Jump to content

स्वामी शिवानंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Yoga guru Swami Sivananda (es); স্বামী শিবানন্দ (bn); Yoga guru Swami Sivananda (fr); Yoga guru Swami Sivananda (pt-br); ശിവാനന്ദ (യോഗ ഗുരു) (ml); Dr. Swami Shivananda (ast); Свами Шивананда (ru); डॉ स्वामी शिवानंद (hi); Yoga guru Swami Sivananda (de); Yoga guru Swami Sivananda (pt); Swami Shivananda Baba (en); శివానంద్ (te); ಶಿವಾನಂದ (ಯೋಗ ಗುರು) (kn); स्वामी शिवानंद (mr) Indian saint, Padma Bhushan recipient. (en); ভারতীয় সাধু, পদ্মভূষণ প্রাপ্ত ব্যক্তিত্ব (bn); учитель йоги (ru); Indian saint, Padma Bhushan recipient. (en) Шивананда (ru); Sivananda (yoga teacher), Yoga guru Swami Sivananda (en); Yoga guru Swami Sivananda (ast)
स्वामी शिवानंद 
Indian saint, Padma Bhushan recipient.
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट ८, इ.स. १८९६
सिलेहट जिल्हा
मृत्यू तारीखमे ४, इ.स. २०२५
नागरिकत्व
व्यवसाय
  • yoga instructor
पुरस्कार
  • Padma Shri in other fields (इ.स. २०२२)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

स्वामी शिवानंद (८ ऑगस्ट, १८९६ - ३ मे, २०२५), हे एक भारतीय योग शिक्षक होते. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतातील सिल्हेट जिल्ह्यात झाला होता. २१ मार्च २०२२ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.[]

आयुष्य

[संपादन]

शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी[] ब्रिटिश भारताच्या बंगाल प्रांतातील (सध्याचा बांगलादेशचा सिल्हेट विभाग) च्या सिल्हेट जिल्ह्यात झाला.

त्याचे आईवडील अत्यंत गरिबीत राहत होते आणि त्यांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भीक मागावी लागत होती. शिवानंद फक्त सहा वर्षांचे असताना त्यांची बहीण, आई आणि वडील हे सर्वजण एका महिन्याच्या अंतराने वारले. नंतर ते बंगालहून काशीला गेले आणि तिथे सेवा करू लागले. गुरू ओंकारानंद यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर स्वामी शिवानंद यांनी योग आणि ध्यानात प्रभुत्व मिळवले.[]

तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी वाराणसी येथे गंगा नदीच्या काठावर योग शिकवला. पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी कुष्ठरोगाने ग्रस्त ४००-६०० भिकाऱ्यांची सेवा केली. त्यांनी त्यांच्या गरजांसाठी अन्न, फळे, कपडे, हिवाळ्यातील कपडे, ब्लँकेट, मच्छरदाणी आणि स्वयंपाकाची भांडी यांची व्यवस्था केली. त्यांनी योगाचा प्रचारही केला.[]

शिवानंद हे शाकाहारी होते.[] फळे आणि दुधाला फॅन्सी फूड असे म्हणत असत आणि ते खाणे टाळत देखील असे. त्याऐवजी ते डाळ आणि भात खाणे पसंत करत असे.[]

शिवानंद यांचे ३ मे २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.[]

पुरस्कार

[संपादन]

शिवानंद यांना योगरत्न पुरस्कार, बसुंधरा रतन पुरस्कार (२०१९) यासह अनेक पुरस्कार मिळाले होते. २१ मार्च २०२२ रोजी त्यांना भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Watch: Swami Sivananda receives Padma Shri for his contribution in Yoga". The Economic Times (इंग्रजी भाषेत). 21 March 2022.
  2. ^ a b "India's 'oldest man ever' says yoga, celibacy key to long life". The Hindu (इंग्रजी भाषेत). 18 August 2016. 26 March 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "The 125-year-old yogi winning hearts: Who is Swami Sivananda, the oldest man ever to receive a Padma Shri?". Firstpost (इंग्रजी भाषेत). 22 March 2022.
  4. ^ a b "Watch: Yoga Guru, 125, Bows To PM, President Before Receiving Padma Shri". NDTV. Press Trust of India. 22 March 2022. 26 March 2022 रोजी पाहिले.
  5. ^ Jain, Aishvarya (22 March 2022). "'Be brave, be vegetarian', says Padma Shri awardee Swami Sivananda"". Times Now. 22 March 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Yoga guru, Padma Shri awardee Swami Sivananda dies at 128 in Varanasi". Hindustan Times.