स्वराज विद्वान
Indian activist for the underrepresented | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| नागरिकत्व | |||||
|---|---|---|---|---|---|
| सदस्यता |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पुरस्कार | |||||
| |||||
स्वराज विद्वान ह्या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या असून त्या समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्यकरत असतात.[१] त्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या देखील आहेत.[२] असुरक्षित आणि दुर्लक्षित गटांसोबतच्या त्यांच्या कामासाठी भारत सरकारने त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले.[१] त्या सध्या भारतीय जनता पक्षाशी संलग्न आहेत आणि पक्षाच्या भाजप अनुसूचित जाती मोर्चामध्ये सरचिटणीस म्हणून काम करत आहेत.[२][३]
आयुष्य
[संपादन]विद्वान ह्या समाजातील असुरक्षित आणि दुर्लक्षित गटांसाठी काम करत असतात. २००० च्या सुमारास त्यांनी उत्तरकाशीतून आपले सामाजिक कार्य सुरू केले.[१] सर्वसामान्य नागरिकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी १०० हून अधिक बचत गटांची स्थापना केली. १६० गरीब महिलांना लग्न करण्यासाठी निधीची व्यवस्थाही केली. त्याच बरोबर त्यांनी १२०० महिलांना पेन्शन मिळवून दिले. तर ५०० महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी आर्थिक मदत करण्याची व्यवस्था केली.[१] बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या शाळेत जाणाऱ्या ८०० मुलींना त्यांच्या शाळेच्या पुस्तकांसाठी आणि गणवेशासाठी पैसे मिळवून दिले.[१]
गोमुख हिमनदीची स्वच्छता करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी १२० लोकांची मदत घेऊन विद्वान यांनी पर्यावरण संरक्षणात देखील योगदान दिले. २०१३ च्या उत्तर भारतातील पुरानंतर त्यांनी तत्परतेने कृती करत लोकांना मदत मिळेल याची खात्री केली.[१]
२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी तिला नारी शक्ती पुरस्कार मिळाला.[४] गेल्या वर्षी तिच्या सामाजिक कामगिरीसाठी तिला पहिल्या आठ नारी शक्ती पुरस्कारांपैकी एक महिला म्हणून निवडण्यात आले.[५] हा पुरस्कार तत्कालीन भारतीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[६]
विद्वान ह्या बलात्कार पीडित महिलांसाठी देखील कार्य करत असतात.[७] त्यांच्या मते पीडिता ही जर खालच्या जातीची असेल तर पोलिस आणि प्रशासन अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करत असतात.[८] २०१८ मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या मदतीने विद्वान यांनी एका १६ वर्षांच्या बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी ज्या माणसाला आरोपी म्हणून पकडले होते, त्याचाच पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणात विद्वानने पोलिस कर्मचाऱ्यावर खुनाचा आरोप केला होता. त्यांच्या मते त्या आरोपीच्या मृत्यूमुळे खरे बलात्कारी सोयिस्करपणे सुटले.[९]
राजकारण
[संपादन]विद्वान ह्या भारतीय जनता पक्षाशी संलग्न असून त्या भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या सरचिटणीस म्हणून काम करतात.[३]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 4 5 6 "Citation by the Ministry of WCD". Twitter (इंग्रजी भाषेत). 2020-07-04 रोजी पाहिले.
- 1 2 "परिवार को ढांढस बंधाने पहुंची राष्ट्रीय मंत्री स्वराज विद्वान" (हिंदी भाषेत). लाइव्ह हिंदुस्तान. March 14, 2024.
- 1 2 "BJP working for uplift of SCs, says Swaraj". The Tribune. October 14, 2022.
- ↑ Verma, Manish. Current Affairs Manual 2016 (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5083-016-1.
- ↑ "Stree Shakti Puraskar and Nari Shakti Puraskar presented to 6 and 8 Indian women respectively". India Today (इंग्रजी भाषेत). March 9, 2015. 2020-07-03 रोजी पाहिले.
- ↑ "Nari Shakti Puraskar awardees full list". Best Current Affairs. 9 March 2017. 2020-07-04 रोजी पाहिले.
- ↑ Kaundal, Roop Lal (23 June 2017). "Swaraj Vidwan Questions HP Women Commissions Silence Over Blind Girl Rape – Hill Post" (इंग्रजी भाषेत). 2020-07-04 रोजी पाहिले.
- ↑ "Schedule Caste victims get raw deal from Pune Police, says panel; top cop denies charges". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2017-08-24. 2020-07-04 रोजी पाहिले.
- ↑ "Shimla Schoolgirl Case: NCSC Reprimands Police For 'Trying To Hush' Issue". NDTV.com. 2020-07-04 रोजी पाहिले.