स्कायबस मेट्रो
| स्कायबस मेट्रो | |
|---|---|
|
एका स्थानकावर स्कायबस मेट्रो गाडी | |
| स्थान | मडगाव, गोवा |
| वाहतूक प्रकार | निलंबित रेल्वे |
| मार्ग | १ |
| मार्ग लांबी | १.६ किमी (०.९९ मैल) कि.मी. |
स्कायबस मेट्रो ही भारतीय तंत्रज्ञ बी. राजाराम यांनी बीईएमएल [१] आणि कोकण रेल्वे [२] यांच्या सहकार्याने तयार केलेली एक आदिरूप निलंबित रेल्वे प्रणाली होती, ज्याचे पेटंट भारतीय रेल्वेकडे आहे. [३] या प्रणालीमध्ये एक उन्नत लोहमार्ग होता आणि त्याच्या खाली डबे निलंबित केलेले होते. ही प्रणाली जर्मनीमधील वुपरटाल श्वेबेबान किंवा एच-बान प्रणालीसारखी होती.
गोव्यातील मडगाव येथील १.६ किमी लांबीच्या चाचणी मार्गावर २००४ मध्ये चाचण्या सुरू झाल्या, परंतु २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले, त्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. [४] हा चाचणी मार्ग १०.५ किमी पर्यंत वाढवण्यात येणार होता, पण अपघातानंतर प्रगती स्थगित झाली. [५] २०१३ मध्ये, कोकण रेल्वेने हा उन्नत चाचणीमार्ग पाडून टाकला. [६]
बांधकाम
[संपादन]संकल्पाने प्रमाणे, स्कायबस विद्युत शक्तीचा वापर करून, निलंबित गाड्यांमध्ये प्रवाशांना १०० किमी/तास च्या वेगाने वाहून धावू शकते. [७]
लोहमार्ग
[संपादन]
जड ५२ किलोग्राम/मी गेजचे रेल्वे रूळ प्रबलित काँक्रीटच्या ८ मीटर x २ मीटर आकाराच्या बॉक्स कुंपणात बसवलेले आहेत. हे दुहेरी-रुळांचे कुंपण स्थूणायुक्त तलाधारावर १५-२० मीटर अंतरावर असलेल्या १० मीटर उंच आणि १ मीटर व्यासाच्या स्तंभांवर आधारलेले आहेत. ही रचना रस्त्याच्या मधल्या विभाजक जागेतून जाण्यासाठी नियोजित होती, त्यामुळे स्कायबस मेट्रो जमिनीवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता विद्यमान रस्त्यांच्या मार्गांचे अनुसरण करणार असे ठरले होते. शक्य असलेला सर्वात तीव्र उतार १.७५% होता आणि सर्वात तीव्र वळणाची त्रिज्या १०० मीटर होती. [८] उभ्या वळणाची कमाल त्रिज्या ३.३७५ मीटर होती.
बोगी
[संपादन]बीईएमएलने देशात प्रथमच स्कायबसच्या आदिरुरूप विकासाच्या, नाविन्यपूर्ण स्कायबस बोगींच्या विशेष उत्पादन आणि पुरवठ्यासाठी कोंकण रेल्वे सोबत सामंजस्य कराराकेला होता. [९]
दोन मानक ॲक्सल 'बोगी' चालन यंत्रणा पुरवतात. प्रत्येक बोगी ३-फेज प्रत्यावर्ती विद्युत धारेच्या मोटरद्वारे चालवली जाते. एक तिसरे रूळ वीजपुरवठा करते. ब्रेकिंग एकतर रिजनरेटिव्ह (वीज ग्रीडला परत करणारी) असून त्यात पूरक डिस्क ब्रेकिंग किंवा (आपत्कालीन) मेकॅनिकल ब्रेकिंगचा समावेश असतो. ब्रशेसच्या साहाय्याने किंवा विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या चाकांद्वारे वाहनांना वीज पुरवली जाते.
डबे
[संपादन]हे डबे दुहेरी भिंतींचे, हलक्या वजनाचे असून त्यांना रुंद मोठ्या खिडक्या होत्या आणि ते रुळांखाली निलंबित आहेत. वातानुकूलित डब्यांना ४ मीटर रुंदीचे स्वयंचलित दरवाजे होते. या डब्यांमध्ये प्रवाशांसाठी दृकश्राव्य माहिती देण्याची सोय होती. डब्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये ३०० प्रवासी प्रवास करू शकत होते. प्रत्येक डबा ९.२५ मीटर लांब आणि ३.२ मीटर रुंद आहे. एका गाडीत दोन डबे असून, या गाडीची एकूण लांबी १८.५ मीटर आहे.
ट्रॅव्हर्सर
[संपादन]ट्रॅव्हर्सर स्वयंचलितपणे गाड्यांना रुळांदरम्यान हलवतो. ट्रॅव्हर्सर हे इतर उद्योगांमध्ये वस्तू उचलण्यासाठी आणि हलवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सव्हर्सरचे एक सुधारित रूप आहे. ट्रॅव्हर्सरमध्ये, लोकमार्गाचा एक फलाट एका बोगीला टांगलेला असतो, ज्यामध्ये एक मोटर असते आणि ती देखील ट्रॅकवरच बसवलेली असते. ट्रॅव्हर्सर एका स्थानकाप्रमाणे काम करतो. शेवटच्यास्थानकापासून ट्रॅव्हर्सरपर्यंत ५० मीटरचे अंतर राखले जाते, जेणेकरून अनपेक्षित विलंब झाल्यास तिसरे युनिट हलवले जात असताना दोन युनिट ठेवण्याची क्षमता उपलब्ध राहील.
