हरवलेले पुणे (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरवलेले पुणे हे डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकात पुण्यातील सुमारे ५५ ऐतिहासिक ठिकाणांचे वर्णन आहे.हे पुस्तक उन्मेष प्रकाशनने प्रकाशित केले आहे.

या पुस्तकात पुण्यातील ऐतिहासिक कालातील लकडी पूल, पर्वती,सारसबाग,हिराबाग,कोथरुडबाग इत्यादी नानासाहेब पेशव्यांनी निर्मिलेल्या गोष्टींचे वर्णन केले आहे.पुण्यातील स्वारगेट,हुजूरपागा, रामोशी गेट इत्यादी ठिकाणांची नावे कशी पडली याचेही वर्णन या पुस्तकात केले आहे.पुण्यातील मंदिरांची सन १८१० साली केलेली यादी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

संदर्भ[संपादन]

दैनिक लोकमत, पुणे दिनांक ७ मे २०१७ पान क्र. ६