम, विशाल-शेखर, सलीम-सुलेमान, शंकर-एहसान-लॉय, अमित त्रिवेदी, शंतनू मोइत्रा, तनिष्क बागची, हिमेश रेशमिया, व संजय लीला भन्साठी. हॉलिवूड चित्रपटासाठी गाणी गायलेल्या त्या मोजक्या भारतीय गायिकांपैकी एक आहेत. ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले तिचे ट्रॅक "आर.आय.पी" हे ऑस्कर विजेते दिग्दर्शक डॅनी बॉयल यांच्या १२७ अवर्स या चित्रपटाचा भाग होते.[३] तिने पाकिस्तानी चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगासाठी काही गाणी गायली आहेत.
तिच्या काही लोकप्रिय गाण्यांमध्ये रॉकस्टार मधील "कटिया करून", राझी मधील "दिलबरो", जब तक है जान मधील "हीर", रंग दे बसंती मधील "इक ओंकार", रईस मधील "झालिमा", बार बार देखो मधील "नचदे ने सारे", बँड बाजा बारात मधील "बारी बारसी", ये जवानी है दीवानी मधला "कबीरा", कॉकटेल मधील "जुगनी जी", बरेली की बर्फी मधील "ट्विस्ट कमरिया" ; यांचा समावेश आहे.[४]
२०१९ मध्ये, कौरला २० व्या आयफा पुरस्कारांमध्ये राझी चित्रपटातील "दिलबारो" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा आयफा पुरस्कार, झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक आणि स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाला आहे.[५] इतर अनेक गाण्यांसाठी तिला पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे.
वैयक्तिक जीवन
[संपादन]कौरचा जन्म १६ डिसेंबर १९८६ रोजी दिल्लीतील सविंदर सिंग सोहल यांच्या घरी झाला.[६] ती संगीताच्या पार्श्वभूमीतून आहे. तिचे वडील सविंदर सिंग सोहल यांच्याकडे वाद्यांचा कारखाना आहे. तिने नवी दिल्लीतील स्प्रिंगडेल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. अभ्यासाव्यतिरिक्त, तिने वयाच्या सहाव्या वर्षी संगीत शिकण्यास सुरुवात केली. तिने सिंग ब्रदर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री तेजपाल सिंग यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीत आणि दिल्ली म्युझिक थिएटरमधील जॉर्ज पुलिनकाला यांच्याकडून पाश्चात्य शास्त्रीय संगीत शिकले. नंतर, वयाच्या बाराव्या वर्षी, संगीताच्या जगात डोकावण्यासाठी, ती पियानो शिकण्यासाठी दिल्ली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये दाखल झाली.
२० मार्च २०१५ रोजी मुंबईत कौरने तिचा बालपणीचा मित्र मनकीत सिंगशी पारंपारिक शीख पद्धतीने लग्न केले.[७] या जोडप्याचे पहिले मूल, हुनर सिंग यांचा जन्म २ मार्च २०२१ रोजी झाला.[८][९][१०]
संदर्भ
[संपादन]- ^ "Harshdeep Kaur on timesofindia". The Times of India. 15 March 2017 रोजी पाहिले.
- ^ "Economictimes Harshdeep Kaur". The Economic Times. 15 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "My musical journey has been really beautiful: Harshdeep Kaur". Governance Now. 26 April 2018. 11 May 2019 रोजी पाहिले.
- ^ Roy, Dhaval (20 November 2017). "Harshdeep Kaur to sing at Farhan Akhtar's concert". DNA India. 1 November 2019 रोजी पाहिले.
- ^ ANI (19 September 2019). "IIFA 2019: Alia Bhatt-starrer 'Raazi' wins big; Ranveer Singh named Best Actor for 'Padmaavat'". 12 October 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 October 2019 रोजी पाहिले.
- ^ Kameshwari, A. (16 December 2017). "Happy birthday Harshdeep Kaur: The young singer who adds a Sufi twist to Bollywood songs". The Indian Express. 14 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Harshdeep Kaur marries her best friend". The Indian Express. 22 March 2015. 14 May 2019 रोजी पाहिले.
- ^ Raghuvanshi, Aakanksha (3 March 2021). "Singer Harshdeep Kaur And Husband Mankeet Singh Welcome A Baby Boy". NDTV. 4 March 2021 रोजी पाहिले.
- ^ Service, Tribune News (3 March 2021). "'Our junior 'Singh' has arrived': Singer Harshdeep Kaur, husband welcome baby boy". Tribune. 4 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Harshdeep Kaur names her newborn son Hunar, here's what it means". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 10 March 2021. 10 March 2021 रोजी पाहिले.