स्वप्न चिंतामणी (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वप्न चिंतामणी 🌹

भाग ४ [संपादन]

अग्निसंबंधी

१) घरे धडाधड धुराशिवाय आणि ठिणग्यांशिवाय जळताना स्वप्नात पाहिल्यास बराच फायदा होऊन राजसन्मान मिळेल. 

२) घर जळताना पुष्कळ धूर झाला आहे व विस्तवाच्या ठिणग्या उडत आहेत व घरे जळून राख झाली आहे असे पाहिल्यास आपणावर अरिष्ट येईल व विनाशकाल प्राप्त होईल. 

३) स्वयंपाकघर जळताना पाहिल्यास स्वंयपाक करणा-याला त्याच प्रमाणे जो जो भाग जळताना पाहावा त्या त्या भागात काम करणा-या मनुष्यास दुःख प्राप्त होईल, 

४) घराचे छप्पर जळताना पाहिल्यास आपली चिजवस्तू, वाहन वगैरे चोर लुटून नेतील अगर मित्राला मरण होईल.

५) घराचा पुढचा भाग अगर दरवाजा जळताना स्वप्नात पाहिल्यास घरच्या मालकास अगर आपणास संकटे प्राप्त होतील. 

६) रस्त्यावरची खिडकी अगर दरवाजा जळताना पाहिल्यास आप्तामधील पुरूषांपैकी मरण जवळ आहे असे समजावे. 

७) घराचा मागचा भाग जळताना पाहिल्यास स्त्रियांना मरण जवळ आहे असे समजावे.

८) आसन, बिछाना, पालखी व गाडी इत्यादी वाहने, शरीर गृह इत्यादिकांना आग लागली असे पाहून जो जागा होईल, त्यास लक्ष्मी सदासर्वकाळ प्रसन्न राहील.

भाग ५[संपादन]

१) दिवाण खान्यातील खांब आणि पलंगाचे खूर याशिवाय सर्व जळताना पाहिल्यास मोठा प्रख्यात मुलगा होईल. 

२) परंतु खांब व खूर जळताना पाहिल्यास आपला मुलगा वाईट चालीचा निघून त्याचा नाश होईल.

३)आपल्या आप्तांचे अगर मित्रांचे वापरण्याचे कपडे जळताना पाहिल्यास त्यांना रोग प्राप्त होईल असे समजावे. 

४) आपला निजावयाचा पलंग जळताना पुरूषांनी पाहिल्यास त्याचे बायकोस आणि स्त्रीने पाहिल्यास तिचे नव-यास दुःख होईल. 

५) ज्वाला पेट न घेत असलेला अग्नि पाहणे चांगले. 

६) आपले शरीर जळून काळे झाले अगर त्याला चट्टे पडले व आपण घाबरे झालो, असे स्वप्नात पाहिल्यास दुःख प्राप्त होईल व लोकांत मत्सर जास्त वाढेल. 

७) आपले बोट अगर पाय जळताना पाहिल्यास आपली कृत्ये आणि उद्देश हे वाईट आणि घातक आहेत असे समजावे.

८) धान्याची रास जळताना स्वप्नात पाहिल्यास अतिवृष्टीचे अगर अनावृष्टीचे सर्व पिके नाश पावतील. 

९) रासीला आग लागली आहे; परंतु धान्य सुरक्षित आहे असे पाहिल्यास पुष्कळ पीक येईल.

१०) सर्व प्रदेश जळताना स्वप्नात पाहिल्यास दुष्काळ पडेल अगर स्पर्शजन्य रोगाने प्रजेचा म्हणजे लोकांचा नाश होईल असे जाणावे.