Jump to content

स्वावलंबी लाकूडतोड्या (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हतिम ताईला भेटलेल्या एका लाकूडतोड्याची ही कहाणी आहे.

कथेचा आशय

[संपादन]

फार पूर्वी अरब लोकांमध्ये हतिम ताई नावाचा एक कवी होऊन गेला. तो मुक्तहस्ताने केलेल्या दानधर्मासाठी प्रसिद्ध होता. [१]

त्याच्या मित्रांनी त्याला एकदा विचारले,“तुला तुझ्यापेक्षा अधिक सरस असे आयुष्यात कोणी भेटले आहे का?”

“हो”, हतिमताई उत्तरला.

“कोण होता तो?”

“एके दिवशी मी चाळीस उंटांचा बळी दिला आणि अनेकांना मी मेजवानी देऊ केली. आणि नंतर मी इकडच्या तिकडच्या पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी बाहेर पडलो. वाटेतच आमची एका लाकूडतोड्याशी गाठ पडली; त्याने नुकत्याच काट्याकुपाट्या तोडून त्याची मोळी बांधली होती. हा त्याच्या उपजीविकेचा मार्ग होता. तो गरीब असल्याचे लक्षात आल्यावर मी त्याला विचारले की, तो हतिम ताई एवढ्या मेजवान्या देत आहे, त्या मेजवान्यांना तू का जात नाहीस? म्हणजे तुला एवढे कष्ट करावे लागणार नाहीत.''

त्याने मला उत्तर दिले “जे स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात, त्यांना हतिम ताईच्या उपकारांची गरज नाही.”

हतिम ताईला भेटलेला हा लाकूडतोड्या त्याच्या आयुष्यातील सर्वात सरस असा मनुष्य होता.

तात्पर्य

[संपादन]

कष्ट करून स्वतःचा उदरनिर्वाह करणे ही गोष्ट, दुसऱ्यांच्या देणगीवर, दानावर किंवा मेहेरबानीवर जगण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. बलवान हातांनी गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येणे ही चांगलीच गोष्ट आहे; पण जो धडधाकट आहे त्याने स्वतःच्या हाताने कष्ट केले पाहिजेत, काम केले पाहिजे, दयायाचनेसाठी ते हात पसरले जायला नकोत. [२]

अधिक माहितीसाठी

[संपादन]

हतिम ताई संबंधी माहिती (इंग्रजी)

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Arabia's Legendary Almsgiver Hatem al Tai - Destination KSA". 4 May 2015. Archived from the original on 14 May 2023. Retrieved 14 May 2023.
  2. ↑ COLLECTED WORKS OF THE MOTHER (इंग्रजी भाषेत). २०२६-०४-१५ रोजी पाहिले.