Jump to content

हरियाली तृतीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरियाली तीज साजरी करताना नेपाळ मधील महिला

हरियाली तीज हे विवाहित महिलांनी करावयाचे एक धार्मिक व्रत आहे.[]श्रावण महिन्याच्या तृतीया तिथीला हे व्रत केले जाते. हे व्रत प्रामुख्याने उत्तर भारत. मध्य प्रदेश, व्रज राजस्थान या भागात अधिक प्रचलित आहे.पावसाळ्यात पृथ्वी हिरवीगार झालेली असते त्यामुळे या व्रताला हरियाली असे नाव मिळाले आहे.पंजाबमधे या व्रताला तीयन असे म्हणतात राजस्थानात याला शृंगार व्रत असे म्हटले जाते .[]

स्वरूप

[संपादन]

हरियाली तीज - या व्रताचा महत्वाचा भाग म्हणजे शिव आणि पार्वती या दैवतांची पूजा होय. विवाहित महिला या दिवशी हातावर मेहंदी काढतात, हिरव्या रंगाचा नवा पोशाख व अलंकार परिधान करतात आणि उत्सवाचा आनंद घेतात.घीवर, बालुशाही, शक्करपार, जिलबी असे पदार्थ या व्रतासाठी केले जातात. महिला झाडाला झोके बांधतात आणि त्यावर खेळण्याचा आनंद घेतात.[] नवविवाहित मुलींना या दिवशी त्यांच्या सासरच्या मंडळींकडून नवा पोशाख , बांगड्या , मेंदी , गोड पदार्थ भेट म्ह्णून देण्याची पद्धत आहे . महिला या दिवशी सोळा शृंगार करतात ज्यामुळे पतीला चांगले आयुष्य लाभते अशी धारणा आहे .[] तीज माँ म्हणजे पार्वतीची पूजा या दिवशी केली जाते . दिवसभर निर्जळी उपवास केला जातो . हा उपवास विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही करतात . चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवास सोडला जातो , चंद्राची पूजा केली जाते .या काळात मल्हार नावाची लोकगीते गाण्याची प्रथा आहे .[]

तीयन पंजाबमधे या दिवसाला तीयन असा तृतीयावाचक शब्द आहे.या दिवशी विवाहित महिला आपल्या माहेरी जातात आणि उत्सवाचा आनंद घेतात.या दिवशी एक पारंपरिक लोकगीत गायले जातें त्याचा अर्थ आहे की माझा झोका उंच झाडाला बांधा .[]

संदर्भ

[संपादन]
  1. Jagranjosh (2021-09-06). Current Affairs September 2021 eBook: By Jagranjosh (इंग्रजी भाषेत). Jagran Prakashan Ltd.
  2. 1 2 Sharma, Dr Yatendra (2025-06-04). Hindu Festivals (इंग्रजी भाषेत). Giri Trading Agency Private Limited. ISBN 978-81-7950-959-3.
  3. Singh, Manoj (2021-03-28). Sanatan Dharma: Vaidik Gateway to the Next Century (इंग्रजी भाषेत). Bloomsbury Publishing. ISBN 978-93-89449-06-8.
  4. Verma, Manish (2013). Fasts and Festivals of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-7182-076-4.
  5. Sahil. Virasat-e-Punjab Punjab History and Culture (A Complete Book for all Competitive Exams of Punjab) (इंग्रजी भाषेत). Insta Publishing. ISBN 978-93-95037-86-0.