Jump to content

सोलापुरी तेलुगू समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोलापूर हे महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर. मूळ भाषा मराठी. पण कन्नड आणि तेलुगु भाषिकांचे प्रमाणही मोठे. कारण कर्नाटक बरोबरच आंध्रप्रदेशची सीमाही लगत आहे.२० व्या शतकाच्या अखेरपर्यंत सोलापूरच्या आर्थिक व राजकीय क्षेत्रात तेलुगु समाजाची पकड होती.

तेलुगु समाज

[संपादन]

तेलुगु समाज हा मूळचा आंध्रप्रदेश / तेलंगणमधील. मुख्य व्यवसाय हातमागावर कापड विणण्याचा आहे. यांचा १९ व्या शतकाच्या माध्यास साधारणपणे सोलापुरात प्रवेश. इ.स. १७५९ ते १९०० या १४१ वर्षात ३५ दुष्काळ पडले. त्यामुळे आणि राजाकार चळवळीमुळे या समाजाला स्थलांतर करावे लागले. त्यातील काही लोकांनी केवळ हातधोटा घेऊन सोलापुरात प्रवेश केला. सोलापूरच्या पूर्वेकडून आल्यामुळे त्याच भागात वास्तव्यास ब्रिटिश अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यामुळे सोलापूरचा पूर्व भाग हा तेलुगु भाग म्हणून ओळखला जातो.[]पूरक परिस्थिती

सोलापुरातील मोठ्या सूतगिरण्या

[संपादन]
  1. १८७६ -  The Solapur Spinning and Weaving company
  2. १८९८ – नरसिंग गिरजी व लक्ष्मी मिल
  3. १९०९ – जाम मिल

पेशव्यांच्या काळात स्थापन झालेले ‘माधवराव पेठ’ ही बाजारपेठ म्हणजेच आजची ‘मंगळवार पेठ’सोलापूर हे मध्य रेल्वेच्या मुंबई , पुणे , हैदराबाद शहरांना जोडणाऱ्या मार्गावरील महत्त्वाचे स्टेशन आहे.हातमागासाठी आणि सूत रंगविण्यासाठी सोलापूरचे ऊष्ण व कोरडे हवामान अत्यंत उपयोगी .या समाजाने निर्माण केलेल्या जेकार्ड चादरी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाल्या. त्यांना सोलापुरी चादरी म्हणून ओळखले जाते. याचबरोबर अनेक बँका, शिक्षण संस्था, व्यापारी सहकारी संस्था स्थापन केल्या.अश्या प्रकारे प्रगती करीत सोलापूरची राजकीय सत्तास्थानेही मिळवली.                            

लेखक

[संपादन]
प्रा. सौ. मेधा अनिल पत्की
राज्यशास्त्र विभाग  
द.भै.फ. दयानन्द कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर    

संदर्भ

[संपादन]
  1. ^ सोलपुर गगज़ेतियर