हरिकेन कत्रिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिकेन कत्रिनाचे २८ ऑगस्ट २००५ रोजी अवकाशातील उपग्रहाने टिपलेले चित्र

हरिकेन कत्रिना (इंग्लिश भाषा: Hurricane Katrina, कत्रिना वादळ) हे अमेरिकेच्या इतिहासातील कमाल वित्तहानी घडवून आणणारे एक समुद्री वादळ आहे. ऑगस्ट २९ २००५ रोजी ह्या वादळाने अमेरिकेतील लुईझियानामिसिसिपी ह्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. ह्या वादळामुळे साधारण १,८३६ बळी गेले, तसेच न्यू ऑर्लिन्स ह्या समुद्रसपाटीखाली वसलेल्या मोठ्या शहराचा ८०% भाग पाण्याखाली गेला.

हरिकेन कत्रिनामुळे जलमय झालेले न्यू ऑर्लिन्स शहर