Jump to content

स्टिलवॉटर (मिनेसोटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टिलवॉटर (मिनेसोटा)
अमेरिकेतील शहर, काउंटी प्रशासकीय केन्द्र
अधिकृत नावStillwater संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीवॉशिंग्टन काउंटी संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानवॉशिंग्टन काउंटी संपादन
Territory overlapsStillwater urban area संपादन
भौगोलिक गुणक४५°३′२३″N ९२°४९′२०″W संपादन
डाक संकेतांक55082, 55083 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.ci.stillwater.mn.us/ संपादन
Date of incorporation४ मार्च 1854 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड651 संपादन
Map

स्टिलवॉटर हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. वॉशिंग्टन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असेलेले हे शहर हे मिनियापोलिस-सेंट पॉल महानगर क्षेत्राचा भाग आहे. स्टिलवॉटर सेंट क्रॉइ नदीच्या पश्चिम तीरावर विस्कॉन्सिनच्या हूल्टन शहराच्या समोर वसले आहे. २०२० च्या जनगणनेनुसार स्टिलवॉटरची लोकसंख्या १९,३९४ होती. [१] [२] राज्याच्या स्थापनेत त्याच्या भूमिकेमुळे स्टिलवॉटरला अनेकदा मिनेसोटाचे जन्मस्थान [३] म्हणले जाते.

भूगोल

[संपादन]
Birdseye view of the Stillwater Lift Bridge and the Commander Building
१९९९मध्ये दिणारे स्टिलवॉटर लिफ्ट ब्रिज आणि कमांडर बिल्डिंगचे दृष्य

युनायटेड स्टेट्स जनगणना ब्युरोनुसार, शहराचे क्षेत्रफळ ७.९८ चौरस मैल (२०.६७ चौ. किमी) आहे. यातील ६.९६ चौरस मैल (१८.०३ चौ. किमी) जमीन आहे आणि १.०२ चौरस मैल (२.६४ चौ. किमी) पाण्याने व्यापलेले आहेत. [४] राज्य महामार्ग ३६, ९५ आणि ९६ हे शहरातून जाणारे तीन हमरस्ते आहेत.

हवामान

[संपादन]

स्टिलवॉटरमध्ये वार्षिक सरासरी ४२ इंच (१,१०० मिमी) बर्फवृष्टी होते तर सरासरी वार्षिक पाऊस २४ इंच (६१० मिमी) असतो. प्रत्येक वर्षी सरासरी १४ दिवस येथील तापमान ९० °फॅ (३२ °से) पेक्षा जास्त असतात .

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]
१८७० च्या दशकाच्या मध्यात स्टिलवॉटरमधील मेन स्ट्रीटवरून दक्षिणेकडे दिसणारे दृष्य

"स्टिलवॉटर" हे नाव १८४३ मध्ये या भागात पहिली लाकूड गिरणी बांधणाऱ्या जॉन मॅककुसिक यांनी सुचवले होते. [५] हे नाव शहरातून वाहणाऱ्या सेंट क्रॉइ नदीच्या शांत पाण्यावरून पडले आहे. [६] मॅककुसिकने आपल्या मूळ गाव मेनमधील स्टिलवॉटरचे नाव या गावाला दिले असावे. [५]

युरोपियन लोक येथे येण्यापूर्वीपासून हजारो वर्षांपासून या भागात विविध स्थानिक लोक राहत होते. डकोटा लोक या भागाला त्याला होगान वांके किन (अर्थ:जेथे मासा पडलेला असतो) म्हणत असत.[७] [८]

ओजिब्वे या भागाला गिगून्झ-अगोमोड (अर्थ: जेथे मासा तरंगतो) असे म्हणतात.[९]

चित्रदालन

[संपादन]

लोकसंख्या

[संपादन]
लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्षलोकसंख्या%±
१८६०२,३८०—
१८७०४,१२४७३.३%
१८८०९,०५५११९.६%
१८९०११,२६०२४.४%
१९००१२,३१८९.४%
१९१०१०,१९८साचा:Rnd/c−४dec१%
१९२०७,७३५साचा:Rnd/c−४dec१%
१९३०७,१७३साचा:Rnd/c−४dec१%
१९४०७,०१३साचा:Rnd/c−४dec१%
१९५०७,६७४९.४%
१९६०८,३१०८.३%
१९७०१०,१९१२२.६%
१९८०१२,२९०२०.६%
१९९०१३,८८२१३.०%
२०००१५,१४३९.१%
२०१०१८,२२५२०.४%

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "2020 Decennial Census: Stillwater city, Minnesota". data.census.gov. U.S. Census Bureau. 24 March 2023 रोजी पाहिले.
  2. ↑ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ↑ "The birth of Minnesota" (PDF). mnhs.org. 1997. 2012-02-22 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). January 26, 2017 रोजी पाहिले.
  4. ↑ "US Gazetteer files 2010". United States Census Bureau. January 12, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-11-13 रोजी पाहिले.
  5. 1 2 Upham, Warren (1920). Minnesota Geographic Names: Their Origin and Historic Significance (इंग्रजी भाषेत). Minnesota Historical Society. p. 571.
  6. ↑ Chicago and North Western Railway Company (1908). A History of the Origin of the Place Names Connected with the Chicago & North Western and Chicago, St Paul, Minneapolis & Omaha Railways. p. 165.
  7. ↑ "Afton--Washington County Historical Society". www.wchsmn.org/afton/. August 19, 2022 रोजी पाहिले.
  8. ↑ Neill, Rev. Edward D (1881). History of Washington County and the St Croix Valley, Including the Explorers and Pioneers of Minnesota (इंग्रजी भाषेत). North Star Publishing Company. p. .
  9. ↑ "Nookomis Gaa-Inaajimotawi: What My Grandmother Told Me," in Oshkaabewis Native Journal" (PDF). www.bemidjistate.edu. 2019-07-23 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). August 19, 2022 रोजी पाहिले.