गुलाम गौस सादिकशाह बाबा (रहेमतुल्ला अलेह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हजरत गुलाम गौस सादिकशाह बाबा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


गुलाम गौस सादिक शाह बाबा हे पाषाण गावचे सूफी संत होते. बाबांचा जन्म ११ जून १९१४ रोजी तामीळनाडूमध्ये झाला.ते लहान असतान त्यांना देवभक्तीची अतिशय आवड होती. हळूहळू ते भगवान शंकराची उपासना करू लागले. भजन-कीर्तनही करायचे. मग त्यांच्या गुरूंनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी विद्या प्रदान केली. मग तर बाबांनी असे चमत्कार केले की लोक थक्क झाले. जे लोक त्यांच्या कर्तव्यापासून दूर् होते त्यांना बाबांनी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. असे करीत करीत बाबांनी लोकांना आपल्या सामर्थ्याने रोजगार मिळवून दिले व ज्यांना मूलबाळ नाही त्यांना तेही मिळवून दिले, असे म्हणतात. ज्यांना पिशाच्चपीडा होती त्यांनाही बाबांनी त्यातून मुक्त केले. असे करत करत बाबांनी लोकांच्या मनावर अधिराज्य केले. हळूहळू बाबांच्या दरबारात दूरच्या देशांतूनही लोक येऊ लागले. त्यांतल्या अनेकांचे मन बाबांनी जिंकले. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा, रमजान ईद इ.स. १९७८ला बाबा समाधिस्थ झाले. आजही त्यांची समाधी आपल्या भक्तांशी संवाद करते असे म्हटले जाते