स्कीइंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्वित्झर्लंड मधे क्रॅास-कंट्री स्कीइंग.

स्कीइंग हा बर्फावरती खेळला जाणारा खेळ आहे ज्यात स्कीज् चा वापर केला जातो. स्कीज् बरोबर बूट वापरले जातात जे त्यांत्याशी बाइंडिज् द्वारे जोडता येतात. स्कीइंग हा खेळ दोन प्रकारात विभागता येतो. नॅार्डिक स्कीइंग हा त्यातला सर्वात जुना प्रकार जो स्कँडिनेविया मधे सुरु झाला. नॅार्डिक स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडिज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या फक्त बोटांकडे जोडलेले असतात. ॲल्पाइन स्कीइंग हा प्रकार ॲल्पस् पर्वतात सुरु झाला. आल्पाइन स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडिज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या बोटांकडे आणि टाचेकडे दोन्ही ठिकाणी जोडलेले असतात. बाइंडिज् च्या जोरावर ठरवले जाते की नक्की कोणता स्कीइंग चा प्रकार खेळला जात आहे.

स्कीइंग चा इतिहास[संपादन]

अलीकडच्या काळlतच norway व स्वीडन या ठिकाणी स्कीइंग या खेळाचा शोध लागला असल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत. इ . स . पूर्व ५००० या अतिप्राचीन काळात circa या नॉर्वेच्या northland या भागात एक कोरीवकाम आढळले. यात एक माणूस पायाखाली फळी व हातात काठी घेऊन बर्फावर सरकताना दिसतो. स्कीइंगसाठी वापरली जाणारी फळी व काठी ही सर्वप्रथम होटींग या स्वीडनच्या भागात आढळली . हे समान इ.स. पूर्व २५०० काळातील असावे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

स्कीइंग चे प्रकार[संपादन]

कॅनडा मधे स्कीइंग करताना उडी मारताना एक स्की जंपर

आल्पाइन स्कीइंग[संपादन]

आल्पाइन किंवा डाउनहिल स्कीइंग करताना स्कीपटू डोंगरउतारावरुन खाली येतो.

नॉर्डिक स्कीइंग[संपादन]

नॉर्डिक किंवा क्रॉस कंट्री स्कीइंग सहसा सपाट जमिनीवर किंवा अगदी अलगद उतार-चढांवर केले जाते.

नॉर्डिक स्कीइंगचा एक उपप्रकार बायेथ्लॉन आहे. यात स्पर्धक स्की घालून लांब अंतर चालत जातात व स्की न काढता टप्प्याटप्प्याने ठेवलेली निशाणे रायफलने साधतात.

स्की जंपिंग[संपादन]

स्की जंपिंगमध्ये स्कीपटू तीव्र उतारावरुन घसरत खाली येतो वर शेवटी असलेल्या छोट्या चढावरून उंच किंवा लांबवर उडी मारतो. या प्रकारात उडीचे अंतर, उंची तसेच हवेत असताना दाखवलेले कसब मोजले जाते.

स्कीइंग च्या स्पर्धा[संपादन]

अपंग लोकांकरता स्कीइंग[संपादन]

हे सु्द्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]