स्थानक
[संपादन]हे स्थानक जमिनीपासून ५.५ मीटर उंचीवर असलेला एक वातानुकूलित प्लॅटफॉर्म आहे. स्थानकामध्ये स्वयंचलित दरवाजे आणि लिफ्ट आहेत. स्मार्ट कार्डने स्थानकाचा दरवाजा उघडतो. हे स्थानक ५० मीटर लांबीच्या जागेत बसते.
चाचण्या
[संपादन]२००४ मध्ये कोकण रेल्वेने गोवा राज्य सरकारच्या मदतीने गोव्यातील मडगाव येथे स्कायबसची चाचणी घेतली. २५ सप्टेंबर रोजी, डबे लोहमार्गाच्या काँक्रीटच्या खांबांना धडकल्याने झालेल्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले, त्यामुळे ही चाचणी थांबवण्यात आली. [१०]
व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल यांनी सांगितले की, २००४ च्या अपघातापासून प्रकल्पाभोवती असलेल्या सुरक्षिततेच्या समस्यांचे संभाव्य निराकरण करू शकणारे "स्विंग अरेस्टर" आणि "स्विचिंग उपकरण" यांसारखे महत्त्वाचे घटक तयार करण्यात कोंकण रेल्वे असमर्थ ठरले. [११]
हा अपघात टाळता येण्यासारखा होता असे सांगून राजाराम यांनी स्कायबसचा बचाव केला. [१२]
बंदी
[संपादन]ऑक्टोबर २०१३ मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने खर्च कमी करण्यासाठी स्कायबस प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे १.६ किमी लांबीचा चाचणी मार्ग पाडून टाकण्यात आला. कोंकण रेल्वेने चाचणी मार्गाची देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी परदेशी कंपन्यांकडून स्वारस्य मागवले होते; याला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे देखील हा मार्ग पाडून टाकण्याच्या निर्णयाला हातभार लागला. [१३]
पुनरुज्जीवनाबाबत चर्चा
[संपादन]गोवा राज्य सरकारने २०१८ मध्ये उत्तर-दक्षिण मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी स्कायबस पुनरुज्जीवित करण्याचा विचार केला होता.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली-गुरुग्राम , बंगळूर आणि पुण्यासाठी स्कायबस प्रणाली उभारण्याचे समर्थन केले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये, त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील शारजा येथे यूस्काय टेक्नॉलॉजीजने तयार केलेल्या एका निलंबित रेल्वे प्रणालीला भेट दिली होती. [१४]
संदर्भ
[संपादन]- ↑ "First prototype of sky-bus to be unveiled in Goa". The Times of India. 2003-04-02. ISSN 0971-8257. 2023-07-20 रोजी पाहिले.
- ↑ "Konkan Rly to invite EOI for Sky Bus metro". Deccan Herald.
- ↑ "Sky Bus Metro track gets US patent". The Times of India. 2004-02-09. ISSN 0971-8257. 2024-04-11 रोजी पाहिले.
- ↑ Sastry, Anil (23 December 2004). "National : Sky Bus Metro resumes after 3 months". The Hindu. 14 January 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ Pandey, Vineeta (2005-03-15). "Skybus project: Fantasy or reality?". The Times of India. 2006-06-07 रोजी पाहिले.
- ↑ "Its final! Konkan Railway Corporation to scrap skybus project - The Times of India". The Times of India. 2015-05-30 रोजी पाहिले.
- ↑ "Skybus Tech Movie Full". Rajaram Bojji. 19 January 2015. 12 March 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Skybus Tech Movie Full". Rajaram Bojji. 19 January 2015. 12 March 2026 रोजी पाहिले."Skybus Tech Movie Full". Rajaram Bojji. 19 January 2015. Retrieved 12 March 2026.
- ↑ "First prototype of sky-bus to be unveiled in Goa". The Times of India. 2003-04-02. ISSN 0971-8257. 2023-07-20 रोजी पाहिले.
- ↑ "National : Sky Bus Metro resumes after 3 months". The Hindu. Chennai, India. 2004-12-23. 2005-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-11 रोजी पाहिले.
- ↑ "Its final! Konkan Railway Corporation to scrap skybus project - The Times of India". The Times of India. 2015-05-30 रोजी पाहिले."Its final! Konkan Railway Corporation to scrap skybus project - The Times of India". The Times of India. Retrieved 30 May 2015.
- ↑ "ACD article 20th july 2010". 2012-11-26 रोजी पाहिले.
- ↑ "Its final! Konkan Railway Corporation to scrap skybus project - The Times of India". The Times of India. 2015-05-30 रोजी पाहिले."Its final! Konkan Railway Corporation to scrap skybus project - The Times of India". The Times of India. Retrieved 30 May 2015.
- ↑ Pegu, Violina (October 26, 2023). "Explained: What are Sky Buses in India and Will We Get Them Soon?". Coach Builders India.