Jump to content

स्मिता तंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Smita Tandi (it); স্মিতা তন্দী (bn); Smita Tandi (fr); સ્મિતા તાંડી (gu); Smita Tandi (hr); Smita Tandi (ast); स्मिता तंडी (mr); Smita Tandi (de); Smita Tandi (da); Smita Tandi (nl); స్మితా తండి (te); ᱥᱢᱤᱛᱟ ᱛᱟᱱᱰᱤ (sat); ਸਮਿਤਾ ਟਾਂਡੀ (pa); Smita Tandi (en); Smita Tandi (es); স্মিতা টাণ্ডী (as); சுமிதா தாண்டி (ta) Indian police constable and activist (en); Indian police constable and activist (en); Indiaas constable (nl); condestable india (ast)
स्मिता तंडी 
Indian police constable and activist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
  • लष्करी कर्मचारी
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

स्मिता तंडी (जन्म: १९९२) ह्या छत्तीसगढ राज्यातील एक भारतीय महिला पोलीस शिपाई आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय उपचार घेण्यास असमर्थ असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी तंडी यांनी एक निधी उभारला. याच मानवतावादी प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना भारत सरकार तर्फे २०१६ चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कारकिर्द

[संपादन]

स्मिता तंडी ह्या पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.[] त्यांचे वडील देखील पोलिस कॉन्स्टेबल होते. २०१३ साली उपचारविना त्यांचे निधन झाले. केवळ आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडिलांचा झालेला मृत्यू स्मिताच्या जिव्हारी लागला. भविष्यात असे इतर कुणासोबत घडू नये म्हणून तंडी यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवनदीप नावाचा निधी उभारला.[] २०१५ मध्ये या निधीचा प्रचार प्रसार करण्यासाठी तंडी यांनी फेसबुकवर एक खाते उघडले. पुढील केवळ वीस महिन्यांत त्यांचे जवळजवळ ७.२ लाख फॉलोअर्स झाले.[][] जेव्हा केव्हा एखादी गरीब व्यक्ती उपचारासाठी तंडी यांच्याशी संपर्क साधते तेव्हा त्या सदरील गरजू व्यक्तीला भेटते आणि जर खरच ती व्यक्ती वरील निधीसाठी पात्र असेल, तर तंडी आपल्या फेसबुक वरील खात्यावर पोस्ट करून निधीसाठी आवाहन करतात.[]

तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना स्मिता तंडी (२०१७)

तंडी यांना त्यांच्या या मानवतावादी प्रयत्नांसाठी भारत सरकार तर्फे २०१६ सालचा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[] लवकरच त्यांच्या या कामाची माहिती त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठांच्या कानावर पडली. तंडीच्या या कार्याची दखल घेत त्यांच्या वरिष्ठांनी त्यांची भिलाई महिला हेल्पलाइनवर सोशल मीडिया तक्रारी हाताळणाऱ्या पदावर नेमणूक केली.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

स्मिता तांडी यांचा जन्म सुमारे १९९२ साली भारतातील छत्तीसगढ राज्यातील दुर्ग शहरात झाला. याच शहरात त्यांचे बालपण गेले.[] याच बरोबर तंडी ह्या व्हॉलीबॉल खेळात छत्तीसगडचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतात.[] २०१८ मध्ये, तंडी यांचा बिलासपूर आणि भाटापारा दरम्यानच्या रेल्वे प्रवासात लैंगिक छळ झाला. अधिकृत तक्रार नोंदवल्यार सदरील हल्लेखोराला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f Mishra, Ritesh (1 November 2016). "With over 7 lakh followers, Chhattisgarh cop makes Facebook platform to help". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 28 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 January 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Singh, Sanjay (7 March 2018). "International Women's Day: India's 6 most powerful women who defeated all odds". Tech Observer. 30 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 January 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "She is no glam doll, yet she has 7 lakh FB fans: This Chhattisgarh cop deserves a standing ovation". InUth. 2 November 2016. 6 November 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 January 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Gupta, Moushumi Das (4 March 2017). "Nari Shakti in many forms: ISRO scientists, Sheroes, a driver to get top honours". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 28 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 January 2021 रोजी पाहिले.
  5. ^ News Desk (26 January 2018). "President Medal Awardee Inspector Smita Tandi Harassed on Moving Train; Accused Arrested". India News (इंग्रजी भाषेत). 11 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 January 2021 रोजी पाहिले.