स्वच्छता
घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.Skip to content. | Skip to navigation
पहा संपादन करा सुचवा माहिती लेखक स्थिती: संपादनासाठी खुला परिसर स्वच्छता
प्रस्तावना परिसर स्वच्छतेमध्ये खालील गोष्टी येतात प्रस्तावना घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात. याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे. परिसर स्वच्छतेचे महत्त्व हे जाणून घेत असतानाच अस्वच्छतेमुळे अनेक रोग आजार होतात हे लक्षात येते. सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण होते व अशा अस्वच्छतेमुळे डासांची निर्मिती होते. डासांमुळे होणारे आजार व त्याचा प्रादुर्भाव ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या पुस्तिकेमध्ये आपण पाहणार आहोत.
परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे/ या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणून परिसर स्वच्छतेमध्ये लोकांना योग्य व पुरेसा आहार, शुद्ध पाणी आपल्या मुलांना योग्य वेळी लस टोचून घेतली असती तर फारसे आजार उद्भवलेच नसते. वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्त्व आहे. आपले घर व त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित/ शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो.
परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे.
परिसर स्वच्छतेमध्ये खालील गोष्टी येतात शुद्ध हवा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, मानवी म्ल्मुत्रांची विल्हेवाट, पाळीव प्राण्यांची देखभाल, घरातील स्वच्छता, शेण व कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाण्याची विल्हेवाट.या सर्व गोष्टींचा समावेश करता येईल पण या सर्व गोष्टीची विल्हेवाट कशी करवी यावर विचार करणे आवश्यक आहे.